चायनीज! आम्ही चिनीमातीच्या ‘लाल’ चिंग च्यांगचे जाहीर आभार मानतो. सर्व चिंग च्यांग आणि चिंगीने जो लाल आणि पिवळा आणलेला महापूर पाहून आम्ही देखील गदगद झालो आहोत. काय प्रेम म्हणावे? प्रत्येक रस्त्याच्या कडेला तुमचे प्रेम पाहून आम्ही ‘लाल’ होणार नाहीत तर नवलच. ती आमच्या लोकांची रस्त्याच्या कडेला उभा राहून ‘करण्याची’ सवय यामुळे नक्कीच कमी झाली असेल. काय बोलाव! पहा ना, किती महान काम केलंत, अन्नाचे विविध पदार्थ कसे असतात, हे आम्हाला माहीतच नव्हते. कितीही नावे उच्चारता आली नाहीत तरी पदार्थ एकाच पद्धतीचा. त्या शेवया आणि ते सूप, आणि त्या दोन काड्यांनी खायची पद्धत. वाह वाह! किती व्यायाम होतो. भूकही वाढते. त्यामुळे खाल्लेलं पचते देखील. पोट बिघडू नये, हेच बहुदा त्यामागील लॉजिक असावे. नाहीतर आम्ही, हाताने पट्टा सुरु. (more…)
कॅटेगरी: नोंद
विषय
वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो. (more…)
घटस्फोट
घटस्फोट! खूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा? ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे.
सासरी आल्यापासून, म्हणजे पहिल्या महिन्यात हनिमूनचा सॅडमून केला. हे जुने ‘मंगलसूत्र’ दिले. घराच्या चाव्याही जुन्याच. कामही तसेच. सासूबाई कायम पाणउतारा करायच्या. नवीन स्थळे माझी पत्रिका पहायच्या. पण पाहण्याचा कार्यक्रम होताच नसायचा. बर एक घरंदाज स्थळ मागे लागलेलं. पण मी इतका ‘फ्लेक्स’बल नाही तिच्या कामात. शेवटी काल त्यांचा दुपारी कार्यक्रम झाला. फार फार तीन मिनिटांचा. त्यांना मी माझा स्पष्ट नकार सांगितला. त्यानंतर रात्री त्या नव्या स्थळाचा कार्यक्रम ठरलेला. नऊ वाजता ओबामाच्या गावातील थोडक्यात ‘युएस’चे स्थळ आले.
जवळपास चाळीस मिनिटे कार्यक्रम झाला. आता मुलीच्या आईला मी पसंत आहे. अजून मुलीला मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. पण नेटवर तिचे रूप पहिले आहे. इतकी सुंदर नाही आहे. पण ठीक आहे, चालेल मला. बस तिच्या वडिलाच्या फोनची वाट पाहत आहे. बस एकदा ‘हुंड्याचे’ बोलून झाले म्हणजे फायनल. त्यांनी होकार कळवला की, मी इकडे घटस्फोटाची तयारी करतो. पुढील महिन्यात, बार उडवून टाकील. चला खूप मोठ काम झाल आहे. म्हणजे त्याच्या होकारानंतर मी ‘अप्सरा’ला मनातील सांगून टाकील. असो, उत्तर तर स्पष्टच आहे. पण तरीही, तिला मनातील सांगेन. मागील दोन दिवस कसे गेले म्हणून सांगू. ढकलले.. आज ती किती छान दिसते आहे ती! खूप खूप छान! मला तर तिला पाहून आताच कंट्रोल होत नाही आहे. काय यार, ती अजून एकदाही माझ्याकडे साधे पहिले नाही. बोलायचे तर दूरच आहे. बस एकदा होकार आणि ते प्रेमपत्र येवू द्या. तिला मनातील सांगून टाकील. आणि हिला ‘घटस्फोट’.
स्वभाव
स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही.आपले वागणे
स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते.
माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच.
काल मैत्रिणीला दिलेला पेन ड्राईव्ह आणायला गेलो होतो. निघतांना काकूंना, फराळाला या अस म्हटलं. लगेच माझी मैत्रीण ‘फक्त काकूच का?’ अस म्हणाली. मैत्रिणी बद्दल काय बोलावं? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते.
माझा स्वभावाबद्दल थोडक्यात बोलायचे झाले तर, ‘जशास डबल तसे’ असा आहे. आता नेमक कसं सांगू? माझा पीएम यावर नीट बोलू शकेल.
अप्सरा खुपंच रागीट आहे. राग नाकावर असतो. प्रत्येक जण जितका प्रेमळ तितकाच रागीट असतो. जितका चांगला तितकाच वाईट देखील.
आपण आपल्यातील वाईट रूप लपवून ठेवतो. आईचा स्वभावात सडेतोडपणा! जे आहे ते तोंडावर सांगणे. माझे वडील काही बोलत नाही. आपल्या कृतीतून दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावाच विशेष आहे.
स्वभाव बदलणे खुपंच अवघड आहे. थोडक्यात आपण स्वतःला नवीन रूप दिल्याप्रमाणे असते. गांधीजींनी गोळी खाल्ल्यावर ‘हे राम’ म्हटले. कदाचित राहुल बाबा ‘हे मॉम’ म्हणेल.
जसे आपण असतो तसे दिसतो. काही व्यक्ती पाहिल्यावर आपल्याला नकोसे वाटते. तर काही ‘लव्ह एट फस्ट साईट’.
प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून असते. स्वभावसारखे असतील तर मैत्री होते. काहींचा स्वभावच मनमिळावू असतो. त्यांचा मित्रपरिवार बनतो. काहीजण एकलकोंडे.
