माझिया प्रियाला..

काल दिवसभर एकदाही मला अप्सराने बघितले नाही. खूप राग आला होता. आणि डोके खूप दुखले. कधी कळणार यार तिला! ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे? असले कसले सुद्धा विचार डोक्यात येत आहेत. आजच सकाळी मित्रांनी पुन्हा मला ‘तिचा नाद सोड’ या विषयावर तासाभराचे भाषण दिले आहे. मी खूप गोंधळून गेलो आहे. आज सकाळी लवकर उठून देखील वेड्यासारखा अंथरुणात पडून होतो. लेट मोर्निंगच्या बसने आलो. पण ती नाही. कशातच मूड लागत नाही आहे. तसं कालपासून अस होत आहे.

तिच्यावरील राग त्या बिल्डरवर काढला. गेलोच नाही साईट बघायला. रात्री देखील असेच. खूप भलते सलते विचार यायचे मनात. वाटायचे जगण्यात काहीच अर्थ नाही. मी जगातील सर्वात भंगार, वाईट मुलगा आहे. कधी कधी तर माझ्यामुळे तिला त्रास तर होत नाही ना! याची शंका येते. पण मला ती खरंच खूप मनापासून आवडते. दुसरी कोणीच नको वाटते. तीच हवी फक्त. काल, माझ्या मैत्रिणीचा फोन आल होता. परवा तिने मला पहिले होते. असो, मला भेटू असे म्हणत होती. पण मला आता अप्सरा सोडून कोणीच नको वाटते. त्याला मी काय करू? माझे मित्र पुन्हा तेच ‘ती मिळणे शक्य नाही. कशाला वेळ वाया घालतो आहेस?’. पण दुसर्या कोणत्याच गोष्टीत मला रसच वाटत नाही. ते म्हणत होते, मी तिच्या कुठल्याच प्रकारे योग्य नाही.

ती मोठ्या घरातील आहे. तिचे शिक्षण मोठ्या कॉलेजात झाले आहे. पण मी तरी काय करू? आधी जशा मुली आवडायच्या तशी आवडली असती. म्हणजे बसस्टॉपवर एक, बसमध्ये दुसरी, उतरलं की तिसरी आणि डेस्कवर, जाता येता, कॅन्टीनमध्ये दर दहा मिनिटांनी एक. अस आत्ता पर्यंत चाललेले. आणि ज्या आधी आवडल्या त्या देखील छान होत्या. पण त्यांनी मला व्याकूळ करून टाकल नव्हते. आणि त्यांना पाहून देखील दुसर्या छान वाटायच्या. अप्सराला पहिल्यापासून सगळ्याच ‘पाणी कम’. आणि तिच्याशी ‘हाय’ सोडून काहीच बोलता येत नाही. फार फार तर ‘बाय’. आणि नसेल तर कशातच मन लागत नाही.

मित्रांच्या मते ती मला भेटनेच शक्य नाही. कोणाच ऐकू? मित्रांचे? आई वडिलांचे? बहिणाबाईचे? की माझ्या मनाचे? मला सगळे मान्य आहे. की तिच्या लायकीचा मी नाही. पण मला दुसरे तिसरे काहीच सुचत नाही. आणि तिलाही कस सांगू? हिम्मतच होत नाही. आणि तिला मी आवडेल की नाही हे देखील माहित नाही. यार तो जप देखील दोन वरून पाच वर नेला आहे. अजून काय करू? सोडा, पुन्हा माझे डोके दुखायला लागले आहे. कोणीच माझे नाही असंच वाटायला लागले आहे. मला नाही सुचत काही आता. देवाने इतकी छान मुलगी दाखवली? आणि दाखवली तर माझ्या मनात असे विचार का आणले? काहीच सुचेनासे झाले आहे…

Leave a Reply