माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार किंवा खिडकीतून बाहेर. आता मुलींना बुजगावणे म्हणणार नाही. कारण त्यांची ‘बडबड’वरून त्या जिवंत आहेत हे तरी कळते. (more…)
कॅटेगरी: नोंद
ती कशी असेल?
यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते. (more…)
चार स्तंभ
शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने आमच्या सर्व खासदारांचे वेतन सोळा हजारावरून ऐशीं हजार झाले. कोणत्याही खासदाराला काहीच वाटले नाही. आणि कोणताही खासदार या विरोधात काही बोलला देखील नाही. आणि ना कोणता पक्ष या विरोधात गेला. हा आहे आपल्या लोकशाहीचा पहिला स्तंभ, ज्यावर आपली लोकशाही टिकली आहे. (more…)
माणुसकी
काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. (more…)
नाही
संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना! (more…)
अंक दुसरा
रटाळ झालेला विषय ‘स्थळ’. म्हणजे मी तर फार पकून गेलेलो आहे. आजकाल माझ्या डोक्यात कामापेक्षा जास्त विचार या स्थळांचे असतात. आणि आई वडिलांबद्दल तर काही बोलायला नको. ह्याच विषयावर चर्चा माझ्याशी करतात. मध्यंतरी ते गुरुजी आले होते ना! त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% शक्यच नसते. त्यातून पुण्यातील एक स्थळ झाले होते. पण त्यांचे ‘हो नाय’. हे दुसरे स्थळाला बघायचा कार्यक्रम ठरला. पण ऐनवेळी त्यांचे बोलावणेच नाही. काय बोलणार आता? (more…)
वाट लावा
काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ‘बॉस’ लवकरात लवकर देतो असं म्हणाले होते. पण नंतर पूज्य दोन तीन महिने कुठल्या समाधित्त मग्न झाले, देव जाणे. (more…)
आम्ही पुणेकर
कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. (more…)
मित्र
परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. (more…)
कला
काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. (more…)