कॅटेगरी: मी

मराठीसाठी इंग्रजी बोला

मराठीसाठी इंग्रजी बोला. कदाचित हे आपल्याला हास्यापद वाटेल. परंतु, थोडा विचार केला तर हे आपल्यालाही पटेल.

इंग्रजी बोला म्हटलं की अनेकांची तंतरते! त्या गटात मी देखील मोडतो! हाहा!! मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असतांना ज्यांचं इंग्रजी उत्तम नाही अशांना इंग्रजी शिकवण्याचा घाट घालण्यात आला.

आठवड्याभरातच एक ट्रेनर कंपनी सुटल्यानंतर एक पन्नास लोकांच्या गटाला इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्या घेऊ लागली. मीही त्यात होतो. ट्रेनर कसली कडकलक्ष्मी! पहिल्याच दिवशी यातील किती मराठी माध्यमातून शिकले असा प्रश्न केला!

अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्वांनीच हात वर केले. त्यावर बाई, ‘तुम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुमची इंग्रजी कच्ची आहे’ वगैरे बोलू लागली. अनेकांना ती बाब खटकली! काही जणांनी बोलून देखील दाखवली. मुळात चांगलं इंग्रजी येण्यासाठी तो वर्ग होता.

बाईंनी दुसऱ्या दिवशी, ‘शालान्त शिक्षण घेऊनही तुम्हाला अजूनही इंग्रजी येत नाही. याचा कमीपणा वाटत नाही का?’ वगैरे बोलून भडका उडवून दिला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी त्यावर प्रतिवाद केला. खरं तर दोन्हीही बाजूने मते योग्य होती. वाद विकोपाला गेलेला. ट्रेनर बदला म्हणून कंपनीत विषय होऊ लागला.

विनाकारण बाई इंग्रजीच्या नावाखाली मराठी आव्हान देत होते. पुढील दिवशी बाईंनी, मला तुमची इंग्रजी किती चांगल्या बोलू शकता हे पाहायचे आहे म्हणून एक एकाने समोर येऊन बोला म्हणू लागली. कोणीही पुढे जायला तयार होईना. शेवटी मी पुढे जाऊन बोलण्याचे ठरवले!

खरं तर काहीतरी करून दोन दिवसांची उत्तरे द्यायची होती. व चूक देखील दाखवून द्यायची संधी होती. पुढे जाऊन (अगदी घोकंपट्टी झालेले सर्वांचं वाक्य) “हॅलो ऑल” वगैरे केलं.

बाईंनी ‘व्हाट इस सब्जेकट?‘ विचारलं! मी उत्तरलो ‘इंग्लिश इस माय सब्जेक्ट’. बाईंनाच काय कुणालाच कळलं नाही. बाईंनी पुन्हा विचारल्यावर, उत्तरलो ‘इंग्लिश लँगवेज इस माय सब्जेक्ट’!

पुढे काय मग सुरूच झालो ‘आय डोन्ट थिंक इंग्लिश इस ग्लोबल लँगवेज’. बाई मला तोडत म्हणाल्या ‘व्हाय’! मी उत्तरलो ‘इफ यु गो इन चायना, फ्रांस, जपान, जर्मनी ऑर इन युरोपिअन कंट्रीज. दे हॅव देअर ओन लँग्वेजेस’. एकच हास्यकल्लोळ माजला!

पुढे ‘आय वॉन्ट तो लर्न इंग्लिश ओन्ली फॉर ऑफिशिअल पर्पझ. इफ आय गो इन मार्केट ऑर इन बस. अँड इफ आय स्पीक इन इंग्लिश दे विल नॉट अंडरस्टँड‘! मग काय दोन दिवसाचा वचपा निघालेला. बाई चार वाक्यातच शब्दामागील गर्भित अर्थ समजून गेल्या. अन मराठीवरून चाललेला तो वाद कायमचा निकाली निघाला!

तेंव्हापासून एक लक्षात आलं की, काही लोकांना इंग्रजीत सांगितल्यावर ताबडतोप कळते! 🙂 त्यामुळे भीती सोडा! मराठीसाठी इंग्रजी बोला!

सायकल

सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं. (more…)

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो! (more…)

पॅनकार्ड : नवे नियम

पॅनकार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर. त्याचे नवे नियम प्रसिद्ध झाले आहेत. दिनांक पाच डिसेंबर पासून ते कार्यान्वित होतील. केंद्रीय कर संचालक मंडळ (सीबीडीटी) यांनी हे पॅनकार्डचे नियम ठरवलेले आहेत. यात काही चांगल्या गोष्टी देखील आहेत. (more…)

राज्यघटना

आपण प्रत्येकजण राज्यघटना मानतो. घटनेतील तत्वांचा आदर करतो. परंतु राज्यघटना आपल्याला माहिती आहे?. कधी वाचली आहे?. याचे असंख्य ‘नाही’ उत्तरतील. मग ती का वाचत नाही? उत्तर सोपं आहे. कारण ती वाचविशी वाटलीच नाही.
(more…)

चिंता नव्हे चिता

चिंता चिताच आहे. अडचणी येतात व जातात. एक अडचण संपते तर दुसरी डोके वर काढते. त्यामुळे त्यांची चिंता का करावी?. का वेळचा घडा खर्च करावा. त्या अडचणी येणार आणि जाणार देखील. त्यामुळे चिंता करणे पहिल्यांदा सोडा. (more…)

धीर धर रे मना

धीर, धैर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सांगण्यासाठी मला साधारण तीन वर्षे घालवावी लागली. खरं तर माझा मूळ स्वभाव चंचल! एखाद्या खुशाल चेंडूप्रमाणे जीवन चाललेले! कशाची फिकीर नाही. कोणतीही अडचण नाही. शालेय जीवनात साधारण विद्यार्थी ते आजचा एक धडपडणारा उद्योजक! पण जस जसे धैर्य वाढत गेले. तसं तसे त्याचे महत्वही उमजत गेले.  (more…)

बोलणे आणि करणे

बोलणे आणि करणे! आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.

(more…)

सुधारणा

स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते. (more…)

योग्य क्षेत्र

जीवनाच्या प्रवासात मागे वळून पाहिले की अनेक टप्पे दिसतात. शालेय जीवन व त्यापुढील ध्येयाचा/क्षेत्र कडे प्रवास! आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवावं अस म्हणतात. परंतु माझ्या बाबतीत हे कधी घडलं नाही. (more…)