आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या बाजूचे हिरवेगार डोंगर आणि त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग.
आहाहा! काय मस्त वातावरण आहे. तिने देखील पांढर्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. आज देखील खूप छान दिसते आहे. आणि आज इतक्या लवकर आली. म्हणजे मी देखील तसा आज लवकर आलो म्हणा. रोज उठतो लवकर. पण मध्यंतरी थोडा आजारी होतो म्हणू झाले खाडे. आज ती आली. आणि माझ्या डेस्क जवळून जातांना ‘हाय’ म्हणून गेली. ऐकल्यावर विश्वासच बसत नव्हता, की ती मला ‘हाय’ म्हटली म्हणून. मग ती थोडे पुढे गेल्यावर मी ‘हाय’ म्हटले.
थोड्या वेळाने पुन्हा आली. आणि माझ्या डेस्कजवळ थांबली. माझ्या पीसीच्या मॉनिटरकडे पाहून बोलली ‘हे काय आहे?’ मग पुन्हा तीच ‘सीएसएस का?’. मी ‘हो’. मग मी तिला विचारले, म्हणजे मला माहिती आहे की तिची प्रोफाईल काय आहे ते, पण तरीसुद्धा ‘तू कशात काम करतेस?’. ती म्हटली ‘जावा’. ‘तुम्ही सुद्धा जावात काम करता का?’ मी ‘नाही, मी डिझायनर आहे ना. एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट वर काम करतो’. मी तिला विचारलं ‘प्रोजेक्ट काय म्हणतो आहे. खूप काम असते का?’. ती ‘हो’. मग अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिला विचारलं ‘तुझा घसा बसला का?’ आता घसा बसलेला नाही, पण तरी विचारल. ती ‘नाही’. ‘मला काल अस वाटल’ मी म्हटलो. मग ती ‘फोन छान आहे. मला आवडतो’. आणि फोनचा मॉडेल नंबर देखील सांगितला. एकूण धक्काच बसला. काय जबरदस्त निरीक्षण आहे. ती फोन आवडतो बोलल्यावर मनात मला देखील तू खूप खूप खूप आवडतेस अस म्हणावं वाटल. पण.. असो. बोलतांना कोणी तरी गुदगुल्या करत आहे अस वाटत होत. काय मस्त दिवसाची सुरवात झाली. अगदी अविस्मरणीय! स्वप्नातच असल्याप्रमाणे वाटत आहे.
Leave a Reply