आम्ही टीम इंडीया! काय बोलू नका आम्हाला. आम्हाला सगळ ठाव आहे. आम्हाला कस खेळायचे शिकवू नका. मुळात आम्ही विरोधी टीमला कधी कमी लेखत नाही. मग ती, ऑस्ट्रेलिया असो किंवा हॉलंड. आणि ती टीम कमजोर आहे अस कुणाला वाटूही देत नाही. आयरिश खेळाडू चांगले खेळतात आणि हॉलंडचे नन्हे मुन्ने बकवास असा वाद होवू नये यासाठी आम्ही काल अस खेळलो. आणि तुम्हा लोकांना कस कळत नाही. मॅच थोडी घासून झालीच पाहिजे. नाहीतर ती मॅच पाहण्यात काय अर्थ राहिला असता? (more…)
कॅटेगरी: नोंद
ती जागा..
‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती आग भडकावतो. मला खरंच नाही सुचत आहे. डोक खरंच फुटायची वेळ आली आहे. माझ्यातील निर्णय क्षमता आणि निर्णय घेतल्यावर त्यावर अंमलात आणायची ताकत संपली आहे की काय याची शंका येत आहे. (more…)
महिला दिन
आज खरोखरच महिला दिन आहे, याची प्रचीती येत आहे. सकाळी रस्त्यात एक आजी आडव्या आलेल्या. इतका भला मोठा डिव्हायडर कसा ओलांडला हाच मी अजून विचार करतो आहे. किती होर्न वाजवला. मिनिटभर मी माझ्या बाईकचा होर्न वाजवत होतो. आजींना ऐकू नसेल येत. पण दिसत तर होते ना. पार जवळ गेल्यावर अगदी फुटभर अंतर उरल्यावर आजींनी माझ्याकडे पाहण्याचे कष्ट घेतले. पाहून त्यांना धक्का बसण्या ऐवजी मलाच बसला. माझीच धडधड वाढलेली. त्यांच्यात तूसभर देखील फरक नाही. अस अचानक, ते सुद्धा पुलावर! अर्धा माणूस भरेल इतका मोठा डिव्हायडर होता. आजींना पाहून अस वाटत होते की रेहमानला सोबत घेऊन ‘मा तुझे सलाम’ गाणे म्हणावे. (more…)
कोणाला निवडावे?
कोणाला निवडावे? चित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो. (more…)
लिंग ओळखा
ओळखा पाहू! हाय हायss हाय हाय, हाय! चिकना चिकना. कोणी माल घेऊन गेला. कोणी ताल, कोणी जीवाने गेला. आणि कोणी तर जगच सोडून गेला. लुटली लुटली सारी कंट्री!!! आता तरी… मनमोहना करप्शनला कर नो एंट्री. मँगो मॅन किती दिवस तुझी उदो उदो करणार? मान्य आहे की, तू चांगला अर्थतज्ञ आहेस. साधा माणूस आहे. थोडक्यात ‘चिकना’ आहेस. पण काय उपयोग? देशात भाववाढ होते. आणि तू भाववाढ कमी होण्याच्या ‘डेट’ देणार. तुझी ‘डेट’ येऊन जाणार देखील. मग तू दुसरी ‘डेट’. पण प्रत्येक वेळी फरक काहीच नाही. वाढणारे भाव वाढणारच. (more…)
गोल
गेले चार दिवसांपासून मी शाळेत जात आहे. म्हणजे चित्रकलेच्या क्लासला. जानेवारी महिन्यात मी फी भरलेली. पण मुहूर्त या महिन्यात लागला. माणसाच्या चेहऱ्याचे चित्र काढतांना लंबगोल आणि गोल हे बेसिक आहे. त्यावरच पूर्ण चेहरा अवलंबून असतो. पण, मी काढलेले लंबगोल जरा जास्तच ‘लंब’ होतो. अंडाकृती होतो. तर कधी ‘वर्तुळ’. काल एक चेहरा काढला. आता चेहऱ्याचे, डोळ्याचे, ओठांचे आणि कानाचे माप समजलेलं. चित्र काढल्यावर मात्र, आदिमानवाचा चेहरा तयार झाला. त्यानंतर काढलेला ‘गोलगप्पु’ झाला. यार, मी व्यंगचित्रकार होतो की काय याची शंका यायला लागली आहे. चित्रात आपोआप व्यंग निर्माण होते. (more…)
कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? : कंपनीसार
कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? कशाला व्यर्थ कामाला घाबरतो आहेस? कोण काम संपवू शकतो? कोण कामाला संपवू शकते? काम ना निर्माण होते, न संपते. जे झाले, ते छान झाल, जे होत आहे, ते चांगले होत आहे. आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. तू भूतकाळातील कामाबद्दल पश्चाताप करू नकोस. आणि ना भविष्याची चिंता कर. वर्तमान चालू आहे. तुझे काय गेले, म्हणून तू असा रडतोस? तू कंपनीत येतांना तुझे डॉक्युमेंट सोडून अजून काय आणले होते? जे तू गमावलेस? की ज्याचा नाश झाला. (more…)
हाक
हाक मारण्याच्या अनेक मजेशीर पद्धती आहेत. मी रोज ज्या खानावळीत जेवणाला जातो तिथे तर, अनेक नवनवीन पद्धती पाहायला मिळतात. वाढपी करणाऱ्यांची नावे जवळपास कोणालाच माहित नाहीत. मलाही नाही. मग त्यांना हाक मारण्यासाठी कोणी ‘शुक शुक’, तर कोणी ‘मित्रा’. दोन दिवसांपूर्वी तर ‘सुकs सुक’ हो! ‘सुक सुक’. ‘शुक शुक’, ओ, अरे, चूक चूक आतापर्यंत ऐकलेल. हे सुकsसुक ऐकून हसू येत होत. म्हणजे उच्चारण्याची पद्धत जाम मस्त होती. (more…)
काहीही
खर तर आज वेगळ्या विषयावर बोलणार होतो. परंतु, एकदा मन मोकळ करावं म्हणतो. याआधीही मी बोललेलो. आणि आताही तेच बोलतो. मी काही फार मोठा लेखक, विचारवंत नाही. जे बोलतो ते जसेच्या तसे खरडतो. त्यामुळे माझ्या नोंदी ‘काहीही’, काहीतरीच असणार यात शंका नाही. आणि हे मला याआधीही मान्य होत. आणि आताही मान्य आहे. उगाच माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे चुकीचे आहे. मला माहिती आहे की, माझ्यामुळे अनेकांचा बहुमुल्य वेळ वाया जातो. (more…)
हॅक
यार, माझ फेसबुकचे खाते आज पहाटे कोणीतरी हॅक केलेल. खर तर त्या ३१ डिसेंबरला मी माझे चिरकुटचे आणि हे फेसबुकचे खाते बंद केलेले. पण आज पहाटे तीन साडेतीनला कोणीतरी पुन्हा री-एक्टिवेट केलेल. कंपनीत येऊन पाहतो तर, फेसबुकचा ‘वेलकम बॅक’चा इमेल आलेला. यार, कोणत्या महान व्यक्तीने हे कृत्य केले कुणास ठाऊक. परंतु, त्यामुळे पुन्हा त्या फेसबुकवर यावे लागले. असो, हे म्हणजे असे झाले की, चोराच्या घरात चोरी. (more…)