काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेब नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव. (more…)
कॅटेगरी: नोंद
लिफ्ट
मला दोन गोष्टी बिलकुलही पटत नाहीत. एक म्हणजे ‘लिफ्ट मागणे’. आणि दुसरे ‘भीक मागणे’. दोन्हीही गोष्टी जरी वेगवेगळया असल्या तरीही साम्य आहे. रोज रस्त्याच्या कडेला हे ‘दीन’करराव हात दाखवत उभे असतात. का कुणास ठाऊक, मेहनतीचा कंटाळा येतो! की लागलेली सवय! दुसऱ्याच्या मदतीवर विसंबून राहतात. भीक मागणारे भिकारी जसे नशिबाच्या समोर गुढगे टेकून, आपला आत्मसन्मान गहाण टाकून दुसऱ्यांकडे ‘याचना’ करतात. तसे हे ‘लिफ्ट’वाले, आळसासमोर गुढगे टेकून, कोणी तरी लिफ्ट देईल या आशेने रस्त्यावर उभे. (more…)
इस्लाम खतरेमें
इस्लाम खतरेमे! आम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले. (more…)
सुपर अचिव्हर
कोण म्हणते ‘अंडर अचिव्हर’? ‘टाईम’पास करू नका. तुम्ही तुमच्या एवढ्या टायमात जे करू नाही शकला ते, आमच्या एकट्या ‘सिंग’ने करून दाखवले. उद्या कदाचित जग ‘ओबामा’ला विसरेल पण ‘सिंग’ यांना विसरणे शक्य नाही. हो! खरंच.. काय केल काय त्या ओबामाने? एक लादेन.. बस्स. आणि म्हणे, गांधीजींचा ‘अवतार’. नावात सिंग असून देखील अजून कसाब आणि गुरु जिवंत आहेत. तस् म्हणाल तर ही सुद्धा एक अचिव्हमेंट नव्हे काय? (more…)
आदर्श देशा
देशाने आदर्श घ्यावा अस ‘महान’ राज्य. राष्ट्रीय नेत्यांना लाजवेल असे या राज्याचे ‘आदर्शवादी’ नेते. मी तर म्हणतो, या आदर्शवत राज्याचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांना, या सरकारला आणि विशेषतः सरकारी कर्मचारी, नाही चूक झाली. या सरकारी ‘जावई’बापूंना ‘भारतरत्न’ कमी पडेल म्हणून, ‘आदर्शरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. खर तर, या महान आणि अनमोल नेते, जावई बापूं मंडळींचा महीमा माझ्यासारख्या बापुड्या ‘आम आदमी’ काय वर्णावा?
अनुभव
खर तर ‘केलेल्या चुका’चे गोंडस समानार्थी शब्द कोणता असेल तर तो ‘अनुभव’. म्हणजे, जसे एखाद्या औषधाच्या गोळीला बाहेरील आवरण साखरेप्रमाणे गोड असते तसे. प्रत्येक जण आयुष्यात नित्यनियमाने ‘चुका’ ह्या करीतच असतो. त्यातूनच तो शिकतो. काय ‘नाही’ केल्यावर गोष्ट ‘अचूक’ बनते. हे कळल्यावर तो ‘अनुभवी’, ‘कुशल’ वगैरे बनतो. (more…)
भ्रष्टमेव जयते
भ्रष्टमेव जयते! हाईला! तू तू.. तुम्ही नाव पाहून गडबडला? नाही नाही.. ‘शो’च नाव नाही बदललं. तो कार्यक्रम असणार. रविवारी! होता है! होता है! आणि होणार. हा त्याच पद्धतीचा, पण थोडा, वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा. चिंता करू नका अरेs ‘आल ईझ हेल’. मला ओळखले ना? मी आपल्या सर्वांचा लाडका ‘गरीब खान’. या कार्यक्रमाचा होस्ट. या निर्दयी, निष्ठुर आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस जनतेच्या त्रासाने त्रासलेल्या नेत्यांच्या ‘मन’मध्ये काय चाललेलं. त्यांच्या ‘महान’ आणि ‘आदर्श’ कृत्यांच्या आढावा त्यांच्याच तोंडून. त्यांनी केलेल्या विकासाच्या (स्वतःच्या) आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी. मला खात्री आहे, हा माझा नवीन ‘शो’ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला, एका ब्रेकची वेळ झाली. (more…)
चाकरी
‘चाकरी’ आणि ‘गुलामी’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य वाटेल! परंतु सत्य हेच आहे. पूर्वीच्या काळी धनाढ्य लोक त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ‘गुलाम’ खरेदी केले जात. खरेदी केलेला ‘गुलाम’ हा माणूसच असे. परंतु त्याने आपला ‘मालकाची’ सर्व कामे. त्याच्या इच्छेनुसार कराव्या लागे. मालकाची वर्तणूक कशीही असो. त्याने कितीही अत्याचार, अन्याय किंवा अपमान करो. ‘गुलाम’ माणसाला त्या सोसावेच लागे. मालक जे देईल (देईलच अशी शाश्वती नाही) ते खायचे. मालक म्हणेल तीच ‘पूर्व’. (more…)
परीक्षांचा निकाल
दर वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर ‘परीक्षांचा’ उन्हाळा सुरु होतो. या उन्हाळ्याच्या झळा जवळपास सर्वांनाच बसतात. छोट्या छोट्या बालांपासून ते त्यांच्या मोठ मोठ्या आई बाबांना. काहींच्या तर आजी आजोबांना देखील. जून महिन्यात मग सुरु होतो पावसाळा ‘परीक्षेच्या निकालांचा’. काहींचा पुरता ‘निकाल’ लागतो. काही हा पावसाळा आनंदाने साजरा करतात. परंतु, काही मात्र जाम ‘आजारी’ पडतात. (more…)