त्याला बिग बॉस आवडत नाही,तिला बिग बॉस आवडतो.
दहा वाजून गेल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण बिग बॉस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
बिग बॉस म्हणजे फालतू सारा बिग बॉस म्हणजे नौटंकीची रीहसळ,
बिग बॉस म्हणजे फन सारा बिग बॉस म्हणजे चैतन्याचा दरवळ.
बिग बॉस संस्कृती खराब करतो बिग बॉस वैतागवाडी
बिग बॉस म्हणजे गार वारा बिग बॉस म्हणजे प्रश्न सोडी.
बिग बॉस टवाळखोरांची कामे बिग बॉस म्हणजे वेळेची नासाडी उगाच,
बिग बॉसमध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं टीव्हीत.
दरवर्षी बिग बॉस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी बिग बॉस येतो दरवर्षी अस होतं.
बिग बॉसवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
बिग बॉस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
बिग बॉस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
बिग बॉससकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते सर्फिंग करत राहते टीव्हीत.
रूसून मग ती निघून जाते सर्फिंग करत राहते टीव्हीत.
त्याचं तिचं भांडण असं दहाच्या तासात.
Leave a Reply