कोडे

काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’ च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक करा..

जर
७ – ३ = १२४
६ + ३ = २७९
५ – २ = ६३
११ + २ = २६१३

तर,
१५ – ३ =?

आणि खाली एक एक्सेल फाईल जोडलेली, आणि उत्तर म्हणजे त्या फाईलचा पासवर्ड. त्यात नाव टाका म्हणून सांगितलेलं. आणि इमेल फोरवर्ड करा म्हणून सांगितलेलं. मला नाही कळल ते, कोणाला फोरवर्ड करायचे ते! जाऊ द्या तिला भेटल्यावर सांगेन. उत्तर खूप सोपे आहे..

Leave a Reply