याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते. (more…)
कॅटेगरी: नोंद
जप
ही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं बाजूला. ह्याचं आपल कमी कमी होत आहे. माझे आई वडील, दोघांचा देवावर खूप विश्वास. काय बोलणार. आणि माझा त्या दोघांवर विश्वास. म्हणून जप चालला आहे. आता अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही. तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे? देव जाणे. (more…)
संकल्प
काही बोलण्याआधी सर्वांना ‘मराठी नववर्षाच्या’ हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुखाचं आणि विकासाच जावो. आज म्हटलं, मागील वर्षाचा माझा हिशोब द्यावा. मागील वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. मी दोन खोल्यांच एक घर घेतलं. मोठ्या कंपनीत नोकरी. उत्पन्नात वाढ. घरासाठी काही वस्तू खरेदी केल्या. त्याआधीच्या वर्षाच्या मानाने ५.४७% मिळकतीत वाढ झाली. खर्चाचा हिशेबात मात्र मागील वर्ष खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे. मागीलवर्षी झालेला खर्च त्याधीच्या वर्षाच्या मानाने २९७% वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी बचत एकूण उत्पन्नाच्या २/३ अशा प्रमाणात होती. आणि मागील वर्षी बचत १.२/१० म्हणजेच उत्पन्नाच्या १२% एवढी होती. बाकीचा ८८% खर्च. मागीलवर्षी एक चांगली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचे हाल कमी झाले. एकूण वर्षात १५% खर्च खाण्यावर आणि ७३% खर्च इतर गोष्टींवर आणि १२% शिल्लक. इतर खर्चात मी माझा प्रवास खर्च, कपडे, इतर सामान अशा गोष्टी टाकतो. थोडक्यात खाण्यावर न केलेला खर्च म्हणजे इतर खर्च. तस म्हणाल तर मी मागीलवर्षी काहीच फालतू खर्च केला नव्हता. पण खर्च २९७% वाढला. स्पष्टपणे बोलायचं झालं. तर माझा खर्च याधीच्या खर्चापेक्षा सव्वा लाखाने वाढला आहे. (more…)
पाल
एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे. (more…)
खेळ
काही दिवसांपासून, कंपनीच्या बस मधून उतरलो की घरी येतांना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. तिथे रोजच मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो खेळ खूप मजेदार असतो. एका चेंडूला चौकार तर पुढच्याच चेंडूला फलंदाज बाद. संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे चिल्लर कंपनी धुमाकूळ घालत असते. हे सगळ पाहून मला मैदानी खेळ खेळायची इच्छा होणार नाही तर नवलच. परवा जाऊन एक फुटबॉल आणला. आणि दोन दिवसांपासून मी, माझे भाऊ बहिण आणि त्यांचे मित्र असे संध्याकाळी मैदानात फुटबॉल खेळतो. एका वर्षानंतर मैदानावर खेळतो आहे. त्यामुळे आनंद खूप होतो आहे. संगणकावर, मोबाईलवर खेळण्यापेक्षा मैदानात जाऊन खेळण अधिक मजेदार आहे. काही वर्षांपासून कोर्स, नोकरी यात इतका गुरफटून गेलो होतो की खेळण हा प्रकारच बंद झाला होता. आणि इथ आल्यापासून कोणी मित्र वगैरे झालेच नाहीत. आणि जे झाले ते कंपनीमधील त्यामुळे हा खेळाचा विषयच कधी आला नाही. (more…)
जय हो भोसरीकर
भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. एकाने मालकावर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने काउंटरच्या बाजूने जाऊन एका पोत्यात सोन्याचे दागिने भरले. चोर दुकानाच्या बाहेर आले. मालक आणि त्याचा नोकर त्या चोरांच्या मागे धावत आले. नोकराने चोराच्या पाठीत बुक्के मारले. त्याला प्रत्युतर म्हणून मोटारसायकलीवर बसलेल्या एकाने मालकावर पिस्तुलीच्या गोळ्या झाडल्या. मालकाच्या पायात आणि पाठीत अशा दोन गोळ्या लागल्या. (more…)
वाढदिवस
काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. गप्पाही खूप झाल्या. ती म्हणत होती की तीच्या वाढदिवसाला नेहमी पाऊस पडतो. म्हणजे अस काही नियम वगैरे नाही. पण अस घडतं. मी नुसतंच हसलो त्यावेळी. ती ज्यावेळी हे सगळ सांगत होती त्यावेळी दुपारी कडक ऊन पडले होते. आणि संध्याकाळी खरंच पाऊस आला. पण यावेळी माझी पावसात भिजायची इच्छा पूर्ण झाली नाही. मी घरी आलो त्यावेळी पाऊस पडून गेला होता. कालही असंच. (more…)
थ्री इडियट्स
चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये पोहचतात. दोघही धावत पळत त्या नेहमीच्या भेटीच्या ‘मॉर्निंगवॉक’ मैदानावर येतात. तिथ त्यांची चतुर बनर्जी वाट पाहत असते. दोघांना धावत येतांना पाहिल्यावर मोठ्याने ‘या इडियट्स’ असे म्हणते. दोघेही इडियट्स तिच्याकडे पाहत उभे राहतात. मग चतुर म्हणते ‘कुठे आहे तुमचा तिसरा इडियट?’. दोघेही एक दीर्घ श्वास सोडतात. चतुर थोडंस हसून ‘मला माहिती होत की तो येणार नाही.’ (more…)
चुकीचा नंबर
सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस म्हटलो. तर पुन्हा तिकडची व्यक्ती ‘काही क्षणासाठी थांब’ अस म्हणाला. मी आपला ‘ठीक आहे’ म्हणून थांबलो. मग विचार केला मिटींगसाठी वही घ्यावी. म्हणून फोन न बंद करता ठेवला आणि माझ्या मेजवरील वही आणली. पुन्हा फोन उचलला तर फोन कट झालेला. मग कळेना फोन कोणी केला होता ते. एक तर त्या आमच्या कंपनीतील फोनवर भलतेच आवाज येतात. कधी कधी ओळखीचा सुद्धा कळत नाही. मग त्या माझ्या मित्राला पुन्हा विचारलं तर त्याने पुन्हा तेच उत्तर दिल. मग काय करावं म्हणून माझ्या त्या सिनिअरला विचारलं तर ती बोलली ‘आज आपली कोणतीही मिटींग नाही’. तिला विचारलं की ‘टीम लीडरने केला असेल का?’ तिने नाही म्हटल्यावर मी माझ्या इथल्या सिनिअराला विचारलं तर ती देखील ‘नाही’ असंच म्हणाली. मग काय जेवतांना देखील फोन कोणाचा असेल अस विचार करत बसलो पण काही उत्तर सापडलं नाही. (more…)
अपघात
आज रात्री कंपनीच्या बसने घरी येताना डांगे चौकात एक लहान टेम्पो चौकातील मधोमध असलेल्या खड्यात गेलेला दिसला. आता तो काही एवढा मोठा नव्हता. पण टेम्पो पूर्ण वाकडा झालेला बघितला. तिथून पुढे बस चिंचवडच्या जुन्या नाक्यावर थांबली. तिथ सुद्धा लोकांचा घोळका. म्हटलं आता काय झाल तर एका कारवाल्याची आणि दुचाकीवाल्याची भांडणे. सध्याला चाफेकर चौकापासून ते जुना नाक्या पर्यंत पुलाचे काम चालू आहे. रोज त्यामुळे कोणी ना कोणी अस एकमेकांना धडकते आणि वाद सुरु होतात. मागील आठवड्यात देखील असंच. आरटीओ ऑफिस समोर एक खूप मोठा खड्डा आहे. त्यात खूप पाणीही साचालेल आहे. काही दिवसांपूर्वी एक रिक्षा त्यात पडली. बर खड्डा बावीस फुट खोल आणि त्यात पाणी. देवाची कृपा म्हणायची एका तरुणाने उडी मारून प्रवाश्यांना वाचवलं. (more…)