आजकाल मनात हे रोज विचार येतात की, जगून काय फायदा? म्हणजे हे आयुष्य कशासाठी? जन्माला येतो. पण कशासाठी? प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड. आणि ती गोष्ट मिळवली की, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड. ह्यालाच आयुष्य म्हणतात? बर ते सुख. कोणताही सुख क्षणिकच असते. दुख देखील क्षणिक. पण प्रश्न सुख किंवा दुःखाचा नाही आहे. प्रश्न आहे आयुष्याचा. म्हणजे जन्माचा उद्येश काय हेच कळत नाही. (more…)
कॅटेगरी: नोंद
जय बंदी
बोला, जय बंदी! आजींचा कालचा लाल किल्ल्यावरील तो सोहळा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आता मला जाम विश्वास बसला आहे की, कायदा कोणीही ‘हातात’ घेऊ शकत नाही. काय ते भाषण आणि काय ते संचलन. आजींचे भाषण मी मन लावून नेहमीच ऐकतो. काय गडकरी साहेब? तुम्ही काय फडतूस विषय घेता. म्हणे तिरंगा फडकवणार लाल चौकात. कळल न! आता पुन्हा असला वेडेपणा करू नका. तस् म्हटलं तर मी तुमच्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही. परंतु, यावेळी मात्र मुद्दा चुकीचा होता, म्हणून बोलतो आहे. काय गरज होती तिरंगा फडकावयाची? आणि फडकून काय मिळणार होत? (more…)
दिल्ली दरबार
महाराज दिल्ली च्या दिशेने निघाले. महाराज दिल्ली मधील बडी बेगमच्या दरबारी निघाले ही बातमी अख्ख्या बारामतीच्या गडावर वार्यासारखी पसरली. दिल्लीला सोबती म्हणून महाराजांनी ‘उ’पटेल आणि बाळ राजांना सोबत घेतलं. ‘स्व’राज्याचा कारभार करण्याच्या सूचना सरदारांना केल्या. महाराज दिल्ली दरबारी निघाले. महाराजांवरील प्रेमाची पावती म्हणून, कोणी धान्यापासून तयार केलेली वाईन, कोणी ‘सकाळ’ वर्तमानपत्र, तर कोणी क्रिकेटची बॅट. महाराजांनी दिल्लीला कूच केली. महाराजांचे विमान दिल्ली मध्ये उतरले. सकाळचा गारठ्यात महाराज दहा जनपथच्या दरबाराच्या बाहेर पोहचले. बाळ राजे आनंदून ‘महाराज, हा पथ दहा लोकांसाठीच आहे का?’. (more…)
प्रेम रोग
आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. (more…)
फ्लेक्स
मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते. ‘तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय बॅनर/भित्तीपत्रके असतात. एका बिल्डरची जाहिरातीत संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या बॅनरवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. (more…)
रेशन ते स्टेशन
माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी रेशनकार्ड काढले तो किस्सा? सोडा, मी सांगतो. बहुतेक, हो! ८ मे २००९ मध्ये मी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तो नवीन रेशनकार्डसाठी फॉर्म भरला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून! त्या तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तो व्यवस्थित तपासला. आणि पंधरा जून नंतर या अस सांगितले. (more…)
आई ग
किती सतावते यार ही आई! गेले किती वर्षांपासून हे चालू आहे. प्रत्येक रुपात ती त्रास देते. आतापर्यंत नऊ अवतार झाले तिचे. बाबा ‘बिल्लू’ गेटच्या बाहेर का नाही हाकलून देत? गेले एक आठवड्यापासून एक पिल्लुसा टास्क करतो आहे. तरीही त्या आईच्या बाळ ‘बग’मुळे तो लांबतच चालला आहे. प्रत्येक डिझायनर आणि डेव्हलपर आयुष्यातील सर्वात जास्त वेळ आईच्या मस्तीखोर ‘बग’ सुधारण्यात घालवतो. बाकीचे कसे, म्हणजे फायरफॉक्स उर्फ मोझीला किंवा बाळ क्रोम. हव तर सफारी, ऑपेरा घ्या. कस समजुदारपणे आणि नीटनेटके काम करतात. (more…)
इंग्रजी भाषा
मी आज एक इंग्रजी भाषेत नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे. (more…)
‘न’कला
‘न’कला. आज दुपारी एका चित्रकलेच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो. तिथल्या एका कोर्सला अडमिशन घ्यायचे ठरवले आहे. एकतर माझ्यात नाही कला! नुसत्याच ‘न’कला. बर, मी जे काम करतो. हे खर तर आर्टिस्ट लोकांनी करावयाची कामे. मी त्यात घुसखोरी केली आहे. वेब डिझायनिंगसाठी किंवा कुठल्याही ‘डिझायनिंग’साठी ‘डिझाईन’ बॅकग्राउंड असलेला हवा असतो. माझ तसं काहीच नाही. बर मी जे कोडींग करतो, त्यातही ‘घुसखोरीच’. त्यामुळे फार दिवस घुसखोर म्हणून राहायचे नाही. एक चित्रकलेचा तीन महिन्याचा बेसिक कोर्स करतो आहे. शाळेत जेवढी चित्र-विचित्र काढली तेवढीच! आणि त्यानंतर साधी पेन्सिल देखील हाती घेतली नाही. (more…)
खड्डास्थान
हा देश खड्डास्थान आहे. किती ते खड्डे! आणि काय तो देश! आपला देश खरोखर धर्मनिरपेक्ष आहे. जगाने धर्मनिरपेक्षता काय असते हे आपल्या देशाकडून शिकले पाहिजे. आज मला आपल्या सरकार आणि प्रशासनाचा अभिमान वाटत आहे. ते जे म्हणायचे ना की, हा देश हिंदूंचा नाही. तेच खर आहे. हा देश आहे खड्ड्यांचा. इथे अनेक जाती, पंथ आणि धर्म आहे. खूप विविधता आहे. पण ते प्रतिज्ञेत आहे ना ‘विविधतेत एकता’, त्याचा अर्थ आता समजतो आहे. (more…)