नोकरीची मुलाखत देण्याआधी पुढील काही सोप्या गोष्टी. त्याचा नक्कीच आपल्याला मुलाखत देतांना फायदा होईल. मुलाखतीच्या स्थानाचे जाण्याचे पर्याय जाणून घ्या. जेणेकरून वेळेत जाऊ शकाल.
साधा फॉर्मल वा फार गडद नसलेला ड्रेसची निवड करा. प्रयत्न हा ठेवा की तुम्हाला व परीक्षकाला अडचण निर्माण होणार नाही. जेणेकरून नकारात्मक छाप पडणार नाही. डोळ्यांना त्रास होईल अशा प्रकारे चट्ट्यापट्ट्याचे कपडे टाळा.
मुलाखत ज्या पदासाठी आहे. कंपनीने दिलेल्या जाहिरातीतील अपेक्षा. त्या क्षेत्रातील माहिती करून घ्या. जेणेकरून मुलाखतीत आत्मविश्वास डगमगणार नाही. अनेकदा माहिती असूनही गडबड होते. प्रवास, वातावरण आणि दडपणामुळे बोलतांना मुद्दे विसरतात. मुलाखतीच्या वेळी लागणारी कागदपत्रे, रिझ्युम, ओळखपत्र जवळ बाळगा. इमेल पाठवल्यास तो सुरक्षा रक्षकाला दाखवा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
लक्षात घ्या मुलाखत केवळ आस्थापनेच्या गरजेनुरुप उमेदवार निवडीसाठी असते. यात एक किंवा एकापेक्षा योग्य उमेदवार निवडले जाऊ शकतात. वा परीक्षकांना योग्य वाटेल त्याची निवड होऊ शकते. हे लक्षात घेतल्यास मनावर येणारे दडपण कमी होऊ शकते.
जे येते त्याची उत्तरे द्या. छाप पाडण्यासाठी इतर गोष्टी करण्याची गरज नाही. माहित नसलेली गोष्ट माहिती आहे असं सांगण्याने भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी सध्यस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रात कशाची मागणी जास्त आहे ह्याचा कानोसा घ्या. आस्थापनेत नेमकं काय काम चालते ह्याची माहिती घेऊ शकलात तर उत्तम.
प्रश्न सोप्यापासून अवघडाकडे जातात. मुलाखतीचा उद्देश केवळ योग्य उमेदवार निवडण्यासाठी असतो. अपवादात्मक स्थितीत परीक्षक स्वतःच्या ज्ञानाशी तुलना करत बसतात. वा खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करतात. परंतु, यात तुमची काहीच चूक नसते. अशा आस्थापनाबद्दल फारसं उत्सुक राहणं मला तरी अयोग्य वाटते.
आपला अभ्यासावर व अनुभवावर सगळं ठरत. त्यामुळे त्यावर अधिक मेहनत घ्या. दडपण अनेकदा येऊ शकत. परंतु शांत राहिलात तर त्याचा सकारात्मक परिणाम नक्की होतो. बहुसंख्य क्षेत्रात मुलाखती ह्या इंग्रजी भाषेतून होतात. परंतु लक्षात घ्या सर्वात शेवटी तुमच्या ज्ञानाचा विचार केलाच जातो. त्यामुळे इंग्रजीकडे आर्थिक संधी म्हणून पहा. सरावातूनच आपण यशस्वी होऊ शकतो.
इंग्रजी वा त्या क्षेत्रात वापरली जाणारी भाषा शिकणे कधीही उत्तम. त्यासाठी वर्तमान हाच सर्वोत्तम काळ असतो. भूतकाळात रममाण होऊन स्वतःला वा वर्तमानाशी तुलना करणे टाळा. जेणेकरून तुमच्या वर्तमानाच्या उत्साहावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
सर्वात महत्वाचे, आधी काय घडले पेक्षा आता हातातील संधी आनंदाने व आत्मविश्वासाने अनुभवा. त्याचा निवडीवर नक्कीच सकारात्मक परिणाम घडतो. एखाद्या वा काही प्रश्नांची उत्तरे आली नाही तर ताबडतोप चिंता करण्याची गरज नाही. आत्मविश्वासू, कामसू लोकांची प्रत्येक आस्थापनेला गरज असते. आत्मविश्वास ही मुलाखत यशस्वी करण्याची गुरुकिल्ली आहे!
Leave a Reply