कॅटेगरी: विचार

मराठीसाठी इंग्रजी बोला

मराठीसाठी इंग्रजी बोला. कदाचित हे आपल्याला हास्यापद वाटेल. परंतु, थोडा विचार केला तर हे आपल्यालाही पटेल.

इंग्रजी बोला म्हटलं की अनेकांची तंतरते! त्या गटात मी देखील मोडतो! हाहा!! मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असतांना ज्यांचं इंग्रजी उत्तम नाही अशांना इंग्रजी शिकवण्याचा घाट घालण्यात आला.

आठवड्याभरातच एक ट्रेनर कंपनी सुटल्यानंतर एक पन्नास लोकांच्या गटाला इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्या घेऊ लागली. मीही त्यात होतो. ट्रेनर कसली कडकलक्ष्मी! पहिल्याच दिवशी यातील किती मराठी माध्यमातून शिकले असा प्रश्न केला!

अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्वांनीच हात वर केले. त्यावर बाई, ‘तुम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुमची इंग्रजी कच्ची आहे’ वगैरे बोलू लागली. अनेकांना ती बाब खटकली! काही जणांनी बोलून देखील दाखवली. मुळात चांगलं इंग्रजी येण्यासाठी तो वर्ग होता.

बाईंनी दुसऱ्या दिवशी, ‘शालान्त शिक्षण घेऊनही तुम्हाला अजूनही इंग्रजी येत नाही. याचा कमीपणा वाटत नाही का?’ वगैरे बोलून भडका उडवून दिला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी त्यावर प्रतिवाद केला. खरं तर दोन्हीही बाजूने मते योग्य होती. वाद विकोपाला गेलेला. ट्रेनर बदला म्हणून कंपनीत विषय होऊ लागला.

विनाकारण बाई इंग्रजीच्या नावाखाली मराठी आव्हान देत होते. पुढील दिवशी बाईंनी, मला तुमची इंग्रजी किती चांगल्या बोलू शकता हे पाहायचे आहे म्हणून एक एकाने समोर येऊन बोला म्हणू लागली. कोणीही पुढे जायला तयार होईना. शेवटी मी पुढे जाऊन बोलण्याचे ठरवले!

खरं तर काहीतरी करून दोन दिवसांची उत्तरे द्यायची होती. व चूक देखील दाखवून द्यायची संधी होती. पुढे जाऊन (अगदी घोकंपट्टी झालेले सर्वांचं वाक्य) “हॅलो ऑल” वगैरे केलं.

बाईंनी ‘व्हाट इस सब्जेकट?‘ विचारलं! मी उत्तरलो ‘इंग्लिश इस माय सब्जेक्ट’. बाईंनाच काय कुणालाच कळलं नाही. बाईंनी पुन्हा विचारल्यावर, उत्तरलो ‘इंग्लिश लँगवेज इस माय सब्जेक्ट’!

पुढे काय मग सुरूच झालो ‘आय डोन्ट थिंक इंग्लिश इस ग्लोबल लँगवेज’. बाई मला तोडत म्हणाल्या ‘व्हाय’! मी उत्तरलो ‘इफ यु गो इन चायना, फ्रांस, जपान, जर्मनी ऑर इन युरोपिअन कंट्रीज. दे हॅव देअर ओन लँग्वेजेस’. एकच हास्यकल्लोळ माजला!

पुढे ‘आय वॉन्ट तो लर्न इंग्लिश ओन्ली फॉर ऑफिशिअल पर्पझ. इफ आय गो इन मार्केट ऑर इन बस. अँड इफ आय स्पीक इन इंग्लिश दे विल नॉट अंडरस्टँड‘! मग काय दोन दिवसाचा वचपा निघालेला. बाई चार वाक्यातच शब्दामागील गर्भित अर्थ समजून गेल्या. अन मराठीवरून चाललेला तो वाद कायमचा निकाली निघाला!

तेंव्हापासून एक लक्षात आलं की, काही लोकांना इंग्रजीत सांगितल्यावर ताबडतोप कळते! 🙂 त्यामुळे भीती सोडा! मराठीसाठी इंग्रजी बोला!

पाणी प्रश्न आणि उपाय

नमस्कार, ट्विटरसंमेलनमध्ये मत मांडण्यास संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानतो. याच थ्रेडमध्ये ‘पाणी प्रश्न आणि उपाय’ या विषयावर मी माझे मत व्यक्त करतो! (more…)

दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. (more…)

लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे? (more…)

कर्मवाद

कर्मवाद म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे. विचार करा. अमके करायचे तमके करायचे ठरवतो. पण ते होईल याबाबत आपण साशंक असतो. ते केल्याशिवाय कसे समजेल? (more…)

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत – नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला विचार!

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं! – नेल्सन मंडेला

संकटांपासून बचाव करणेच आवश्यक नाही

चाणक्य विचार:
संकटांपासून स्वतःचा बचाव करणेच आवश्यक नाही. समजूतदार तो आहे जो संकटाशी दोन हात करेल व संकटाला समूळ संपवूनच थांबेल! ~ चाणक्य

विजय तुमचाच असेल! ~ महात्मा गांधी

महात्मा गांधी विचार:
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल! ~ महात्मा गांधी

चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

चाणक्य विचार :
कधी कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका! आपण एकटे आलो आहोत! जाणार सुद्धा एकटेच! जसे कर्म करू तसे फळ मिळेल! जे घडून गेलं त्याला विसरून जा! जे करत आहेत त्यावर विश्वास ठेवा! जे होईल त्याची चिंता सोडून द्या! बस तुम्हाला फक्त कर्म करायचे आहे! त्याला पुरस्कार देण्याचे कार्य भाग्याचे आहे! करेल ते! चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

सुधारणा

स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते. (more…)