कॅटेगरी: मी

मी आणि माझा ब्लॉग

यार, काय बोलू? प्रतिक्रिया वाचून हसावं की रडावं अस होते आहे. माझा ब्लॉग माझी भलतीच इमेज बनवतोय. कधी ज्योतिषी, कधी इतिहासकार तर कधी कधी हा ‘हेमंत’ वेडा. खर तर ‘हेमंत’ ना ज्योतिषी ना इतिहासकार. ‘वेडा’ म्हटल्यावर माझी काही हरकत नाही. कारण, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात वेडा असतोच. (more…)

संभाजी महाराज

आजचा दिवस, जगातील एकमेव ‘अजेय’ व्यक्तिमत्वाचा. त्याच्या अखेरच्या क्षणांचा. त्याच्या आधी आणि नंतर देखील असा ‘वीर’ पुन्हा या पृथ्वीवर अवतरला नाही. नेपोलियन असो. सिकंदर असो. किंवा कोणताही इतिहासात वीर घ्या. त्याच्या आयुष्यात त्याला कधी न कधी ‘तह’ किंवा ‘पराभव’ स्वीकारावा लागलेला आहे. जवळपास एकशे बत्तीस लढाया संभाजी महाराज लढले आणि जिंकले सुद्धा. (more…)

अबोल

अबोल. यार, काय बोलू! हे माझ अस झालं आहे न. काय बोलू आणि काय नको. बोलावसं बरच वाटत. पण प्रश्न पडतो कस बोलू. म्हणजे काही विषय असे असतात. की जे असून नसतात. म्हणजे, साक्षीदार देखील आपण आणि आरोपी देखील आपण. गुन्हा घडतो. त्या ठिकाणी गुन्हा आपल्याच हातून घडत असतो. कितीही प्रयत्न केला, मनात ते असतेच. आपण आपल्या अशा अनेक गोष्टी, मनात  दडवून ठेवतो. (more…)

लग्नाआधी आणि नंतर…

लग्ना आधीच जीवन आणि लग्नानंतर होणारा जीवनातील बदल, यातील सुखी कोणते वगैरे गोष्टी कदाचित वादाचा विषय होवू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर यात फरक असतो. जर फरक पडलेला नसेल. तर मग ‘अवघड’ आहे. (more…)

प्रश्न

प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. (more…)

प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले. (more…)

भगवंताची उणीव

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची. (more…)

वाद

जगाच्या पाठीवरील इतर दुसऱ्या कोणत्याच देशात इतके वाद होत नसतील. जितके आपल्या देशात होतात. कोणी काही बोलले तरी वाद. नाही बोलले तरी वाद. इतर काही घडो न घडो ‘वाद’ मात्र हमखास घडतात. निमित्त काहीही असते. वर्ष सुरु होवून कसाबसा महिना झाला तर, पंधरा-वीस वाद. आजकाल वादावरून गोष्टीची किंमत ठरते. (more…)

मन म्हणजे..

मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. (more…)

मी स्वतः

एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले. (more…)