प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला अपडेट्स. (more…)
कॅटेगरी: नोंद
गाढवा…
त्याला बिग बॉस आवडत नाही,तिला बिग बॉस आवडतो.
दहा वाजून गेल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण बिग बॉस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
एक छोटी बातमी डोंगरा एवढी..
रात्री एक भयानक घटना घडली. घडलेली घटना खर तर खूपच चीड आणणारी होती. कोणत्याही व्यक्तीच (राजकारणी सोडून) डोके फिरेल अशी होती. बातमीने सारा देश हादरला. झालं! निमित्त सापडलं. ‘सबसे तेज..’ वाल्यांपासून ते ‘एक पाउल पुढे..’ पर्यंत सर्वांनीच त्या बातमी रुपांतर ‘टीआरपी’ मध्ये बांधण्याचा चंगच केला. (more…)
रामाने फळे आणली.. मिडीया स्टाईल
आजच्या मिडीया / भेडिया ‘रामाने फळे आणली’ या वाक्याची बातमी करायची झाल्यास…
सकाळ – अखेर रामाने फळे आणली.
महाराष्ट्र टाईम्स – रामाने फळे आणली?
लोकमत – नाईलाजास्तव रामाने फळे आणली.
सामना – रामाने फळे आणली. सर्वत्र जल्लोष.
पुढारी – रामाने फळे, फुले आणली.
टाईम्स ऑफ इंडिया – रामाने केवळ फळेच का आणली?
डी एन ए – रामाने फळेच आणली.
टाईम्स नाऊ – रामाने फळे कशासाठी आणली?
आज तक – ब्रेकिंग न्यूज : रामाने फळे आणली..
दूरदर्शन – राम आज फळे घेऊन आला.
आय बी एन लोकमत – रामाने टोपलीभर फळे आणली.
झी चोवीस तास – झी चोवीस तास इफेक्ट : रामाला फळे आणावीच लागली.
एन डी टीव्ही इंडिया – राम फळे घेऊन परतला.
इंडिया टीव्ही – रामाने परत फळेच आणली..
आस्था – रामाने फळांची भेट आणली..
मिडीया 🙂
फिल्मी भक्ती
भयानक फिल्मी भक्ती आहे. सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो. (more…)
जोडधंदा
गेले काही दिवसांपासून विचार करतो आहे. किती दिवस असे दुसर्याच्या मळ्यात मजुरीची कामे करायची? दुसर्याची शेती कितीही कसली तरी, येणारे उत्पन्न त्याचे आणि मिळणारा मोबदला त्यामानाने पोटभर अन्न पुरवणारा. आणि समाधान नाही. त्यामुळे सोबत काहीतरी जोडधंदा करावा अस वाटते आहे. (more…)
वाघिणींनो
वाघिणींनो! गेले काही दिवस जे चाललंय ते पाहून बोलल्या वाचून रहात नाही. कसली ती आंदोलने आणि कसल्या मेणबत्या! ही काय न्याय मागायची पद्धत आहे? हे म्हणजे अस झालं की आपल्या घरात सुरक्षित राहता यावं म्हणून घराबाहेरील व्यक्तीकडून अपेक्षा करणे. आपल्या पूर्वजांनी काय हे केलेलं. ती झाशीची राणी, ती काय इंग्रजांपुढे झाशीसाठी आंदोलने किंवा मेणबत्त्या लावत बसली? (more…)
मुलगी झाली
एक गोड बातमी आहे. मुलगी झाली. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला. (more…)
आता तरी देवा आम्हाला..
हे क्रिकेटच्या देवा! हे मनोहरा, हे गोलंदाज निर्दालक, हे संकटमोचक! आम्हा तुझ्या भक्तांना तू खेळपट्टीवर उभा राहून, तुझ्या फळी नामक वज्राची तीक्ष्ण धारेने गोलंदाजांची व समोरील उभा ठाकलेल्या संघाची दाणादाण उडव. तुझ्या लयबद्ध आणि एखादया गायकाच्या आवाजाचा खोलावा जाणावा आणि त्याने श्रोत्यांचे मन तृप्त व्हावेत. त्याप्रमाणे तुझ्या फलंदाजीची मनमोहक फटकेबाजीने आम्हाला तृप्त कर. (more…)
एक थी मांजर
एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. (more…)