कॅटेगरी: नोंद

फेडअप

खुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल रंगाचा ड्रेस. देवाचे उपकार म्हणायचे तिचे लक्ष नव्हते. नाहीतर तीचा तो नेत्रकटाक्ष. ती तीच्या मित्राशी बोलत होती. तीच्या जवळून जातांना चक्कर आल्याप्रमाणे झाले होते. एकदा वाटले तिला तिथेच ‘हाय’ म्हणावे. पण ती समोर असतांना काय होते कुणास ठाऊक. काहीच करू शकत नाही. असो, डेस्कवर गेलो. (more…)

आज बोललो

झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच सुचत नव्हते. पण केली हिम्मत. डेस्कजवळ जाऊन हाय म्हणण्यासाठी तोंड उघडले तर आवाजच निघेना. तसाच उभा राहिलो. तीच्या लक्षात आले त्यावेळी तिने हाय केले. मग ‘कंठ फुटला’. आज माझा ‘अवतार’ झालेला. (more…)

ती येते आणि..

दुपारपर्यंत तिची आठवणीने हाल हाल केले. आणि दुपारी ती आल्यावर, त्यापेक्षाही हालाहाल. काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती काय दिसते यार. दिसल्यावर अजूनच हालत खराब झाली. दुपारी कसबसे तीच्या डेस्कवर जायची हिम्मत करून निघालो. पण शेवटी व्हायचे तेच झाले. डेस्कजवळ गेल्यावर पुढे सरकायची हिम्मतच होईना. तीच्या बाजूच्या दुसऱ्या क्यूबमध्ये बसलेल्या माझ्या ओळखीच्या एपीएमच्या डेस्कवर जाऊन बोललो. नंतर खुपंच बेकार वाटायला लागले. साधे तीच्या डेस्कवर जाऊन मी बोलू शकत नाही. परवा ती माझ्या डेस्कजवळ आलेली. कदाचित माझ्याशी बोलायचे असेल. पण मी तिच्याकडे साधे मान वर करून पाहायची हिम्मत झाली नाही. काय होते यार, ती येते आणि मला घाम फुटतो. घसा, श्वास, हृदयनाथ सगळेच मला सोडून जावू लागतात. याला कसले प्रेम म्हणायचे यार? मी तिला भितो, हेच खरे आहे. (more…)

अधांतरी

एक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वनरूम किचन आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही. (more…)

राहू

बाबा राहू घरात पाऊल ठेवताच, मॉम खेकसते ‘ए कुठे घुसतो आहेस? हाकला रे! या भिकाऱ्याला’. बाबा राहू हसून’ हे काय मॉम? तू मला आजसुद्धा नाही ओळखलंस? माय नेम इज राहू गंदी’. मॉम गडबडून ‘हम्म, आली स्वारी. कुठले उकिरडे घोळले?’.  राहू ‘ बिहारात गेलो होतो’. वाक्य तोडत मॉम बोलली ‘किती घमेले उचलली?’ राहू ‘मॉम, मी कशाला घमेली उचलू? भाषणाला गेलो होतो’. मॉम उसासा टाकत ‘थांक ग्वाड! मग असा अवतार कसाकाय झाला? म्हणजे नक्कीच बिहारचा विकास झालेला नाही’. ‘नाही मॉम, बिहार खूप सुधारला आहे. महाराष्ट्राच्या पेक्षाही पुढे गेला आहे. दिल्लीच्या विमानतळावरून घरी येतांना जनपथवर उतरलो. टपरीवर चहा मारला. आणि घरात वळतोय, तेवढ्यात एक गाडी बाजूने गेली’ राहू बाबा बोलला. मॉम विचित्र चेहरा करून ‘मग तुझे कपडे चिखलाने कसे काय माखले? आणि फाटले देखील?’. (more…)

विनंती

‘आवरा’ साहेबांना, व सर्व ‘आवरा’ परिवाराला एक विनंती आहे. आपण सर्वज्ञानी आहात. खर तर आपणाबद्दल मी बापुडा काय बोलणार. म्हणून विनंती करीत आहे. आपण आपला इमेल आयडी खरा टाकावा. दुर्दैवाने आपण कोण आहात हे कळल्यावर खरंच मला खूप दुख झाले. पण लपून काही बोलण्यापेक्षा सरळ बोलणे कधीही चांगले. काय करणार हे वेब आहेच असे आहे, सर्वच रेकोर्ड होत जाते. आपण केलेले क्लिक पासून ते वेळेपर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला देखील सापडणे फार अवघड गेले नाही. परंतु आनंद या गोष्टीचा झाला की, आपण माझ्या नोंदींना भेट देता. (more…)

