कॅटेगरी: नोंद

बाकी शून्य

शून्य नेहमी विचार करतो की मी ‘शून्य’च का? माझे मूल्यही शून्य का? गणिताच्या ह्या विश्वात, मला कधीच का कोणी नाही मिळणार, ज्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो अंक सर्व काही असेल. एके दिवशी अपघाताने शून्याला दहा अंक मिळाला. त्याच्या सोबत राहून शून्याची किंमत वाढली आणि त्या दहा अंकाची देखील. पण थोड्याच क्षणात गणिताचे नियम बनले आणि तो ते नऊ हेच अंक मुलांक म्हणून ग्राह्य  धरले गेले. आणि त्यामुळे बाकी शून्य राहिला. (more…)

संकल्प

संकल्प ही जगातील सर्वात विनोदी गोष्ट आहे. हो! पण मी हा विनोद करीत नाही आहे. प्रत्येक जण हा विनोद दरवर्षी करीत असतो. दरवर्षाच्या सुरवातीला संकल्पांचा ऋतू सुरु होतो. साधारण जानेवारी महिन्यात सुरु झालेला हा ऋतू याच महिन्यात संपून देखील जातो. त्यामुळे मला, संकल्पाला काही अर्थ नाही अस पटलेलं आहे. आता सरकार नाही का करीत हा विनोद दर पाच वर्षाला! त्या ‘अर्थसंकल्पाला’ काही ‘अर्थ’ असतो? नुसत्या गप्पा. (more…)

पहिला दिवस

काल या नव्या कंपनीचा पहिला दिवस होता. आता दिवस म्हणू की रात्र? म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त! (more…)

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त! बस झाली रे! ही रडारड. ब्लॉग भिजला आता. फार नको, आता नक्कीच ‘ओव्हर डोस’ झाल आहे. गेले तीन दिवसांपासून म्हणजे ३१ डिसेंबर पासूनच किती ते फोन, आणि किती ते मेसेज! खरच आता हे सगळ पाहून घरात कोणीतरी गेल्याप्रमाणे वाटत आहे. उगाच फार झाले तर ब्लॉग उघडल्यावर तुमच्या संगणकाच्या मॉनिटरला त्रास होईल. चला ठीक आहे. ह्या जन्मात नाही जमल! पण पुढच्या, काय म्हणतात ते ‘पुनर्जन्मात’ मी जीवन नावाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला उर्फ देवाला मला हेमंतचा ‘रोल’ नको म्हणेन. (more…)

३१ डिसेंबर

काय दिवस होता. कधीही आयुष्यात हा दिवस विसरणे शक्यच नाही. आणि खर बोलायचे तर मलाही विसरायचा नाही हा दिवस. मला माहिती आहे. जे घडायचे होते तेच घडले. पण ते ज्या पद्धतीने घडले, ते तसे घडेल अस कधीच वाटले नव्हते. आणि माझी तिला मनातलं सांगायची देखील इच्छा पूर्ण झाली. मला माहिती आहे, हे सांगायला खुपच जास्त वेळ गेला. कदाचित कधीच बोलू शकलो नसतो. आणि मनात राहून कुढत बसलो असतो. पण हे सर्व, जे घडले याचे श्रेय फक्त तुम्हालाच आहे. खरच तुम्ही नसता तर ‘काहीच’ घडल नसत. आणि तिच्याबद्दल काय बोलू? तीच मन खरच खूप मोठ आहे. (more…)

सांगू??

सांगू? काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, अशी नाटके. यार माझा डीएम जाम नाटकी आहे. अजून तीन वर्ष थांब आणि तुझे शिक्षण कर. मग मी तुला पे रोलवर घेतो. अस म्हणत होता. (more…)

एक मोती गळाला

ती आज का नाही आली? तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत? ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस! आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना! (more…)

जाणता भजा

जाणता भजा! दरबार सुरु होण्याची वेळ होते. ‘स्व’राज्यातील सर्व सरदार आणि महाराजांचे ‘आम आदमी’ जमा होतात. कुजबुज चालेली तेवढ्यात, घड्याळाचे दोलक जोरजोरात वाजायला सुरवात होते. सर्वजण हातातील घड्याळे छातीवर ठेवतात. दरबारात शांतता पसरते. दारावरील दोन सैनिक मोठमोठ्याने महाराज आल्याची घोषणा करतात. ‘प्रौढ प्रताप बंदर! बिल्डर, चोर, घोटाळे प्रतिपालक! शेतकरी कुलावतंस कृषीसानाधीश्वर, महाराजा अधिराज! शी शी शी भाव वाढपती सरद महाराज !!’ सर्वांच्या मान झुकतात. डाव्या हातात फाईलीचे बंडाले आणि डोळ्यावरील जाड भिंगाचा चष्मा, ते साडेपाच इंचची मूर्ती दरबारात दाखल होते. सिंहासनावर बसल्यावर सर्वजण माना वरती करून महाराजांकडे पाहू लागते. महाराज दरबाराकडे एक नजर टाकतात. आणि पहिली ‘टीक’ करा असा आदेश देतात. एक ‘आम आदमी’ समोर येतो. महाराजांना मुजरा करून उभा राहतो. महाराज त्याच्याकडे पाहून ‘बोल’. (more…)

भाषा

भाषा! माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात. (more…)

निर्णय

निर्णय! ‘बायको’चा फोन आलेला. म्हणाली ‘घटस्फोट नको करूयात’. बर, मी नको म्हणालो तर अप्सरापासून दूर जाणार. आणि ‘हो’ म्हणालो तर, या इथे ‘मेव्हणी’ सोबत राहावे लागणार. पण आता फरक फक्त एवढाच असेल की, आधी मी ‘भाड्याच्या’ घरात होतो. होतो कसला, म्हणजे ‘न घरका ना घाटका’ होतो. ना मेव्हणीचे घर माझे होते. आणि ना बायकोचे घर माझे होते. थोडक्यात, बायको आता ‘घरात’ घ्यायला तयार झाली आहे. पण रहायचे मेव्हणीच्या घरी. तस मी तिला बजावलं की, मला दोन स्थळांचा होकार आहे. बघुयात ‘हुंडा’ किती देते ती. (more…)