परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’.

आहाहाहा! काय सांगू, अजूनही आठवण झाली की अंगावर शहारे येतात. ती खरंच परी आहे. किती कोमल आहे ती! दोनचार मिनिटे मला काही सुचलंच नाही. चक्कर यावी आणि समोरचे सगळ गोल गोल फिरत आहे असा भास व्हावा तसं होत होते. तिला ‘सॉरी’ बोलून मी बाजूला झालो. झालेल्या प्रकाराने मला तर जाम सुचतच नव्हते. म्हणजे अस नाही की कोणत्या मुलीचा याआधी ‘स्पर्श’ झाला नाही. पण अस काहीच नाही वाटल. एकदा तर, म्हणजे मी पुण्यात नवीन होतो. त्यावेळी त्या मोठ्या बीआरटी बसमध्ये चढलो. आणि मागून कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याच वेळी बस निघाली.

त्यावेळी माझा झोक समोर असलेल्या मुलीवर गेला होता. म्हणजे तिच्या आणि माझ्यामध्ये फार फार तर एक सेंटीमीटरचे अंतर असेल. त्यावेळी मला वाटल होते, आता ती माझ्या श्रीमुखात देईल. आणि खर सांगू का भीतीने घाम फुटला होता. पण ती रागावण्या ऐवजी हसत होती. त्यावेळी भीती वाटत होती. पण यावेळी मी स्वप्नात आहे असंच वाटत होत. अजूनही तसंच वाटत आहे.  काय सांगू तिचा तो ‘स्पर्श’, एखाद्या फुलाच्या पाकळीला हातात घेतल्यावर जाणवतो ना अगदी तसा. किंवा रेशीम वस्त्राला स्पर्शानंतर येणारा अनुभव. अगदी तसाच्या तसा अनुभव आला.

मुळात ती एवढी छान आहे ना! म्हणजे मला हवी तशी. तो स्पर्श झाल्यापासून ते आहे ना ‘परी परी है एक परी..’ हंगामा मधील. ते ऐकावेसे सारखे वाटत आहे. तसं त्या गाण्याची पन्नास पारायण मी या दोन दिवसांत करून टाकली आहेत. वाटत होती तिला राग आला असेल. पण घडले उलटे. माझी बस आल्यावर ती माझ्या बाजूच्या सीटवर बसली. पण यार बोलायची हिम्मतच होत नाही माझी. कालही मी ज्या सीटवर बसलो होतो. त्याच्याच बाजूच्या सीटवर ती बसली होती. पण सगळ व्यर्थ! मला हिम्मतच होत नाही. हे आता माझे नेहमीचच झाल आहे. यार तिलाही मी आवडलो तर!!! किती छान होईल. असो, सोडा मित्र आठवला की सगळंच शून्य…

Leave a Reply