कॅटेगरी: मी

व्यायाम

अनेकदा अनेक कल्पना आपल्या डोक्यात येतात. पण कधी वेळेअभावी तर कधी आळसामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करता येत नाही. खरं तर या विषयावर खूप आधीच बोलणार होतो. पण अशाच एका गोष्टीला वाव देऊ शकत नव्हतो म्हणून थांबलेलो! गेले चार दिवसांपासून व्यायाम सुरु केला आहे. खूप दिवसांनंतर ही इच्छा पूर्ण होते आहे. (more…)

ध्येय काय?

आपले नेमके ध्येय काय?  बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करतो आहे. समजूत घ्याल अशी अपेक्षा करतो! बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ आहे. कशासाठी आपण मराठी मराठी करत आहोत. व नेमकं कशासाठी आपण ह्या गोष्टींवर इतका वेळ खर्च करत आहोत!  (more…)

विरोध कशासाठी..

काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदीनीं पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली. मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती. (more…)

जेव्हा अडचणी येत असतात..

जेव्हा अडचणी येत असतात. आणि तुम्ही त्याच्याशी दोन हात करता. त्यावेळी काही वेळासाठी तुम्ही संपला असं तुम्हाला/आजूबाजूच्या लोकांना वाटत असते. काहीदा अडचणी येतच राहतात. काही काळ तुम्हाला गुंतवून ठेवतो. एक अडचण संपली की दुसरी. असे चक्र चालू राहते. पण माझ्या स्वानुभवरून तरी जेव्हा खूपच कठीण काळ येतो त्यावेळी समजून जा की चांगला काळ जवळ आलाय. (more…)

फक्त मराठीच

बऱ्याच दिवसांनी अचानक प्रकट होतो आहे. मोठ्या मनाने क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. अनेक दिवसांपासून मनात एक विचार घोळतो आहे. भाजप-शिवसेनेचे लफडे पाहून पार विटून गेलेलो. अस वाटलेलं नेमक कोण मूर्ख. आपण की ते? असो, गेले काही महिन्यांपासून निरीक्षण करतो आहे. जेव्हापासून ‘मोदी लिपीत’ देशाचे व्यवहार सुरु झालेत. तेव्हापासून हे गुज्जूभाई. अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत स्पष्ट मराठीत व्यवहार करायचे. आता काय करणार. दुधावाल्यापासून ते किराणा. इस्त्रीपासून ते मिठाईवाल्यांपर्यंत हेच भय्या. फक्त केस कापणारा देवकृपेने मराठी. आजकाल हे सगळे अचानक ‘हिंदीत’ सुरु झालेत. गझनी चित्रपटातील गझनीने ह्यांची ‘मेमरी’ लॉस केली काय, देव जाणे.
(more…)

माझा अखंड महाराष्ट्र

काही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.

(more…)

महाराष्ट्र कुणाचा??

खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.

(more…)

इतिश्री समाप्ती

इतिश्री समाप्ती. बऱ्याच दिवसांपासून ठरवतो आहे. आज, तेच सांगायचं ठरवून आलो आहे. वर्डप्रेसच्या होस्टिंगवर ब्लॉग करण्यापेक्षा स्वतःचा एक नवीन ब्लॉग बनवावा अस म्हणतोय. बऱ्याच दिवसांनी ‘दर्शन’ देतोय. म्हणून विषय सुरु करण्याआधी क्षमा मागतो. खर तर हा ब्लॉग म्हणजे आठवणी. दोन तीन वर्षापूर्वी तर जीवनाचा एक भाग बनून गेलेला. नंतर मग.. सगळंच बदललं.  (more…)

सकाळ

आमच्या पेपरवाल्याच्या कृपेने रोज ‘सकाळ’ उगवायला जरा उशीरच होतो. कंपनीच्या गडबडीमुळे मग ‘सकाळ’ चाळायला संध्याकाळ होते. आधीच कामाचा थकवा, आणि त्यात पहिल्या पानावर पहा नाहीतर पुरवणीत. जिकडे तिकडे ‘अ’ रे ‘अजितदादा’चा आणि ‘प’ रे ‘पवारांचा’. ते सोडलं तर बाकी वाचनयोग्य अस वर्तमानपत्र.

(more…)

नवीन ब्लॉग

नवीन ब्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी बोलतो आहे. खर सांगायचं झालं काय बोलावं यावर बराच वेळ विचार केला. पण काहीच सुचेनासे झाले आहे. आजकाल.. जाऊ द्या ते. ह्या वर्डप्रेसमध्ये रजिस्टर करून पाच वर्षे झाली. म्हणून म्हटलं आज बोलूयात. गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले.  त्याचा ‘चित्रपटच’ डोळ्यासमोर धावला. म्हणजे या ब्लॉग बाळ ‘पाचवीत’ जाणे अजून बाकी आहे. बाकी बोलूच…