शेवटी सगळंच स्वभावावर अवलंबून असते. म्हणजे जर बुशचा स्वभाव आपल्या मनमोहनसिंग सारखा असता तर.. अमेरिकेत अजून दहावीस इमारतीवर विमाने येऊन धडकली असती.
वातावरण आणि परिस्थिती यावर स्वभाव बनतो. काहींना घराचा सहवास कमी मिळाला तर त्यांना ‘घराबद्दल ओढ’ निर्माण होते. काहींचे अगदी उलटे.
थोडक्यात, मला फक्त अस म्हणायचे आहे की स्वभाव आपल्याला सुधारू अथवा बिघडून टाकू शकते.
एकदा तरी
एकदा तरी! मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू? ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही’ असा जप सुरु करतो. किती कठीण आहे यार हे माझे मन. माझेच ऐकत नाही आहे. (more…)
चूक करू नका
सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, आपण आनंदी होतो. ती दोन शब्द बोलली की आपल्याला गगन ठेंगणे वाटायला लागते. कुठून तरी एक शक्ती, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आकर्षित करीत राहते. आपण इतके बुडून जातो की, स्वप्न आणि वास्तव यातील फरकच आपण विसरून जातो. (more…)
झूट आहे..
रात्री घरी आल्यावर जेवायला बसलो. सहज टीव्हीवर काय लागले पहावे म्हणून सुरु केला तर त्यावर तो ‘राजू बन गया जंटलमन’ लागलेला. आणि त्यात शारुख खानला नोकरी मिळते तो सीन. झालं चित्रपटातील गाणी आणि जाहिराती सोडल्या तर पंधरा मिनिटांत त्याला त्याच्या बॉस प्रमोशन देतो. आणि बॉसची मुलगी ह्याच्या प्रेमात देखील पडते. आणि इकडे त्याची पहिली प्रेमिका जुही चावला नाराज होते. त्यात त्या नाना पाटेकरचा ‘लडका लडकी’चा डायलॉग. थोडक्यात प्रेमात पडले की, हृदय तुटण्याचे चान्सेस जास्त. चॅनेल बदलला तर, गोविंदा ‘हद कर दी आपने’ चित्रपट. त्यातही हेच ती राणी मुखर्जी त्या गोविंदाच्या मागे धाव धाव धावते. गाण्याचा चॅनेल लावला तर, ते अक्षयकुमारचे ‘नखरे’ गाणे सुरु. गाणे मस्त आहे. (more…)
शेवट
असो, फार काही बोलण्यात आता काही उरले असे वाटत आहे. आज दुपारी मी डीएमला भेटून आलो आहे. त्याने स्पष्टपणे सांगिलते आहे की, माझ्या ‘महान’ शिक्षणामुळे कंपनीच्या पे रोलवर घेणे शक्य नाही. खूपच बेकार वाटत आहे. सगळीच लढाई हरल्याप्रमाणे वाटत आहे. पण मला ते कंत्राट वाढवायला तयार आहेत. कंत्राट वाढवू चिंता नसावी अस म्हणाले. पण त्याचा काय उपयोग? मला नाही रहायचे. तिला मनातले सांगायचे तरी निदान मी कंत्राटवर नको. ती काय विचार करेल की मी, साधा कंत्राटवर असलेला. कुठे तरी तिच्या योग्य हव ना! (more…)
खरेदी
गेले काही दिवसांपासून आईचे एक कपाट आणि एक ‘इमर्जन्सी बॅटरी’ घे अशी इच्छा. वडिलांनी एक कपाट काही दिवसांपूर्वी तर पसंतही केलेले. आईसाहेबांनी सकाळमध्ये आलेल्या ‘दिवाळी ऑफर’चे पान अगदी पाठ करून घेतलेलं. काल ते कपाट घ्यावे अस ठरवून निघालो. सोबत बंधुराज होते. आईसाहेब त्यामुळे जाम खुश होत्या. एकतर खर्च संपायचे नाव घेत नाही आहे. त्यात रोज कोणाची ना कोणाची नवनवीन ‘इच्छा’ होते. प्रत्येकाच्या ‘छोट्या छोट्या’ इच्छा उर्फ आज्ञा पूर्ण करता करता मी हापूस झालो आहे. सुरवातीला माझ्या घराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात गेलो. तिथे आधी वडिलांना आवडलेल ते गोदरेज कपाट. पण आईला आणि बंधुराजांना तीन दारांचे नक्षीदार ‘प्लाउड’चे हवे. तशी माझीही मूकसंमतीही होतीच. (more…)
दिवाळीची भेट
ताज ताजातवाना झाला. काय बुवा! आज त्याला भेटायला ‘ओह मामा’ येणार. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेली तयारी त्याने पाहिली आहे. बाजूचा त्याचा जुना दोस्त गेटवे हसत ‘ताज’ला बोलला ‘काय, झाली का रे तयारी तुझी?’. ताज ‘हो तर!, मलाही जगाच्या आणि विशेषतः अमेरीकांना मामा करणाऱ्या ओह मामाचे दर्शन घ्यायचे आहे’. ‘काय?’ गेटवे गडबडून बोलला. ताज म्हणाला ‘तुला कळेल तो आल्यावर’. मरीन गप्पा ऐकून हसू लागली. डीएन ने हे पाहून तोंडावर बोट ठेऊन शांत रहायची सूचना मरीनला केली. सीएसटी ‘टी’ घेत किलकिल्या नजरेने ताजला म्हणाला ‘ते तुझ्या डोक्यावर ती छत्री उलटी का लावली आहे?’. ताज ‘अरे ही त्या मामाने पाठवली आहे. मेड इन अमेरिका. त्या छत्रीला रडार म्हणतात. त्याच्या संरक्षणासाठी’. (more…)