खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती गोष्ट वेगळी की माझ्या मित्राला ती खूप आवडायची. त्याला नंतर नंतर आमच्या दोघात काही तरी. म्हणजे त्याच्या चित्रपटाचा मीच ‘व्हिलन’ वाटायला लागलो. म्हणून मग मी तिच्याशी बोलायचे बंद केले.
इथे पुण्यात आल्यावर एक मैत्रीण बनली. म्हणजे जवळपास तीन वर्षापासून आमची चांगली मैत्री आहे. अगदी दर आठवड्याला बाहेर फिरायला जाण्यापासून ते महिन्यातून एक दोनदा हॉटेलात जाण्यापर्यंत. तीच्या आई वडिलांचा स्वभाव आणि माझ्या आई वडिलांचा स्वभाव सगळंच सारखं. तिचे वडील आणि माझे वडील यांची चांगली दोस्ती. हीच्या इच्छा, स्वभाव सगळंच माझ्याप्रमाणे आहे. रास देखील सारखी. थोडक्यात सांगायचं झालं तर ती एखादी गोष्ट घडल्यावर काय प्रतिक्रिया दिल हे सुद्धा मी सांगू शकतो. आणि ती मी काय दिल हे सुद्धा. आता ती गोष्ट वेगळी की, अप्सराला पाहिल्यानंतर महिन्याभरापासून मी माझ्या मैत्रिणीला भेटलो नाही. आणि फोन सोडून कुठल्याच प्रकारचा संपर्क झालेला नाही. म्हणजे माझी संगणकाच्या कोर्सच्या वेळी आणि इथे आल्यावर झालेली मैत्रीण ह्या दिसायला सुंदर नाहीत. किंवा मला आवडल्या नाहीत अस नाही. उलट त्यांना मी कसा आहे आणि माझे वागणे, बोलणे, चालणे सर्व गोष्टींची चांगली माहिती आहे. माझ्या इच्छा त्यादेखील त्यांना माहिती आहेत. पण ते म्हणतात ना ‘विश्वास’ नावाची एक गोष्ट असते. ती कधीच राहिली नाही त्यांच्यावर.
संगणकाचा कोर्सच्या वेळी माझी मैत्रीण बऱ्याच जणांना ‘फिरवायची’. तीच्या दृष्टीने तीचा टाईमपास होता. माझा मित्राला देखील तसाच. त्याला समजावलं तर त्याला वाटायचं की, तिच्याबद्दल मी त्याच्या मनात गैरसमज निर्माण करतो आहे. आणि ही जी आहे ना! ही पक्की ‘पुणेकर’ आहे. तासातून एक तरी फोन येतोच तिला तीच्या ‘मित्राचा’. बर तिला विचारलं तर, तो तीचा बॉयफ्रेंड वगैरे काही नाही अस सांगते. काय खर आणि काय खोटे देव जाणे. आणि स्पष्टच बोलायचे झाले तर, मी नेहमी अशा मुलीचा विचार केला जी माझा विचार करेल. ज्या भेटायच्या त्यातील बऱ्याच जणींना आधीच कोणी ना कोणी असायचे नाहीतर, त्यांना खूप फ्रेंड असायचे. आणि त्या सर्वांना त्याच पद्धतीने वागवायाच्या. कोणासाठी मी कधीच स्पेशल नव्हतो. होतो पण माझ्या भाऊ बहिणींसाठी.
ज्यावेळी मी ‘अप्सरा’ला पहिले तेव्हापासून माझे सगळंच बदललं. म्हणजे याआधी अस कधी माझ्यात काहीच बदललं नव्हते. अगदी सकाळी उठण्यापासून ते तीच जिकडे तिकडे दिसेपर्यंत. आणि याआधी कोणी इतके ओळखीचे वाटलेच नव्हते. तिच्याशी बोलतांना अस नवीनच भेटत आहोत अस वाटतच नाही. ती खूप साधेपणाने बोलते. म्हणजे कोणतेच बोलणे नाटकी वाटत नाही.ती सुंदर आहे. मला याआधी कोणतीच सुंदर मैत्रीण नव्हती अस नाही. पण त्या खुपंच नखरे करायच्या. ही एकदम ‘माझीच’ वाटते. त्यामुळे अप्सरावर ताबडतोप विश्वास बसला. यालाच प्रेम म्हणतात की अजून काय वेगळ ते मला माहित नाही. पण ती आल्यापासून रोजचं ती स्वप्नात येते. आणि दुसरा विचार येतंच नाही. आणि ती सोडून कोणाशीच दुसऱ्या विषयावर बोलावं वाटत नाही. सगळ् स्वप्नच वाटत आहे. इतकी कोणी चांगल असू शकत यावरच विश्वास बसत नाही आहे. असो, प्रेम म्हणजे काय असतं.. हे तर नसत?
Leave a Reply