इंग्रजी भाषा

मी आज एक इंग्रजी भाषेत नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चुकीचे तर चुकीचे. तोडक मोडक इंग्लिश मी रोज बोलत असतो. कोणी नाही भेटले तर, कस्टमर केअरवाले असतातच. त्यामुळे रोज सराव करतो. पण म्हणावा तसा अजून सुधार नाही. माझे काही मित्र त्या इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासला गेलेली. मलाही जावसं वाटलेलं. पण मित्रांची प्रगती पाहून विचार बदलला. या शनिवारी त्या कॅंपमधील एका मॉलमध्ये बराच वेळ इंग्लिश कम्युनिकेशन विषयावर असलेली बरीच पुस्तके धुंडाळली. पण एकही घ्यावेसे वाटले नाही. अगदी सुरवातीच्या मानाने ठीक आहे. पण आता चार वर्ष झाली. अजून एक वर्षांनी सिनिअर लेव्हल येईल. त्यामुळे चांगले इंग्लिश करणे अनिवार्य आहे.

अगदी पहिला इंटरव्यूच्या वेळी फक्त येस आणि नो एवढंच बोललेलो. त्यामानाने आता मी व्यवस्थित इंटरव्यू देतो. परंतु जे रोजच्या जीवनात किंवा ज्याला चांगल इंग्लिश म्हणतात ना. ते काही अजून येत नाही. म्हणून आता एक इंग्लिशमध्ये ब्लॉग बनवला आहे. त्याचा उद्येश फक्त आणि फक्त इंग्लिश भाषा सुधारणे. मला तुमची एक मदत हवी आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळी त्यावर मी जे बोललो. त्यात काही जरी चूक वाटले तर सांगाल का? म्हणजे मी रोज जे बोलतो. त्यात मी जे बोलतो. त्यावेळी मला चुका समजतात. परंतु नेमक कसं असायला हव हे नाही कळत. त्यामुळे कदाचित, त्या ब्लॉगचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. बाकी बोलूच..

Leave a Reply