अबोल. यार, काय बोलू! हे माझ अस झालं आहे न. काय बोलू आणि काय नको. बोलावसं बरच वाटत. पण प्रश्न पडतो कस बोलू. म्हणजे काही विषय असे असतात. की जे असून नसतात. म्हणजे, साक्षीदार देखील आपण आणि आरोपी देखील आपण. गुन्हा घडतो. त्या ठिकाणी गुन्हा आपल्याच हातून घडत असतो. कितीही प्रयत्न केला, मनात ते असतेच. आपण आपल्या अशा अनेक गोष्टी, मनात दडवून ठेवतो.
बोलावसं वाटून देखील त्या कधीच बाहेर येऊ देत नाही. पण हे खरंच चांगल असत. अज्ञानात ‘सुख’ असत. त्या गोष्टी सदैव मनात असतात. मनाचे सगळेच दरवाजे आपले कधीच खुले नसतात. ते नसण्याची कारण तशीच असतात. अबोल, अव्यक्त अशा त्या गोष्टी कधीही विस्मरणात जात नाहीत. कधीकधी तर तोंडाच्या दरवाज्यातून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करतात. पण खूपच कमी प्रसंगी ते यशस्वी होतात. प्रत्येकाच्या मनाच्या महालात अशा काही खोल्या असतात. ज्यांचे दरवाजे न उघडण्यातच शहाणपणा असतो. कारण ते सर्वांसाठीच चांगले असते. कोणी कितीही आणि कसाही प्रयत्न केला तरी फार फार तर दरवाजाची किल्ली तो मिळवू शकतो. दरवाजा सदैव बंदच रहातो.
Leave a Reply