आपणचि झाला धराधर ।
उरला भरोनि महीवर ।
अणुरेणूंतूनी करशी संचार ।
विश्वनाटक नटावया ॥२॥
~ संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: तूच सर्व विश्वाच्या अणु रेणु तही वसलेला आहे. ह्या विश्वाच्या कणाकणात भरूनही तू पुरून उरला आहेस. हे विश्व एक नाटक आहे आणि या नाटकाचा सूत्रधार तुच आहे.