आजचा दिवस फारच क्लेशदायक गेला. म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, त्यातली गत. कंपनीतुन घरी आलो. आणि थोडा वेळ होतो ते लाइट गेली. पुणेरी भाषेत दिवे गेले. मी ज्या भागात राहतो त्या तिथे अस नेहमी घडते. भागाच नाव बिजलीनगर आहे. नावातच केवळ ‘बिजली’ आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा वीज नसते. वीज नसल्याने मला काही काम करता येणे शक्य नव्हते म्हणुन मी बाहेर माझ्या नव्या शेजर्याशी गप्पा मारत बसलो होतो. तो आहे जळगावचा . जळगावाकरांची मराठी म्हणजे रसाळ, एक लय आणि लाघव. स्वाइन फ्लू वरुन बोलता बोलता विषय निघाला मान मानमोड्याचा.
मानमोड्या आजार तुम्हाला माहितीच असेल. तो एक साथिचा रोग आहे. खर तर हा रोग कोंबडयाना होतो. परंतु मानवाला देखील होवू शकतो. हा साथिचा रोग असल्याने याने देखील अनेक जीव मृत्युमुखी पडलेले आहे. हा रोग रात्रीच्या वेळी जास्त फैलावातो. तो म्हणाला की काही वर्षांपूर्वी त्यांच्या इथे हा रोग पसराल्याची अफवा पसरली. एकाने दुसर्याला आणि दुसर्याने आणखिन तिसर्याला. अस करत करत सगळी कड़े वणव्या सारखी ही बातमी पसरली. मानमोड्या शक्यतो झोपालेल्या माणसाला लगेचच होतो. आणि तो मान टाकून देतो याचाच अर्थ तो मरतो. नावातच याचा अर्थ आहे. त्यावेळी थंडीचे दिवस. आणि त्यात हा रोग पसरला अस समजल्याने लोक खुप घाबरले.
बातमी जिल्हा स्तरीय असल्याने याची फारशी कोणी दखल घेतली नाही. याला त्याच्या एक नातेवाईकाने फ़ोन करून सांगितले. आता आपल्या जवळच्या माणसाने सांगितले म्हटल्यावर विश्वास असणारच ना. झाल लोक झोपायला तयार नाहीत. कारण झोपलो तर कायमचेच झोपू या भीतीने लोक जागे राहिले. रात्र भर लोक जागे होते. कोणी झोप येवू नये म्हणुन टीवी पाहत बसलेल, कोणी गप्पा मारत, कोणी काय तर कोण काय. असे सगळेच रात्र सारवी याची वाट पाहत बसलेले. शेवटी कशी बशी रात्र संपली, आणि सकाळी रेडियो वर बातमी सांगितली गेली की मानमोड्या पसरले ही अफवा होती. झाल म्हणजे रात्र जागून काहीच फायदा नाही. अनेकांची नीट झोप झालेली नव्हती त्यात ही बातमी. त्रागा झाला नुसता. पोलिसांनी कोणी अफवा पसरावली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु फोनच इतके झाले की शोधून काढ़ने शक्य झाले नाही. आणि अशा पद्धतीने त्या मानमोड्याने सर्वांची झोपमोडी केली. अशीच काही परिस्थिती सद्द्याला पुण्यात आहे. त्यात शासन आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावाले अतिरेकी बातम्या दाखवून अधिकच भीती निर्माण करून देत आहे. आणि उगाचच लोकांच्या झोप मोड्यांची काम करत आहे.
Leave a Reply