फिल्मी भक्ती

भयानक फिल्मी भक्ती आहे. सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान  साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो.

‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ह्या जुन्या गाण्यावर ‘साईबाबांचे’ गाणे. मग मात्र राहवेना. आणि हसु देखील आवरेना. मग रोजच सकाळी असे गाण्याचे म्हणजे ‘साईबाबांच्या’ गाण्याचे मंजुळ स्वर कानावर ‘आदळायचे’. आणि माझी रम्य सकाळ ‘हसरी’ होवू लागली. आज सकाळी तर हिमेशच्या ‘नाम है तेरा तेरा’ गाण्याच्या संगीतावर ‘साई नाम है..’ बस्स पुढचे समजून घ्या. गाणे ऐकून कान ‘कृतार्थ’ झाले. किती मस्त ना! भक्तीची भक्ती आणि मस्तीची मस्ती.

एकूणच ही साई भक्तांची ‘साईबाबांवरची’ फिल्मी भक्ती पाहून मी धन्य झालो. म्हणजे अस नाही की, गणेशोत्सवात किंवा नवरात्रमध्ये कानाचे पडदे कानातून आणि शरीरातून हृदय बाहेर येईपर्यंत त्या मंजुळ ‘स्वराची’ तीव्रता असलेली ‘चिकनी चमेली’ किंवा ‘रिक्षावाला’ वगैरे गाणी ऐकलेली(ऐकावी लागली). पण ते ऐकतांना आणि हे रोज सकाळी लागणारे भक्तीसंगीत यात फारच फरक जाणवला. शेवटी एवढंच म्हणेन, त्यांच्या भक्तीच्या भाषेत ‘के बाबा तेरी याद आई’. आणि त्यासोबत आखें सुद्धा भर आई.

Leave a Reply