कॅटेगरी: नोंद

दिवाना

चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत आल्यापासून त्याला तिची आठवण इतकी सतावत असते की सारखा सारखा तिच्या बसण्याच्या जागी दर पाच दहा मिनिटांनी पाहत असतो. पण नायिका काही येत नाही. (more…)

बाय

कालचा तो सोमवार. कसला होता. शनिवार आणि रविवार तिची इतकी आठवण यायची. आणि सोमवारी घडल भलतंच! अप्सरा कंपनीत आली आणि माझ्याकडे बघेच ना! दुपारपर्यंत असंच. इतक बोर झालं ना. वाटल जीवनाला काही अर्थच नाही. फ़क़्त गंगा यमुना यायच्या बाकी राहिल्या होत्या. पण जातांना मी तिला हिम्मत करून ‘बाय’ म्हटलं. किती छान ‘बाय’ करते ती! ‘हाय’ पेक्षाही ‘बाय’ बघून हार्टटॅक आल्यात जमा होता. पण ना माझी त्याच्यापुढे काही बोलण्याची हिम्मतच होत नाही. (more…)

प्रिटी वूमन

दाराची बेल वाजते. दार उघडले जाते. प्रिटी वूमन समोर येऊन ‘नमस्कार, कसा आहेस हेमंत?’ . मी ‘चांगला’. प्रिटी वूमन ‘या’. घरात गेल्यावर, ‘आपले अभिनंदन!’. प्रिटी वूमन हसून म्हणाली ‘धन्यवाद, पण मला माहिती आहेस की तू कुणाच्या म्हणण्यावरून इथे आला आहेस’. मी ‘नाही, मी तुमचे अभिनंदन करणारच होतो’. ‘मला माहिती आहे, अनुक्षरे ताईच्या बोलण्यावरून तू इथे आला आहेस’. मी ‘हो, पण माझ्या मनात सुद्धा यायचे होते’.  ‘पण तुम्हाला अनुक्षरेताई कशा काय माहित?’ मी म्हणालो. प्रिटी वूमन ‘अरे, मी तुमचे ब्लॉग वाचते’. मी म्हणालो ‘पण तुम्हाला मराठी..येते?’. प्रिटी वूमन ‘हो, मुंबईत यायचे म्हणजे मराठी आलीच पाहिजे’. मी ‘वा!’. प्रिटी वूमन ‘बोल अजून काय म्हणतोस?’. मी ‘आपली मुलाखत घेण्याची इच्छा होती’. प्रिटी वूमन ‘कर सुरु’. (more…)

एक्सपर्ट

काय महत्वाचे? थिअरी की प्रॅटिकल असा आता मला प्रश्न पडायला लागला आहे. माझा एक मित्र आहे. केल काहीच नाही पण माहिती सगळे. कुठलाही विषय काढा हा त्यावर त्याचे ‘एक्सपर्ट’ मत व्यक्त करणारच. अगदी मुलीं पटवण्यापासून सेक्सपर्यंत. पण यातील एकाही गोष्ट केलेली नाही. एकदा असंच आमच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता मी त्याला विचारले की, ‘तुला कोणीच नाही आवडली का?’ तर मला बोलला ‘मी असली डेड इन्वेस्टमेंट करत नाही’. का? विचारल्यावर बोलला ‘आपण मुलीसाठी वेळ द्यायचा, तीचा विचार करायचा आणि तिच्यावर खर्च करायचा. आणि शेवटी आउटपुट आपल्या सोबत लग्न करेल. अरेंज मॅरेजमध्ये हवी तशी मिळू शकते. मग कशाला वेळ घालवायचा?’. काय बोलणार आता? (more…)

बेकार दुपार

काय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या. (more…)

हिम्मतराव

यार, ती किती सुंदर आहे. असो, आजही ती खूप गोड दिसते आहे. नाही ‘गोडू’. आजकाल तिला सोडून दुसरीकडे लक्षच जात नाही आहे. तिच्यासमोर जाण्यासाठी रोज एकावेळी दोन-पाच टिश्यू पेपरला बलिदान करावे लागते आहे. दिवसातून मी दहादा तिच्यासमोर जातो. आणि जाण्याआधी वॉशरूममध्ये कसा दिसतो, ह्याच्यासाठी जातो. पण तिच्या डेस्क जवळ गेले की, तिला बघण्याची हिम्मत होतच नाही. (more…)

टिपीकल

चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा काहीही न बोलता आपला निर्णय बदलतो. आणि आईने सांगितलेले कपडे निमुटपणे घालतो. तयारी चालूच असते, तर मुलीच्या वडिलांचे आगमन होते. (more…)

हाय

काल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू! पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना! किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे. (more…)

इति ‘अप्सरा’ कृपा

आज किती छान दिसते आहे. मला ना आजकाल दुसरे काहीच सुचत नाही आहे. कालही असेच, तिच्याशी बोलायचे म्हणून कंपनीच्या इमारतीच्या तीन मजले पळत आलो. आणि आज सकाळी पळायला गेलो तेव्हा इतके पाय ठणकायला लागले ना! पण काही नाही, व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला आणि दुखायचे बंद. दाढी करतांना दोन तीन ठिकाणी कापलं. पण लक्षात आले नाही. बसमध्ये बसल्यावर एका मित्राने सांगितल्यावर लक्षात आले. (more…)

बोललो

हुश्श!!! बोललो एकदाचा. किती छान हसते ती. माझा श्वास नॉर्मल होताच नाही आहे. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू! नाचावस वाटत आहे. झाली हिम्मत एकदाची! किती सुंदर आहे. काय करू यार आता. काल संध्याकाळी बिग बझारमध्ये दोन तासाचा काही तरी फायदा झाला. बूट पासून शर्ट नवीन घेतले. निवडतांना दर दहा मिनिटांनी माझी निवड बदलायची. तिला कोणता ड्रेस आवडेल? याचा विचार करून डोक हैराण झाल होत. आता डोक दुखायचे बंद झाले आहे. (more…)