कॅटेगरी: नोंद

ए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक

पुण्यात ए टी म्  चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म्  मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्सेप्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची. (more…)

इडियट

इडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो  ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो. (more…)

ती

कशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. (more…)

नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल

आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय  गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल. (more…)

मला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे

काल  सकाळची ९ वाजता ची लोकल नेहमी प्रमाणे उशिरा पुणे स्टेशनला पोहचली. झाले तिथेच दहा वाजले. कंपनीत लवकर पोहचाव या उदेश्याने मी रिक्षेने जायचे ठरविले. प्लेटफोर्म क्रमांक ६ वर लोकल आल्याने मला ल मेरेडियन च्या बाजूने जाणे सोपे होते. बाहेर एका रिक्षा वाल्याला विचारले “कोरेगाव पार्क चलणार का?”. तो हो म्हणाला, आणि मी बसणार तेवढ्यात म्हणाला “फिफ्टी रुपिझ होगा”. त्याने पहिल्यांदी ‘हो’ असे उत्तर दिले. नंतर हिंदी डायरेक्ट . काय करणार पूणेकरांची खोड. (more…)

लोकलमधील आसने

चकित झालात? अहो मी खर तेच बोलतो आहे. लोकलचा प्रवास म्हणाला की त्याबरोबर अनेक गोष्टी आल्याच. या आसनाचा शोध(साक्षात्कार), होण्यासाठी कोणत्याही तपाचा किंवा क्लास, किंवा कोणत्या बुवाची गरज नाही. आता हेच बघा, लोकलची वाट पाहत तुम्ही उभे रहता. कधी गाडीच्या दिशेने, तर कधी सिग्नल्च्या दिशेने बघता ही क्रिया अनेक वेळा होते. आत ही आसनाची पूर्व तयारी. (more…)

मला काय त्याचे ?

परवा रात्रि दहाच्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका अपघातात एक युवक ठार झाला. काल सकाळी मी सकाळी कंपनीत येत असताना ती कार बघितली. ती कारने त्या युवकाला उडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्तानाकत, त्या स्तानाकाचे आणि गाडीचे  बरेचसे नुकसान केले. बघून अंगावर काटा उभा राहिला. कंपनीत या घटने बद्दल मी माझ्या सहकार्यांशी चर्चा केली. पण त्याना या विषयात रसच नव्हता. (more…)

भन्नाट सरी

सकाळी चांगलेच उन पडले होते, पण जस जसा दिवस संपायला  लागला तस तसा अंधार आनाखिनच गडद व्हायला लागला. त्यात कामावरून निघायला मला उशीर झाला. कशी बशी एकदाची सात वाजताची लोकल मिळाली. पण दुर्दैव लोकल होती सातची आणि निघाली ७:३० ला. राग आणि निराशा दोघेही एकाच वेळी आल्यावर काय होत ते मला आज समजल. एक तर गेटवर जागा मिळाली, पण ती देखिल दुसर्या क्रमांकाची. खर तर मुंबईवरुन  आल्या पासून लोकलच्या गेटवर उभा रहायचे आणि ते देखिल पहिल्या क्रमांकाच्या जागेवर अशी (खोड) सवय लागलेल्या माणसाला, दुसर्या क्रमांकावर समाधान कसे होइल? (more…)

इंश्योरेंस पॉलिसी

काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की यांना माझा मोबाइलचा क्रमांक कसा सापडतो हेच कळत नाही.  मध्यंतरी एका मुलीचा फ़ोन आला याचा इंश्योरेंस संदर्भात. (more…)

तीर् नयनाचे

आताचा रविवार, परत आयुष्यात येऊ नये हीच प्रार्थना. या रविवार माझ्यावर किती वार, तीर् सोडले गेले असतील याची कल्पना तुम्हाला यावरूनच येऊ शकते की माझे मागचे पोस्ट आणि हे यातले वेळेचे अंतर. नेमक काय आणि कस घडल हे कळायला मार्गच नाही. सकाळी सकाळी तुम्हाला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो. तुम्ही तो फोन साखारझोप सोडून उचलता. पण फोनवर काहीच आवाज येत नाही. आणि तुम्ही मुर्ख सारखे हेलो हेलो करत बसता. (more…)