आज खरच खूप बेकार वाटत आहे. ऑफिसला आज मी उशिरा आलो आहे. खर तर येणार नव्हतो. पण आलो. तिची खूप आठवण येत होती. एक दिवस घरी राहून पहिले. माझा अभ्यास व्यवस्थित होत आहे. परंतु तिची खूप आठवण येत होती. आज दुपारी मनावर खूप कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. पण नाही झाल कंट्रोल. आज बिन दाढीचा. तिने अजून मला पहिले नाही आहे. खूप बेकार वाटतो आहे. असो, तिला ‘हाय’ केल. पण पुढे बोलण्याची हिम्मत झाली नाही.
अरे हो. एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. काल तिने मला तीन मेल पाठवले. मी सुद्धा ना. खूप पटकन निर्णय घेतो. असो, खूप छान वाटते होते. म्हणून मी तिला पिंग सुद्धा केले, पण काय बोलावं तेच कळेना. म्हणून मी काहीच नाही बोललो. एका अर्थाने चांगलेच आहे. नाहीतर.. नाही नको. मला काहीच नाही सुचत आहे. आपण नंतर बोलू..
Leave a Reply