परवा ‘दिल बोले हडीप्पा’ बघितला. खर सांगायचं झाल तर गाणी सोडून काही खास आवडल नाही. पण एक गोष्ट नक्की काही महिन्यांपूर्वी मी ‘शी इज द मेन’ ह्या इंग्लिश चित्रपटाची कथा चोरली आहे हे नक्की. दोन्ही चित्रपटात मूळ कथा सारखीच. आता तिकडे फुटबॉल प्रसिद्ध म्हणून त्यात फुटबॉलचा सामना दाखवला आहे. आणि यात आपल्या इकडे क्रिकेट प्रसिद्ध म्हणून क्रिकेटचा सामना. शी इज द मेन मध्ये नटी जशी मुलाचा वेश धारण करून फुटबॉल सामना खेळते तसंच इथ राणी मुखर्जी एका सरदाराचा वेश धारण करून क्रिकेटचा सामना खेळते. दोन्हीही ठिकाणी नटीच सामना विजयी करून देते.
आता ही मूळ कथा. आता आपल्या दिल बोले हडीप्पा मध्ये आपल्या येथील काही गोष्टी टाकल्या मुळे तो थोडा वेगळा झाला आहे. पण मूळ कथा सारखीच आहे. मी पण तुम्हाला सांगत बसलो आहे. तुम्हीच बघा ना यु ट्यूब वर ‘She is the Men’ टाकून सर्च करा. २००६ सालचा तो चित्रपट आहे. बाकी दिल बोले हडीप्पात गाणी मला तरी छान वाटली.
Leave a Reply