योगायोग आहे का काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. (more…)
कॅटेगरी: मी
हे काय आहे?
हे काय आहे? आज सकाळी सकाळी डोळे उघडले तर, ‘अआई’ माझ्याकडे पाहून ती तिच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये, म्हणजे मान उजव्या बाजूला झुकवून हसत होती. एकदम मस्त! विसरला नाहीत ना! ‘अआई’ला? खूप दिवसानंतर आज एकदम मस्त वाटत होत. नंतर पुन्हा डुलकी लागलेली. म्हणजे धड झोपेतही नाही आणि जागा आहे असही नाही. मला माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पा ऐकू येत होत्या. मागील महिन्यात वडिलांनी मला एक ‘टी-पॉय’ घेऊन दिलेला. तो ‘टी-पॉय’ स्टीलचा आहे. आणि वरच्या बाजूला एक जाड काच. तो मी बाहेरच्या खोलीत ठेवला आहे, त्यावर माझी मी बीसीएची आणि माझ्या कोर्सच्या वेळी मिळालेली पुस्तके ठेवलेली आहे. म्हटलं कोणी घरी आल्यावर तेवढंच आपल इम्प्रेशन! (more…)
आभार महाराष्ट्र टाईम्सचे
आभार महाराष्ट्र टाईम्सचे! दिनांक १५ जानेवारी २०११ला ‘पुणे टाईम्स’ पुरवणीत माझी ‘पहिला दिवस’ ही नोंद छापल्याबद्दल मी, महाराष्ट्र टाईम्सचे आभार मानतो. खर तर, खूप आनंद होत आहे. यामुळे माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरवात खरच खूप गोड झाली. यावर उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व! ब्लॉग सुरु करतांना किंवा आताही अस कोणते वर्तमानपत्र माझ्या ब्लॉगची दाखल घेईल अस वाटलेलं नव्हते. आणि मध्यंतरीचे काही दिवस खरच खूप तणावाखाली गेलेले. (more…)
प्यार किया तो..
म्हणजे आधीच म्हणणार होतो. पण.. राहू द्या. आता मी कंपनीत येतांना बाजूच्या इमारतीसमोर दोन कबुतरांना गुटर्गू करतांना पहिले. ही गोष्ट मला आता नवीन राहिलेली नाही आहे. पुण्यातच काय सगळीकडे अस चालते. काय करणार? कंपनीच्या डाव्याबाजूला थोड्याच अंतरावर कावळ्यांचे कॉलेज आहे. त्याच्या थोड पुढे गेले की, ब्रिगेडीयरांनी केलेल्या भीम पराक्रमाने पावन झालेली एक वास्तू. त्याही थोड पुढे गेले की, एक नावाजलेलं इन्स्टिट्यूट. इकडे कंपनीच्या उजव्या बाजूला खोक्यातील हिरो हिरोईनचे इन्स्टिट्यूट. त्याच्या आणखीन थोड पुढे गेल की चिमण्यांचे कॉलेज. (more…)
ती ती आणि ती
ती! काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. (more…)
बुट्टी
बुट्टी! काय चालल आहे यार! काय बोलाव अस झाल आहे. मोजून दहा दिवस हातात उरले आहेत. आणि त्यात हे माझे वागणे. शपथ, मी. काय ठरवतो आणि काय होते. आठवडाभर तिच्या आठवणीने इतके सतावले ना! आणि काल ऑफिसला बुट्टी झाली माझी. परवा रात्री झोपच येत नव्हती. बर कसाबसा वेळ घालवायची काम केली. पण तरीही, चारच्या सुमारास झोप आली. आणि सकाळी उठून पाहतो तर सकाळचे साडे दहा. मग पुन्हा जाग आली तर, झटपट आवरलं. वेळ पहिली तर दुपारचा एक. मग काय कंपनीला बुट्टी झाली. (more…)
हे क्षण
हे क्षण! काय बोलू अस झालं आहे. नुसतेच रोमांच सगळया शरीरभर उठत आहे. नुसते क्षण आठवून ही अवस्था आहे. प्रत्यक्ष असेल त्यावेळी! ऑफरसाठी एका कंपनीने फोन केला होता. म्हणजे थोडा जॉईनिंग डेटचा घोळ चालू आहे. काळजी नसावी दोन एक दिवसात त्याचा निकाल लागून जाईल. पण आता का कुणास ठाऊक तिची इतकी ओढ वाढली आहे ना! कालचा दिवस तिने इतका छान केला ना. तिचे ते इमेल. काय कळेनासे झाले आहे, ज्यावेळी ज्याची गरज असते ते तिला कळून जाते. गेले काही दिवसांपासून मी खुपच बैचेन झालो होतो. काल सकाळी सगळंच संपले अस वाटू लागलेलं. खुपंच मूड गेलेला. तीचा ते तीन इमेल आले. आणि सगळ् बदललं. (more…)
प्रपोज
प्रश्न प्रपोजचा नाही आहे. आता कसं सांगू यार! प्रपोज करणे फार अवघड गोष्ट नाही आहे. मी ते करू शकतो. नक्की करू शकतो. प्रश्न हा आहे की, म्हणजे स्पष्टच बोलतो. तीच्या मनात नेमक काय चालू आहे. हे कळायला मार्गच नाही. मुख्य म्हणजे ती नेमकी कशी आहे, हेच कळेनासे झाले आहे. कधी वाटते तीचा स्वभाव रागीट आहे. कधी वाटते, ती खुपंच समजूतदार आहे. मी ज्या ज्या वेळी तिला पाहतो. त्या त्या वेळी ती नवीन वाटते. माझा स्वभाव नकारात्मक नाही. माझ्या मनात न्यूनगंड देखील नाही. मी वस्तुस्थितीबद्दल बोलतो आहे. पण तिच्यासमोर मी काहीच नाही. मी पुन्हा जुनाट विषय काढत नाही आहे. (more…)
मम
चार दिवसांच्या ‘गृह’वासा नंतर मी कंपनीत जाण्यासाठी उतावीळ झालो असतो. बसमध्ये बसल्यावर मन अप्सरेच्या विचारात बुडून जाते. फक्त ती ती आणि ती. दुसरा विचारच डोक्यात नसतो. कंपनीत गेल्यावर मी डेस्कवर जातो. पण ती तीच्या डेस्कवर नसते. मी संगणक चालू करतो. माझे चुकून एका मुलीकडे लक्ष जाते. तीचा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेला असल्याने ‘अप्सरेपेक्षा अजून सुंदर कोण आहे?’ अशी शंका येते. मेंदू मला ‘हे चुकीचे आहे’ असे सांगायला सुरवात करतो. मी खजील होतो. पण मन ती अप्सरा आहे अस म्हणायला सुरवात करते. ‘ती कोण?’ याविषयावर मेंदू आणि मन यात द्वंद सुरु होते. दोघांचे भांडण थांबवण्यासाठी मी संगणकात डोके घालतो. (more…)
स्वार्थी
काही खर नसत. आज जे आहे आणि जस वाटत ते कधी बदलेल याचा नेम नाही. नवीन कंपनीचे काम आणि येथील लोक फारच वेगळे आहेत. त्यांना ‘ब्लेमगेम’ मधेच आनंद असतो. पण एका अर्थाने ते बर आहे. निदान आशा अपेक्षा वाटत नाहीत. काही या कंपनीत जॉईन होऊन अजून महिना झाला नाही. माझ्या जुन्या कंपनीतील माझे मित्र मैत्रीण असे वागत आहेत की जणू काही मी कंपनी सोडून काही शतक उलटली आहेत.