कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीच. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली.
कधी त्या लहान मुलांना पहा. जवळपास सर्वच खेळ ते कल्पनाशक्तीच्या जोरावर खेळतात. कल्पना मूर्त स्वरूपात इच्छा आणते. इच्छा ही देखील एक शक्ती. कितीही अवघड असोत. दृढ इच्छाशक्ती ते वास्तवात आणते. त्यामुळे कल्पना अनेक बदल घडवून आणू शकते. मोकळ्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहते. ह्या शक्तीचा उपयोग करूनच मानवाने प्रगती केली. त्यामुळे कल्पनांना मारू नका. त्याची मस्करी करूच नका. कुणाला वाटलेलं दूरध्वनी सत्यात येतील. तार न जोडता संपर्क होतील.
रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. पण मुंग्याचे अपघात होत नाही. अशा गोष्टींवर विचार केला तर नवा समाज घडेल. मग कशासाठी बंधन घालून घ्यायची. समजूतदारीच्या नावाखाली आपण कल्पनाशक्तीला तिलांजली देतो. ते सर्वात आधी आपण बंद केले पाहीजे. कल्पनाशक्ती अनेक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. सोपं उदाहरण घेऊयात. शहरांमध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे. कचरा उचलण्यासाठी घंटा गाड्या फिरतात.
मग तो कचराच निर्माण नाही झाला तर. हीच कल्पना ठाण्यातील एका साठीच्या व्यक्तीने सत्यात उतरवली आहे. गेल्या पंधरा वर्षात त्याने एकदाही कचरा घराबाहेर टाकलेला नाही. मी मस्करी करत नाही. हे पहा.
त्यामुळे अशक्य काहीच नाही. मुद्दा इतकाच की कल्पनाशक्तीला जागृत करा. माझ्या दोन्ही चिमुकल्या रोज काहीना काही भन्नाटच सांगत असतात. कधी त्यांना पक्षांप्रमाणे उडायचं असत. कधी आकाशातील ताऱ्यांवर जायचं असत. अनेकदा हसून हसून पुरेवाट होते. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या कल्पनाच जगातील अनेक शोध लावत असतात.
मराठी माणसात कल्पनाशक्ती ठासून भरली आहे. त्यामुळेच की काय कलेच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात आपण भरती घेऊ शकतो. अनेक संधी निर्माण होऊ शकतात. गरज आहे आपल्या कल्पनांना कृतीची जोड देण्याची. अशक्य कल्पनेला मूर्त स्वरूपात खरोखर पाहून अत्यानंदच होतो. तोच सर्वोत्तम क्षण.
कल्पनेचं विश्व सुंदरच. साहित्याची निर्मिती केली. थोडस रममाण व्हा. बालिशपणा वाटेल. पण आनंदाची पूर्ण हमी. राजकीय भाषेत थिंक टॅक. विचार करणे हेच मानवाचे लक्षणच. ही देणगीच आहे. याचा उपयोग करून घेऊयात. कल्पनेच्या विश्वात उतरा!
Leave a Reply