मागील वर्षात काय कमावले?

सर्वसाधारण पणे माणसाचे जीवनाचा कार्यकाळ हा 60 वर्षांचा असतो. त्यात आपण 20 वर्ष झोपेत घालवतो. म्हणजे एक तृतीयांश वेळ. मी दररोज 2 ते 2.5 तास प्रवासात घालतो. याचा अर्थ सर्वसाधारण पणे आपण 5 वर्ष प्रवासात घालवतो. कंपनीत मी दररोज 8 तास काम करतो. म्हणजे मी 20 वर्ष कंपनीत घालवतो.

म्हणजे याचा अर्थ मी आयुष्यातील 45 वर्ष असेच घालवणार. उरलेले 15 वर्ष हेच काय ते माझे जीवन. यात मी शालेय आणि शैक्षणिक या गोष्टीत पडणार नाही. म्हणजे आता काय जे काही मी कमावणार ते या 15 वर्षातला असेल. मग त्यात माझी कमाई म्हणजे मित्र, आणि माझे असलेले घरातील नातेवाईक.

मागच्या 1 वर्षात पहिले तर मी मुंबईतुन पुण्याला आल्यापासून नवीन असे 1 मित्र आणि 3 मैत्रिणी केल्या. म्हणजे मी तरी त्याना तास मनात आलो आहे. ते मला मानतात की नाही, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण सध्याला मला यातील एकावर पण विश्वास नाही. आता का नाही, हा वेगळा मुद्दा आहे. विषय बदलायला नको. याचा अर्थ मी माझ्या मागील वर्षात काहीच कमावले नाही.

आर्थिक गोष्टीत बर्‍याच प्रमाणात प्रगती झाली, पण ठेव अशी काहीच नाही. नवीन मोबाइल, हार्ड डिस्क, पेन ड्राइव, स्कॅनर अशा वस्तू आल्या. आई वडिलांच्या मदतीमुळे 2 खोल्यांचे घर झाले. एकूण काय की मागच्या वर्षात आर्थिक प्रगती झाली. पण मित्र / मैत्रीण काही झाले नाही.

Leave a Reply