ग्रामगीता:
परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज
मराठी | संकेतस्थळ विकसक
ग्रामगीता:
परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज
ग्रामगीता :
ज्यासि तुझें दर्शन घडलें ।
त्यास कैंचे परके राहिले? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें ।
दिव्यपणीं ॥११॥
– संत तुकडोजी महाराज
अर्थ: ज्याला तुझे दर्शन झाले त्याच्यासाठी कोणी अनोळखी आणि अज्ञात असू शकते? संपूर्ण विश्वाची आपले असे जिवंतपणी वाटू लागते!
ग्रामगीता – अध्याय पहिला १०
जेव्हां तुझे दर्शन घडे ।
उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे? ॥१०॥
– संत तुकडोजी महाराज
अर्थ: हे सद्गुरु भगवंता जेव्हा तुझे दर्शन घडते तेव्हा सर्व अज्ञानांचा मुळापासून नाश होतो आणि आमचे मि तु पणाचे, अहंपणा चे पोवाडे सर्व नष्ट होतात तेथे फक्त करता आणि करविता भगवंतच आहे अशी भावना होते.
अर्थ: हे देवा, तुझ्या परिपूर्णतेची ही शक्ती अद्याप आमच्यात नाही, त्यामुळे अज्ञान अद्याप प्रचलित आहे.
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि ।
अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली ।
आम्हांपाशी ॥९॥
– संत तुकडोजी महाराज
त्यासि नाही उरला भ्रम ।
विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म ।
पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: ज्याची भावना आपणच विश्वरूप आहे आणि विश्व आपल्यात आहे. सर्व आपण एकच आहोत असा ज्याचा विश्वास झाला आहे. तो मनुष्य त्याचे विचार अत्यंत विश्व कल्याणकारी असतात आणि अशा महात्म्य कडून जे जे कर्म घडेल ते ईश्वराची पूजा ठरते.
हें जयाचिया अनुभवा आलें ।
त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें ।
ओळखलें म्हणोनिया ॥७॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: महाराज म्हणतात हे ज्याच्या ध्यानात आले अनुभवास आले. त्याचे जन्म दुःख व मरण दुःखाचा अंत होऊन. त्याने आत्मस्वरूप जाणले आहे.
गुरूशिष्य एकाच स्थळीचे ।
भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे ।
रंग रंगणी आणावया ॥६॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
नाना चातुर्यकला – व्यापें ।
आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें ।
भक्तिफळ दावी ॥५॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
गणेश , शारदा आणि सदगुरू ।
आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू ।
आपणचि जाहला ॥४॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: हे भगवंता गणेश ही तूच आहेस शारदा ही तूच आहेस आणि सद्गुरु ही आमचा तूच आहेस. आमच्या भक्तांचा कल्पतरू तूच आहेस. नारद तुंबर देव-देवता ही तूच आहेस!
आपणचि मंदिर , मूर्ति , पूजारी ।
आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी ।
आपणचि देवरूपें अंतरी ।
पावे भक्तां ॥३॥
~ संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)