कॅटेगरी: ब्लॉग

ज्ञानाचे भांडार

आंतरजाल खरेखुरे भांडार आहे. हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे! (more…)

मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण

मराठी ची गळचेपी होते. हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून होत. मी गेल्या काही वर्षातील अनुभव सांगतो. इतरांचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळेच मते वेगळी असतात. त्यामुळे नाकारण्याचे कारण नाही. (more…)

नवा ब्लॉग

ब्लॉग नव्याने सुरु करीत आहे. ह्या ब्लॉगवर यापुढे माझा फारसा संपर्क राहणार नाही! नवीन ब्लॉगचा दुवा सोबत जोडत आहे! धन्यवाद!!
http://www.hemantathalye.com/

ब्लॉग चा पुनः श्रीगणेशा!

पुनः श्रीगणेशा! बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत आहे. मधल्या काळात ट्विटरवर रमलेलो! पण ब्लॉग काही केल्या विसरता येईना!

यावेळी परंतु ठरवून आलेलो आहे. ज्ञान, विज्ञानतंत्रज्ञान आणि हो माझ्या ‘मी‘ ह्यावर तर नक्कीच बोलेन! तूर्तास फार काही पकवत नाही!

मागील पोल

[polldaddy poll=8488174] (more…)

महाराष्ट्र कुणाचा??

खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.

(more…)

इतिश्री समाप्ती

इतिश्री समाप्ती. बऱ्याच दिवसांपासून ठरवतो आहे. आज, तेच सांगायचं ठरवून आलो आहे. वर्डप्रेसच्या होस्टिंगवर ब्लॉग करण्यापेक्षा स्वतःचा एक नवीन ब्लॉग बनवावा अस म्हणतोय. बऱ्याच दिवसांनी ‘दर्शन’ देतोय. म्हणून विषय सुरु करण्याआधी क्षमा मागतो. खर तर हा ब्लॉग म्हणजे आठवणी. दोन तीन वर्षापूर्वी तर जीवनाचा एक भाग बनून गेलेला. नंतर मग.. सगळंच बदललं.  (more…)

नवीन ब्लॉग

नवीन ब्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी बोलतो आहे. खर सांगायचं झालं काय बोलावं यावर बराच वेळ विचार केला. पण काहीच सुचेनासे झाले आहे. आजकाल.. जाऊ द्या ते. ह्या वर्डप्रेसमध्ये रजिस्टर करून पाच वर्षे झाली. म्हणून म्हटलं आज बोलूयात. गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले.  त्याचा ‘चित्रपटच’ डोळ्यासमोर धावला. म्हणजे या ब्लॉग बाळ ‘पाचवीत’ जाणे अजून बाकी आहे. बाकी बोलूच…

प्रश्न

प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. (more…)

प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले. (more…)