आरक्षण

आरक्षण हा कायम गाजणारा विषय. राजकारणी मतासाठी ह्याचा वापर करतात. पुतळे, नामांतर आणि आरक्षण केवळ मते मिळवण्याचे साधन! कृपया याचा अर्थ कुणाच्या आरक्षणाशी लावू नका. सरकारी नोकऱ्या, राजकीय आरक्षण व शिक्षणात कोटा मिळतो.

परंतु, एका प्रामाणिक प्रश्नाचे उत्तर द्या. राजकारणी सोडले तर याचा नेमका फायदा कुणाला झाला?. ज्यांना आरक्षण आहे. ते किती सुखी आहे?. माझ्या अनुभवावरून सर्वजण दुःखी आहेत. प्रत्येक प्रश्न सरकार सोडवणार हेच प्रत्येकाच्या मनात. शिक्षण नोकरीसाठी. खरं तर दोन्ही गैरसमज आहेत.

राजकारणी म्हणजे वाईट. असले ग्रह करणाऱ्यापैकी मी नाही. आरक्षण म्हणजे बेरोजगारीवर उतारा. असा ग्रह निर्माण झालेला आहे. इतर ठिकाणी नोकऱ्या आहेत. हे कोणीच लक्षात घ्यायला तयार नाही. स्पष्ट करतो.

 

लिंक्ड इन नावाच्या वेबसाईटचे मेल पहा. दिवसाला किमान हजार नोकऱ्या उपलब्ध होतात. आता मला सांगा. सरकारी नोकऱ्यापेक्षा अधिक खासगी नोकऱ्या निर्माण होतात. माझा मुद्दा इतकाच की आपण आरक्षणाच्या नावाखाली भरकटत चाललो आहे.

आपण यावर विचार करायला हवा. आरक्षण का दिले. का नाही दिले ह्यापेक्षा आपल्याला काय हवंय ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. बेरोजगारी हा मुख्य विषय आहे. मागासलेपणा वगैरे गोष्टी सत्य आहे. तरी आजही जातीजातींमध्ये तेढ आहे. दुसऱ्या जातीच्या जोडीदार निवडला तर आजही त्याला समाजाकडून त्रास होतो.

ह्यात राजकारण्यांनी मतपेढी जोडण्यासाठी हे उद्योग करतात. बहुतेकजण ह्यात वाहून जातात. अनोळखी नेत्यासाठी मित्राला शत्रू बनवतात. जातीच्या चष्म्यातून योग्यता ठरवली जाते. एकविसाव्या शतकात आहोत याचीच शंका येते. अगदी पदवी शिक्षण घेणारे जाहीर जातींचा उद्धार चालवतात.

आजवर जात टिकली याचे कारण धर्म नसून राजकारण आहे. त्यामुळे आपल्या करिअरकडे लक्ष द्या. जमले तर इतरांना मदत करा. राजकारण चालूच राहणार. ती त्यांचीही अपरिहार्यता आहे. कारण चांगलं ऐकायला आपला समाज मन तयारच नाही. काहीतरी वेडंवाकडं बोललं की लगेचच प्रसिद्धी मिळते. आता वेगळं सांगायला नको.

आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. यश अपयश परमेश्वराच्या हाती. त्यामुळे कृती करा. प्रयत्नच आपल्याला इतरांपासून वेगळं करतो. प्रयत्न करणाऱ्याला देवही साथ देतो. सोपा मार्ग कधीही आकर्षित करतो. परंतु ध्येयाकडे जाण्यापूर्वी भरकटून टाकतो. मेहनत करा. सद्विवेकबुद्धी प्रत्येकाकडे असतेच!

Leave a Reply