कॅटेगरी: मी

वीज आणि काम

शाळेत असताना आम्हाला नेहमी परीक्षेत एक प्रश्न असायचा की ‘माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या ?’ आणि असा प्रश्न आला की आम्ही हमखास ‘अन्न, पाणी आणि निवारा’ अस डोळेझाकून उत्तर लिहून गुण मिळवायचो. पण आज सकाळपासून ज्या ज्या घटना घडल्या त्यापासून मी माणसाच्या अजूनही काही गरजा असतात, या निर्णायाप्रत आलेलो आहे. (more…)

खर्चाच गणित

मागच्या दोन महिन्यापासून खर्च अगदी कळस गाठ तोय. ‘ कमाई चाराणे खर्च रुपया ‘ अशातली ही गत झाली आहे. त्यात आपल्या देशात मनमोहनचे राज्य. म्हणजे विचार करायला वावच नाही. (more…)

मागील वर्षात काय कमावले?

सर्वसाधारण पणे माणसाचे जीवनाचा कार्यकाळ हा 60 वर्षांचा असतो. त्यात आपण 20 वर्ष झोपेत घालवतो. म्हणजे एक तृतीयांश वेळ. मी दररोज 2 ते 2.5 तास प्रवासात घालतो. याचा अर्थ सर्वसाधारण पणे आपण 5 वर्ष प्रवासात घालवतो. कंपनीत मी दररोज 8 तास काम करतो. म्हणजे मी 20 वर्ष कंपनीत घालवतो.

म्हणजे याचा अर्थ मी आयुष्यातील 45 वर्ष असेच घालवणार. उरलेले 15 वर्ष हेच काय ते माझे जीवन. यात मी शालेय आणि शैक्षणिक या गोष्टीत पडणार नाही. म्हणजे आता काय जे काही मी कमावणार ते या 15 वर्षातला असेल. मग त्यात माझी कमाई म्हणजे मित्र, आणि माझे असलेले घरातील नातेवाईक. (more…)

नमस्कार :)

नमस्कार, माझ्या या नावाचा ब्लॉग सुरू करताना मला खरच खूप आनंद होत आहे. माझी मते मी यात मी मांडेल. माझे अनुभव मी यात तुमच्याशी हितगुज करेन. या आधी देखील मी काही ब्लॉग बनवले होते. पण आता मी माझ्या नावाने करायचे ठरवले आहे. असो, हा माझा पहिला वाहिला ब्लॉग.

मला अस नेहमी वाटत आलाय की आपण नेहमी काही तरी कराव आणि ते सातत्याने टिकवाव. म्हणजे कोणी मित्र करावा, त्याच्याशी मैत्री कायम राहावी. कोणते काम करावे, ते देखील सातत्याने व्हावे. आणि आनंदाची गोष्ट अशी की मी यात बर्‍याच अंशी सफल झालो आहे.

असो, पुन्हा भेट होईलच!

या पुढे विरोध नाही

या पुढे विरोध नाही. जवळपास एक वर्ष, जी लोक मला एक व्यक्ती म्हणून आणि एक सहकारी म्हणून आवडत नव्हती. त्याच्या बद्दलचा खूप राग कमी झाला. ते केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेममुळेच. आपल जर खरच कोणावर प्रेम असेल ना तर आपण त्या साठी काहीही करायला तयार असतो. मग आपली भाषा , प्रांत, हे काही आडवे येत नाही. कारण त्यात फक़त प्रेम असते, स्वार्थ नाही. (more…)

नवा दिवस नवा अनुभव

प्रत्येक दिवस काही ना काही शिकवून जातोच. कधी अस होत नाही की काही नव शिकायला भेटल नाही. परवा हे शिकलो की सगळ्या लोकांवर सारखा भरवसा ठेवणे चुकीचे आहे. विशेषत: असे की जे आपण आपल्या मनाच्या अगदी जवळचे असतील. काल, अनपेक्षित घटना घडू शकतात. (more…)

विश्वास आणि अपेक्षा

विश्वास ही अशी गोस्ट आहे की आपण दुसर्‍या व्यक्तीवर किंवा वस्तुवर काही चिंता किंवा विचार न करता त्याकडून आपल्याला हव तस काम होईल अशी केलेली अपेक्षा. खर तर माझा विश्वास सहजासहजी कोणावर बसत नाही. आणि मी अपेक्षा देखील करत नाही. अपेक्षा म्हणजे आपण दुसर्याकडून केलेली इच्छा. या दोनिहि गोस्टी पासून मी स्वतल दूरच ठेवण्याचा प्रयन्त करतो. कारण  रूपालीचा अनुभव घेतल्या नंतर कधी कोणावर विश्वास बसलाच नाही. मी अपेक्षा या करता करत नाही की आपली अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मग वेदना देखील आपल्यालाच होतात. मग मन बेचैन होत. मनाला समजावं खूप अवघड असत. (more…)

मला काय त्याचे??

गोष्ट एका कमळाबाईची

काय सांगावं ती करुणकथा.  एका आटपाट राज्यात एक शिवाजीराव नावाचा युवक रहात होता. तरुण राजबिंडा आणि रुबाबदार.  कधीही न घाबरणारा. त्याचा ‘आवाज’ सर्वांनाच परिचित असा.  त्याचा विवाह एक नाजूक, कोमल अशा ‘कमळाबाई’शी झाला. कमळाबाई मुळातच सालस, आज्ञाधारी. आता रा.स्व. संघरावांची कन्या म्हटल्यावर काय बात. बाबा कधीही काही म्हणाले की कायमच ‘दक्ष’.

दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु झाला. अगदी ‘बाबरी’पासून ते ‘गोध्रा’पर्यंत दोघांचे विचार एक. नजर लागावी असा तो संसार. दोघांनी मिळून पुढे जाऊन ‘बाळ’ झाले. अगदी जोशींच्या ‘मनोहर’ सारखे. पुढे दुर्दैवाने ‘नारू’ रोगामुळे पाच वर्षातच दगावले. बाळाच्या

अतिरेकी आणि अतिरेकी

आपल्या देशात अनेक विचार मानणारे लोक आहेत. काहींना एखादी गोष्ट पटते. तर काहींना दुसरी एखादी गोष्ट पटते. उदाहरण द्यायचे झाले. तर आपल्या पंतप्रधानांचे. काहींना मोदी बरोबर वाटतात. तर काहींना चुकीचे. दुर्दैव एवढेच आहे की, दोन्ही बाजूच्या लोकांना आपलेच मत बरोबर आहे. आणि ते दुसऱ्यांनी पटवून घ्यायलाच हवे असा त्यांचा अट्टाहास. थोडक्यात अतिरेकी दोन्हीही बाजूला आहेत. (more…)