[polldaddy poll=8488174] (more…)
कॅटेगरी: नोंद
महाराष्ट्र कुणाचा??
खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.
इतिश्री समाप्ती
इतिश्री समाप्ती. बऱ्याच दिवसांपासून ठरवतो आहे. आज, तेच सांगायचं ठरवून आलो आहे. वर्डप्रेसच्या होस्टिंगवर ब्लॉग करण्यापेक्षा स्वतःचा एक नवीन ब्लॉग बनवावा अस म्हणतोय. बऱ्याच दिवसांनी ‘दर्शन’ देतोय. म्हणून विषय सुरु करण्याआधी क्षमा मागतो. खर तर हा ब्लॉग म्हणजे आठवणी. दोन तीन वर्षापूर्वी तर जीवनाचा एक भाग बनून गेलेला. नंतर मग.. सगळंच बदललं. (more…)
नवीन ब्लॉग
नवीन ब्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी बोलतो आहे. खर सांगायचं झालं काय बोलावं यावर बराच वेळ विचार केला. पण काहीच सुचेनासे झाले आहे. आजकाल.. जाऊ द्या ते. ह्या वर्डप्रेसमध्ये रजिस्टर करून पाच वर्षे झाली. म्हणून म्हटलं आज बोलूयात. गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले. त्याचा ‘चित्रपटच’ डोळ्यासमोर धावला. म्हणजे या ब्लॉग बाळ ‘पाचवीत’ जाणे अजून बाकी आहे. बाकी बोलूच…
प्रश्न
प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. (more…)
प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?
उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले. (more…)
भगवंताची उणीव
जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची. (more…)
मन म्हणजे..
मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. (more…)
मी स्वतः
एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले. (more…)