सांगू??

सांगू? काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, अशी नाटके. यार माझा डीएम जाम नाटकी आहे. अजून तीन वर्ष थांब आणि तुझे शिक्षण कर. मग मी तुला पे रोलवर घेतो. अस म्हणत होता.

हुश्श! ती डेस्कवर आलेली आता! किती छान आहे ती! किती सुंदर, आणि किती स्वभावाने गोड. मी तिला सांगून टाकल आहे आता की, मी जॉब सोडला आहे. आणि ती मला ‘आय विल मिस यु’ देखील म्हणाली. मला खरच काही सुचेनासे झाले आहे. ती इतकी छान आहे. मी तिला माझ्या मनातले सांगितले की ती नाराज होईल. आणि पुन्हा कधीच आयुष्यात मला ‘मिस’ नाही करणार. खर तर आज तिला सगळ सांगून टाकायचे अस ठरवून मी आलेलो. पण आता पुन्हा गोंधळ होतो आहे. कस सांगू तिला? तिच्याशी बोलतांना तिला सगळ आठवते आहे. एकही गोष्ट ती विसरलेली नाही. पण ते खोट होत. मी तिला तिचे आडनाव आणि माझ्या जुन्या बॉसचे आडनाव एक आहे, म्हणून बोललो अस म्हणालेलो.

पण खर तर हे आहे, मी ज्या दिवसापासून पहिले त्या दिवसापासून माहित नाही. पण ती सोडून कोणीच छान वाटले नाही. तिच्याशी बोलण्यासाठी मी खोटे बोललो. बर्याच गोष्टी मी तिच्यापासून लपवल्या. अगदी, माझ तिच्यावर प्रेम आहे हे सुद्धा. पण कस? तिच्या मानाने मी काहीच नाही. ना शिक्षणात, ना सौंदर्यात आणि ना इतर कोणत्या गोष्टीत. आणि आमच्या आवडी निवडी देखील खूपच टोकाच्या. पण तिच्याशिवाय सगळ निरस! ती दिसली की, अंगावर रोमांच उठतात. ती हसली की, सगळ छान आणि आनंदी वाटायला लागते. ती आली एका वादळाप्रमाणे. आणि मी आता दूर जाणार. ती पुन्हा कधीच भेटणार नाही. यार, कस सांगू? तिला मी कधीच नाराज नाही करणार अस म्हणतो. आणि मी तिला सांगितले की, ती नाराज होवून जाईल. त्यापेक्षा नकोच. निदान ती मला ‘मिस’ तरी करेल. नाहीतरी सांगितले काय आणि नाही सांगितले काय, उत्तर माहिती आहे. ती माझी कधीही ‘मिसेस’ होणे शक्य नाही. हे ‘एक हरलेले युद्ध’ आहे. अगदी पहिल्या दिवसापासून हे माहिती होते. पण तरीही ‘मन’ हे ऐकत नव्हते. आणि आताही तेच होते आहे.

सगळ तेच! तिला सोडून जाण्याची माझी मुळीच इच्छा होत नाही आहे. पण आता सगळ झाल आहे. खर तर हे सगळ बदलू शकतो. पण तिला नाराज करून मी काय मिळवेल? ती डिस्टर्ब होईल. नाहीतरी ती आता माझ्याशी बोलतांना तिच्या कोणीतरी ‘बेस्ट फ्रेंड’ने तिचा नेटचा प्रॉब्लेम त्याने सोडवला. तिला मित्र खूप आहेत. नाही नाही, मला खरच काही जेलसी वगैरे नाही. बस, प्रश्न हा आहे की, सांगू की नको? तिच्याशी बोलायचे भाग्य. तिच्या सोबत एकदाच का असेना ‘लिफ्ट’मधून शेजारी जाण्याचे भाग्य मिळाले हे काय कमी आहे. तिने आजच तिच्या इमेलची ‘हाफ सेंच्युरी’ मारलेली आहे. काय करू? मला सगळ माहिती आहे, की ती माझ्याशी एक मित्र म्हणूनच कायम माझ्याशी बोलत आली. तिच्या मनात अस कधीच माझ्याबद्दल काही नव्हते.

पण मी देखील हे सगळ मुद्दाम नाही केले. ती सोडून दुसरे कोणी आणि दुसरा कोणताच विषय मनात येत नाही. ती सोडून दुसरे कोणीच छान वाटत नाही. ती सोडून जगावेसे सुद्धा वाटत नाही. मी कुठलीच गोष्ट, किंवा कुठलाही शब्द बोलायचं म्हणून बोलत नाही. तीला ज्या दिवशी पहिले तेव्हापासून ती ‘माझीच’ वाटते. तिला मी खूप आधीपासून ओळखतो असच वाटत आले आहे. कायम त्या कार्टून पीएम म्हणजे सध्याचा माझा एचसीएमला मी घाबरत आलो. ती आली आणि सगळच बदलून गेल. मग तो एचसीएम नाही तर डीएम ला सुद्धा बिनधास्त बोलू लागलो. तिच्या नुसत्या असण्याने, एक वन बीएचके, एक नवीन मोबाईल, एक बाईक आणि एक परमनंट जॉब. सगळ बदललं. अगदी माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट. पण आता.. मी तिला सांगू की नको?

शेवट गोड असावा असा नियम नाही पण एक संकेत आहे. तिच्यामुळे मला इतक सार मिळाले. आणि मी असा तिचा डीस्मूड करून, तिला नाराज करून, तिला गोंधळ करून जाण्यात खरच काहीच अर्थ वाटत नाही आहे. पण हे द्वंद देखील संपत नाही आहे. ना काही समजत आहे. सोडा, मी सांगूनच टाकतो. हे बैचेनीचे व्रत गेल्या पाच-साडेपाच महिन्यापासून घेतलेलं आहे. निनाद ते तरी.. माझ मूर्ख मन निदान ह्या गोष्टीने तरी समाधानी होईल? देवाला एकच प्रार्थना आहे, ती नाराज होवू नये..

Leave a Reply