नो पिंग पॉंग

काय बोलू तेच समजत नाही आहे. म्हणजे अगदी, सुरवातीपासून हेच चालू आहे. असो, आता या सर्व गोष्टींचा कुठे तरी शेवट करावं अस वाटते. आज मी तिला हाय करून गुड मोर्निंग केल्यावर तिनेही हाय केले आणि नंतर ‘बाय’. पाहून ‘शॉक’ बसला. म्हणजे मला हेच नेमके कळल नाही, की तिने अस का केल. मी तिला रिप्लाय म्हणून प्रश्नचिन्ह टाकल. पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही. कदाचित कामात खूप बिझी असेल म्हणून? की मला टाळायचे होते म्हणून. साल, माझ्या डोळ्यातल्या धरणाचा बांध इतका का कच्चा झालाय कुणास ठाऊक. मग मी दुपारपर्यंत ते कम्युनिकेटर बंद केलेलं. (more…)

‘चा’राणे

चित्रपटाची सुरवात ‘नारी नारीsss नारी नेंदू नेनु! नारी नारी अल्बी इगा रानूss’ गाण्याने होते. आणि चित्रपटाच्या नायकाच्या वडिलांची एंट्री पत्रकार परिषदेत होते. नायकाचे वडील ‘बा’राणे बोलायला सुरवात करतात. ‘सिवशेनेत पैसे घेऊन तिकीट दिले जाते’. पत्रकारांचा एकच गलका होतो. मध्येच कोणीतरी ‘बसमध्ये देखील पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही’ ओरडते. ‘बा’राणे मोठे डोळे अजून मोठे करीत खेकसतो ‘माले तू खुळा की काय?’. आणि पुढे काही बोलण्या ऐवजी शिव्याची लाखोली व्हायला सुरवात केली. पुढे चित्रपट वेग घ्यायला सुरवात करतो. ‘बा’राणे अनेक खस्ता खात, आणि इटालियन शिव्या खाऊन मंत्रीपद मिळवतो. आपल्या पक्षाची संस्कृती जपत आपल्या मुलाला म्हणजे ‘आठाणे’ला खासदार करतो. (more…)

स्वप्नाहून सुंदर

आजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच घुमतो आहे. आज ती काय दिसत होती म्हणून सांगू! बस्स!! आता तीच हवी फक्त. कालचा दिवसाबद्दल न बोललेलं बर. कारण, मी ‘हरलो’ असंच वाटायला लागलेलं. मला सर्वजण तिच्याशी बोलत रहा म्हणून सांगतात. म्हणून मी काल दुपारी तिला पिंग केल. आणि तिने तासाभराने रिप्लाय. मला खरंच नाही झालं सहन. डेस्कवरच गंगा यमुनेचा बांध फुटायला लागला होता. कसबस स्वतःवर कंट्रोल ठेवलं. पण मित्र आल्यावर नाही रोखता आला. पहिल्यांदा अस प्रोफेशन लाईफमध्ये घडलं. इमारतीच्या बाहेर गेल्यावर सगळ् मन मोकळ केल. रात्री देखील विचारांनी हैराण झालो होतो. आज सकाळी कशातच मूड नव्हता. (more…)

घराणेशाही

‘नारायण! नारायण!’ करीत नारदमुनी भाषणाला उभे राहिले. आराध्य विष्णूला वंदन करून बोलायला सुरवात केली. माझ्या विठ्ठलाने ‘घराणेशाही’ सुरु केली आहे. दहा एक वर्षापूर्वी उद्धवा उद्धवा असा धावा केला. म्हणून मला स्वर्गलोक सोडून नरकात यावे लागले. इथे ‘नारायण’ ऐवजी आता मला ‘गांधारी’ म्हणावे लागते आहे. आणि तिकडे माझ्याप्रमाणेच युवराजला देखील ते सोडून पृथ्वीलोकवर यावे लागले. हे स्वर्गात घडले. नरकात तर हेच चालते. महात्मा गंधर्वांनी सुरु केलेली परंपरा अजूनही चालू आहे. आता नवा राहुल गंधर्व. (more…)