फेसबुकच्या सूचना

फेसबुकच्या पानाला पसंती द्या. मैत्रीची विनंती अशा आशयाच्या शेकडो सूचना दिवसाकाठी येतात. त्यांचे विपत्र/ईमेलच्या खचात कामाच्या गोष्टी शोधणे अवघड होते. बरं ह्या सूचना वजा विनंती आपल्याच ओळखीची लोक करत असल्याने अनेकदा नाईलाज होतो.

शाळेत असतांना मला एकच मित्र होता. पुढील शिक्षणात व त्यापुढे नोकरी व्यवसायात चार पाचपेक्षा आकडा वाढला नाही. पण त्या सुमार बुध्यांक असलेल्या फेसबुकवर मात्र सहाशेपेक्षा कमी मित्र असलेला कुणी असेल वाटत नाही. आधी मैत्रीची विनंती येते. ती स्वीकारली की लगेच पानाला पसंती देण्याची आर्जव!

संख्येचे महत्व इतके झालेय की सट्ट्यानंतर फेसबुकच्या पानाच्या पसंतीचा क्रमांक लागतो. अद्ययावत अन तंत्रानुकूल आभासी जगात यापेक्षा दुसरा निर्बुद्धपणा दुसरा नसेल. आजकाल तर पानाच्या पसंती देखील विकत मिळतात. बिटकॉइनला देखील जेवढी मागणी नाही तेवढी त्या फेसबुकच्या पानाला विनंतीची आहे.

अचानक एवढी लोक आलीत कुठून अन का धडपडतात हेही अनाकलनीय आहे. प्रसिद्धीची नशा गांजापेक्षा जास्त असते हेच खरं. पण सांगणार कुणाला! जो तो प्रसिद्धीच्या मागे धावतोय. तुमचा व्यवसाय आहे ते ठीक पण उगाच ‘गावाचा कट्टा’ अन ‘आईच्या गावात’ अशा नावाची पाने ह्याच तंत्राने प्रसिद्धीस आलेली आहेत. त्यांनी मेहनत घेतली नाही असे माझे चुकूनही म्हणणे नाही.

तोही एक व्यवसाय झाला आहे. याबाबत दुमत नाही. पण नेमका किती जणांना त्याचा फायदा होतोय? मग इतका वेळ त्यावर देणे योग्य आहे का? बरं तुमचा वेळ तुम्ही हवा तसा घालवाल, पण तुमच्या हौशेपायी किती जणांचा वेळ दवडणार?

बरं पानाची/मैत्रीची विनंती पसंती दिली नाही की रुसवे फुगवे सुरु होतात. तू माझ्या फेसबुकच्या पानाची विनंती स्वीकारली नाही आता मीही तेच करणार! असं अनुसरणाच्या बाबतीत ट्विटर अन इंस्टाग्रामवर चालत. मुद्दा इतकाच की स्वतःचा वेळ वाचावा अन इतरांचाही. सूचना बंद कराव्यात तर त्यातही हेवेदावे येतात.

मध्यंतरी इंस्टाग्रामवर लाखभर अनुसारक असलेल्या एका तरुणाने टाळेबंदीच्या नैराश्याने आत्महत्या केली. झालं ते वाईटच. पण हा आकड्यांचा खेळ काय फायद्याचा अन किती महत्वाचा ह्याचाही विचार करणे महत्वाच आहे. उगाच स्वतःचा ताण वाढवून अन इतरांना मानसिक छळून काय साध्य?

बाकी सगळं जाऊद्या. अन आधी आपल्या फेसबुकहं खात्याच्या रचनेत (सेटिंग्स) जा अन पहिल्यांदा त्या फेसबुक पानाची/मैत्रीची आमंत्रणे/विनंती बंद करण्याची काही पर्याय मिळतोय का ते पहा..

प्रतिक्रिया

Ravi ugale says:

फेसबुक चा लेख छान होता सर,अतिशय कमी शब्दात अर्थपूर्ण अशी माहिती आपल्या लेखात आढळली.आमचा सुद्धा इंग्लिश आणि मराठी मधे ब्लॉग आहे.जर आवडला तर नक्की आपली प्रतिक्रिया कळवा.
humbaa.com

Ravi ugale says:

अतिशय कमी शब्दात अर्थपूर्ण अशी माहिती आपल्या लेखात आढळली.आमचा सुद्धा इंग्लिश आणि मराठी मधे ब्लॉग आहे.जर आवडला तर नक्की आपली प्रतिक्रिया कळवा.
humbaa.com

हेमंत आठल्ये says:

धन्यवाद!

Leave a Reply