ही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते? मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं! कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली. (more…)
कॅटेगरी: नोंद
संगणक म्हणजे काय?
काल माझा जिवलग मित्र भेटला होता. असो, नाक दाबल्यावर तोंड उघडते अस म्हणतात ते काही चुकीच नाही. दुपारी जेवणानंतर सहज कामाविषयी विषय निघाला. तो मला माझ्या कामातील एका गोष्टीची माहिती विचारात होता. त्याला तो विषय समजून सांगण्यासाठी त्याला सहज प्रश्न केला की ‘संगणक म्हणजे काय?’. तो म्हणाला ‘म्हणजे?’. त्याला म्हटलं ‘ मला व्याख्या नको सांगू. मला फक्त एवढ सांग की संगणक कशाला म्हणायचं’. तो थोडा वेळ थांबून म्हणाला की ‘टीव्हीची सुधारित आवृत्ती म्हणजे संगणक’. झालं! दोन पाच मिनिटे मला हसूच आवरलं नाही. साहेब पाच वर्षांपासून ‘संगणक’ क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि साहेबांचा हुद्दा देखील मोठा आहे. पण संगणक म्हणजे नेमक काय याच उत्तर देता आले नाही. मग म्हणाला ‘संगणक म्हणजे मनोरंजनाचे साधन’. मग काय अजून हसू आवरेना. (more…)
अर्थ आवर
काल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा! असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो. (more…)
गप्पांना विराम
आज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार? सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा. (more…)
जहाल मुंगीची गोष्ट
मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. (more…)
विंडोजच्या आईचा घो
आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन. (more…)
पाणी पाणी रे
चार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास. आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं. (more…)
राशी आणि स्वभाव
माणसावरून राशी की राशीवरून माणसाचा स्वभाव. हा प्रश्न, अंडे आधी की कोंबडी असा आहे. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला. तेव्हापासून त्याला पाहतो. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगितले. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील फायदा झाला नाही. माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. (more…)
रेशनकार्ड मिळाल
शेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले. (more…)
पुणेकरांचा संपर्क
काय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय? माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. (more…)