स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते. (more…)
कॅटेगरी: नोंद
पत्रकारिता एक धंदा!
काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली मोठ्ठी बातमी मिळाल्याचा आव आला आणि प्रत्येक चॅनेल/वृत्तपत्राचे पत्रकार धपाधप बातम्या टाकू लागले. (more…)
व्यवसायातील कानगोष्टी
गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत पडायचं कशासाठी हा त्यांचा प्रश्न होता! (more…)
राजकीय भूमिका आणि आपण
अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे. (more…)
दिनक्रम
दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे. (more…)
मोदी भक्तांची लक्षणे
मोदी भक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे! भक्तांचे पहिले लक्षण! ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न! त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते! आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात. (more…)
कोणता व्यवसाय करू?
व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे. (more…)
सरकार आणि आपण
सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते. (more…)
मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण
मराठी ची गळचेपी होते. हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून होत. मी गेल्या काही वर्षातील अनुभव सांगतो. इतरांचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळेच मते वेगळी असतात. त्यामुळे नाकारण्याचे कारण नाही. (more…)
ग्रामगीता अध्याय पहिला १
ॐ नमोजी विश्वचालका !
जगदवंद्या ब्रह्मांडनायका !
एकचि असोनि अनेकां ।
भासशी विश्वरूपी ॥१॥
~ संत तुकडोजी महाराज!
अर्थ – हे ओमकार रुपी भगवंता तुझा आकार हा ओमकार रुपी आहे. हे ओंकार रूप तुझे सर्व विश्वात भरून आहे. तू जगात वंदनीय आहे. तू ब्रह्मांडनायक आहेस. तरीही तू एकच सर्वात वसलेला असून तु अनेक रूपी आहे. असेही भासत आहेस.