कॅटेगरी: नोंद

शतक

आजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते. (more…)

मना

मी मना ला समजावतो. पण ते माझ ऐकून घेतच नाही. ‘निर्णय’ झाल्याचे मी त्याला सांगतो. पण.. ते माझ हे ऐकताच रुसून बसते. उदास होते. मी त्याला ‘चांदणी’ आयुष्य असल्याचे सांगतो. ते मला चंद्राची कोरीचा हट्ट करते. मी त्याला सांगतो, तो भूतकाळ. ज्यात फक्त अधीरता होती. ज्यात फक्त मी होतो आणि मीच. ते मला त्या सोनेरी क्षणांची आठवण करून देते. त्या सहवासाची, त्या अनमोल मोत्यांची. मी त्याला पुन्हा बोलतो. जाम झापतो. पण ते माझा निर्णय ऐकतच नाही. मला नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडते. मला माझ्या शांततेची कारण विचारते. (more…)

मला आई व्हायचंय

मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी चित्रपटबद्दल बोलत आहे. काल चिंचवडच्या बिग सिनेमाला चित्रपट पाहायला गेलेलो. चित्रपटाचे नाव ‘मला आई व्हायचंय’. नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांच्या इतका चांगला वगैरे नाही. परंतु, ‘श्वास’च्या टाईपमध्ये बसणारा आहे. पण एकूणच ठीक आहे. एका अमेरिकन स्त्रीला ‘आई’ व्हायचं असते. परंतु, बाळंतपणामुळे बेढबपणा येण्याच्या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. सरोगेट म्हणजे पित्याचे शुक्राणू आणि मातेचे बीजाणू कृत्रिमरीत्या तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून बाळंतपण केले जाते. थोडक्यात, ‘भाड्याची आई’. ती अमेरिकन स्त्री कोकणातील एका बाईची निवड करते. ती बाई म्हणजे या चित्रपटाची नायिका. (more…)

द बॉस

जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो. (more…)

तो आणि ती

तो शांत आणि ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार. (more…)

हेल्मेट

गेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत. पण चला ठीक आहे. घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे केस, पॅंट आणि बूट काळे. (more…)

क्षमता

क्षमता ओळखली पाहीजे. मला नेहमी अस वाटत की, आपण आपल्या स्वतःकडे फार कमी लक्ष देतो. म्हणजे सचिनने ठोकलेली शतकांची संख्या, ओबामाचा दौरा किंवा आमीरने केलेल्या चित्रपटांची संख्या. परंतु आपण स्वतःला अस कधी पहातच नाही. आपल्याला पी टी उषाचा धावण्याचा वेग माहिती. परंतु आपला किती? हे नक्कीच आपण पहात नाही. दबंग मधील सलमानने कोणता ड्रेस घातला किंवा एखाद्या नटीने एखाद्या चित्रपटात किती किस दिले याची संख्या आपणाला माहिती असते. परंतु आपल्याकडे एकूण किती कपडे आहेत याची संख्या नक्कीच आपणाला माहित नसेल. (more…)

विकेंड

हा विकेंड जाम मस्त गेला. काय सांगू आणि काय नको अस होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी स्वतःला एकटा राहूच देत नाही. एकटा असलो की! नको नको ते विचार मनात यायला लागतात. असो, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या मुंबईच्या बहिणीचा फोन आलेला की, ती शनिवारी पुण्यात येणार म्हणून. तो येरवड्या जवळचा ‘ईशान्य’ मॉल आहे ना. तिथे तिचा कार्यक्रम होता गाण्याचा. दुपारी गेलेलो. तिच्याबद्दल काय बोलू? माझी ‘दुसरी बहिणाबाई’ आहे. गाडी पाहून जाम खुश झालेली. खर तर तिच्याकडे दोन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. पण तरीही माझी गाडी पाहून तिला आनंद झालेला. मस्त वाटल. तिचा कार्यक्रम झाल्यावर, तिला लगेचच मुंबईला निघायचे होते. तस् आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. (more…)

झोपडपट्टी मॅन

झोपडपट्टी वासियांना फुकट घर वाटण्याचा निर्णय ऐकताच ‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. कुणाशी बोलतो आहेस तू?’. चौहान गडबडून ‘अरे, मला जाऊ दे. मॅडमचा फोन आलेला’. शिपाई ‘आन मंग, ती तुझी मॅडम. मला काय सांगतोस तीच’. चौहान रागात ‘मी मुख्यमंत्री आहे. इम्पोर्टेड!’. शिपाई हसू लागला ‘आता एवढचं बाकी राहील. मघाशी गेले ते देखील हेच म्हणाले’. (more…)

रानडुकरे

या रानडुकरांची काय कथा वर्णावी? ही रानडुकरे सतत शहरात इकडून तिकडे यथेच्छ संचार करीत असतात. कुठूनही कसेही आणि कधीही हे निघतात. वाटेल तिथे, हवे तसे उभा राहतात. भर रस्त्यात ह्यांना सावज दिसलं की, हाणलाच ब्रेक. आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ ह्यांना अधिकच बेकाबू करते. तसे नियम त्यांना लागू होत नाहीत की, ते नियम ह्यांना नकोसे असतात. हे त्या आरटीओ नावाच्या परमेश्वराला माहित. अस नाही की माझ्यासारखे ‘घोडेस्वार’ फार गुणी असतात वगैरे. सर्वच घोडेस्वार नियम पाळतात अस मुळीच नाही. परंतु, चुकीची शिक्षा स्वतः भोगतात. पण तस् ह्या रानडुकरांच नाही. आणि या पुण्यात इतका सुळसुळाट झालाय न या रानडुकरांचा की, बोलायची सोय नको. (more…)