कॅटेगरी: नोंद

मुली आणि मोबाईल

या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही होत तेवढ्यात समोरच्या मुलीच ते ‘कार्ट’ किंचाळल. (more…)

महा’राज’

खर तर माझ्या सारख्याने महा’राजां’बद्दल काही बोलण म्हणजे मुंगीने हत्तीबद्दल बोलण्यासारखे आहे. त्यांच्याबद्दल जेवढ बोलाल तेवढ कमी आहे. आता त्यांचे वागणे, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे सगळ काही वादातीत. त्यामुळे त्यांना सोडून महाराष्ट्रातील ‘राज’कारणाबद्दल विचारही होवू शकत नाही. थोडक्यात, सांगायचे झाल्यास नटरंगमधील ते एक वाक्य आहे ना ‘राजा आक्शी राजावाणी दिसतो’. (more…)

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. (more…)

वाचलो!

मागील आठवड्यात वडिलांचा फोन आला होता. पुन्हा एक ‘स्थळ’. झालं! मी काही म्हणायच्या आत वडिलांनी छत्तीस गुण जुळत आहेत. आणि मुलगी देखील दिसायला बरी आहे. मग येत्या रविवारी पहाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता वडिलांना ‘नाही’ कसं बोलणार. ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. तरीच म्हणतोय, गेल्या आठवड्यापासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी का सारखी फडफडते आहे. परवा गेलो घरी. काल सकाळी श्रीरामपूरला पाहण्याचा कार्यक्रम होता. आईने मला तिचा फोटो दाखवला. फोटो बघण्याआधी आईला मी दोन वर्ष थांबता येत नाही का म्हणून वाद घालत होतो. पण तिचा तो फोटो बघितलं आणि वाद आपोआप बंद झाला. यार ती तर अप्सराच्याची पेक्षा सुंदर होती. मग काय गेलो निमुटपणे श्रीरामपूरला. तरीही माझा डाव्या डोळ्याची पापणी एवढी का फडफडते आहे, ते कळत नव्हते. (more…)

आनंदी आनंद चालू आहे

परवा पश्चिम बंगालमध्ये लाल भोपळ्याचे पिक गेल्याची बातमी वाचली. आणि कॉंग्रेस गवताची सुद्धा वाट लागली. काय बोलणार, उन्हाळ्यात असच होणार! पण महाराष्ट्रात मात्र कितीही कडक उन्हाळा असला तरी कॉंग्रेसच्या गवताची वाढ जोमाने आहे. दगडांच्या देशात इतका कडक उन्हाळा, आणि त्यात पाणी नाही. जिथे आहे तिथे वीज नाही. मग कुठून भाजीपाला पिकणार? बर आता भाजीपाल्यात सुद्धा कचराच जास्त असतो. (more…)

आला आला वारा..

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे. (more…)

उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो. (more…)

जात

ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. वरवर दिसून येत नाही पण आतून ‘लाव्हा’ खदखदतो आहे. असो, जनगणना आणि जात यावर मी काय बोलणार? बाळासाहेब जे बोलले तेच माझ मत आहे. (more…)

वाहिनी साहेब

काय बोलाव आता? हे मित्र लोक ना, सगळे मित्र इकडून तिकडून सारखेच. परवा ‘परी’ सोबत गप्पा मारून कंपनीत आलो. नाश्ता करावं म्हणून मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये आलो. काय सांगू किती खुश होतो. परी सुद्धा तीच्या टीममेट सोबत नाश्ता करायला आली होती. मी माझ्या मित्रांना ती दाखवली तर, माझा एक मित्र तिला ओळखत होता. मग काय, साहेब आधीच तिच्यावर फिदा. फारच काकुळतीला आला होता तिच्यासाठी. हो नाही करत शेवटी मलाच माघार घ्यावी. ती आणि तो एकाचं फ्लोरवर बसतात. आणि त्याला ती मनापासून आवडते. असो, मला कुणाच्या चित्रपटात ‘खलनायक’ चा रोल मुळीच करायचा नाही. (more…)

परी

परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ महाराष्ट्राचे जावईबापू नव्हते. तिला बघून वाटलं की बस अजून येऊन गेली नसेल. पण सगळे जावई अचानक गायब कसे?, मनात बस निघून गेले की काय याची पाल खूप मोठ मोठ्याने चुकचुक करत होती. तरीही थांबलो. दोन मिनिटांनी मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे असे पहायचो. आणि नजरा नजर झाली की लगेच आम्ही दोघेही दुसरीकडे पहायचो. अस दोन चार वेळा झालं. (more…)