मला दोन गोष्टी बिलकुलही पटत नाहीत. एक म्हणजे ‘लिफ्ट मागणे’. आणि दुसरे ‘भीक मागणे’. दोन्हीही गोष्टी जरी वेगवेगळया असल्या तरीही साम्य आहे. रोज रस्त्याच्या कडेला हे ‘दीन’करराव हात दाखवत उभे असतात. का कुणास ठाऊक, मेहनतीचा कंटाळा येतो! की लागलेली सवय! दुसऱ्याच्या मदतीवर विसंबून राहतात. भीक मागणारे भिकारी जसे नशिबाच्या समोर गुढगे टेकून, आपला आत्मसन्मान गहाण टाकून दुसऱ्यांकडे ‘याचना’ करतात. तसे हे ‘लिफ्ट’वाले, आळसासमोर गुढगे टेकून, कोणी तरी लिफ्ट देईल या आशेने रस्त्यावर उभे.
बर चांगले धडधाकट. एकवेळ वयोवृद्ध आहेत, अपघातग्रस्त आहेत. तर बाजूने जाणारा आपसूकच मदतीला धावून जातो. हे बघाल तर, नुकतीच मिसरूढ फुटलेले. कधी कधी तर शाळकरी मुले सुद्धा , रस्त्याच्या कडेला हात दाखवत उभे असतात. बर, त्या रस्त्यावरून सिटी बसेसचा अभाव आहे. आजूबाजूला विरळ वस्ती आहे. अस असेल तर गोष्ट वेगळी. पण, हे बस स्थानकात उभे राहून तर कधी चौकात उभे राहून हात दाखवतात. हे असले ‘आळसकुमार’ पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते.
मदत मागणे म्हणजे काही गुन्हा नव्हे. हे मला मान्य आहे. पण देवाने चांगले दोन पाय, दोन हात आणि विशेष म्हणजे त्यावर एक ‘डोक’ फ्री दिले. अस असून देखील ते फक्त मोबाईलची गाणी बदलण्यासाठी किंवा आलेल्या मेसेजचा रिप्लाय देण्यासाठीच त्याचा वापर हे आळसकुमार करतात. असो!
Leave a Reply