कॅटेगरी: ब्लॉग

भगवंताची उणीव

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची. (more…)

मन म्हणजे..

मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. (more…)

मी स्वतः

एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले. (more…)

सेक्स

बस्स! नाव काढू नका. अगदी निषिद्ध विषय. ‘सेक्स’बद्दल बोलणे म्हणजे घाणेरडे. वाईट अगदी! लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना! माझ्याही मनात येतात. जसे पहाल तसे हे जग आहे. म्हटलं तर वाईट, म्हटलं तर चांगल. हा विषय ही तसाच. कदाचित, चर्चा देखील करणे ‘पाप’ वाटेल. (more…)

वेड असावे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला  अपडेट्स. (more…)

गाढवा…

त्याला बिग बॉस आवडत नाही,तिला बिग बॉस आवडतो.
दहा वाजून गेल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण बिग बॉस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

(more…)

एक छोटी बातमी डोंगरा एवढी..

रात्री एक भयानक घटना घडली. घडलेली घटना खर तर खूपच चीड आणणारी होती. कोणत्याही व्यक्तीच (राजकारणी सोडून) डोके फिरेल अशी होती. बातमीने सारा देश हादरला. झालं! निमित्त सापडलं. ‘सबसे तेज..’ वाल्यांपासून ते ‘एक पाउल पुढे..’ पर्यंत सर्वांनीच त्या बातमी रुपांतर ‘टीआरपी’ मध्ये बांधण्याचा चंगच केला. (more…)

मुलगी झाली

एक गोड बातमी आहे. मुलगी झाली. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला. (more…)

आता तरी देवा आम्हाला..

हे क्रिकेटच्या देवा! हे मनोहरा, हे गोलंदाज निर्दालक, हे संकटमोचक! आम्हा तुझ्या भक्तांना तू खेळपट्टीवर उभा राहून, तुझ्या फळी नामक वज्राची तीक्ष्ण धारेने गोलंदाजांची व समोरील उभा ठाकलेल्या संघाची दाणादाण उडव. तुझ्या लयबद्ध आणि एखादया गायकाच्या आवाजाचा खोलावा जाणावा आणि त्याने श्रोत्यांचे मन तृप्त व्हावेत. त्याप्रमाणे तुझ्या फलंदाजीची मनमोहक फटकेबाजीने आम्हाला तृप्त कर. (more…)

एक थी मांजर

एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या  भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. (more…)