कॅटेगरी: नोंद

मित्रास पत्र

प्रिय राहुल बाबास,
सा.न. वि.वि. मागील महिन्याच्या आठ सप्टेंबरला तुझा वाढदिवस होता ना! चल मला ते माहिती आहे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पोळा पाहिल्यावर पत्र टाकणार होतो. पण काय सांगू आजकाल माझ्या आयुष्यात खूप बदल घडतं आहेत. त्यामुळे नाही जमलं. मग तुला फोनच करणार होतो. पण मध्यंतरी तुझा ब्लॅकबेरी चोरीला गेल्याची बातमी वाचली होती. आणि मेल चेक करायला तुला वेळ कुठे असतो तुला? प्लास्टिकची घमेली उचलण्यात तू खूप बिझी असतो, अस पहिले टीव्हीवर मी. म्हणून मुद्दामहून पत्र टाकत आहे. मध्यंतरी तू पुण्यात आला होतास. म्हटलं असते तर भेटलो असतो. बर माझ सोड. आठ सप्टेंबरला काय बुवा एका मुलाची मज्जा झाली असणार! फुगे काय, घेरू काय आणि झूल काय, सगळंच छान. अगदी हॅंडसम दिसत असशील. तू काय बाबा, आधीच इतका गोरा गोमटा. त्यात हे सगळ् पाहून गायीच काय म्हशी सुद्धा चेकाळल्या असतील. तुझे पराक्रम तर जगविख्यात आहे. (more…)

एकतर्फी

सगळंच संपल्यासारखे वाटते आहे. खर तर कालच बोलणार होतो. पण रात्री संगणक सुरु केल्यावर सुद्धा मूड नव्हता बोलायचा. काल तिने एकदाही साध ढुंकूनही पहिले नाही. आणि कॅन्टीनमध्ये देखील आली नाही. आणि सकाळी केलेले ‘गुड मॉर्निंग’  पिंग आफ्टरनून झाल्यावर ‘गुड आफ्टरनून’ केल. खरंच खूप बेकार वाटत आहे. सगळंच उदास वाटत आहे. मुळात मीच मुर्ख आहे. माझ्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. आणि आता ती देखील. ती बिझी असतांना मी तिला पिंग करून त्रास देतो. सारखा तिच्याकडेच पहात रहातो. बर हे कमी म्हणून की काय मेल पाठवून अजून तिला डिस्टर्ब करतो. नाहीतरी ‘मी चुका सम्राट’ आहेच. (more…)

लव्ह मॅरेज

काल रात्री काकाने घरी मला बोलाविलेले. म्हणून गेलेलो. जेवण झाल्यावर भिंग घेऊन माझ्या पंजावरील रेषा पाहत बसलेलो. घरी आहेत काही पुस्तके त्या हस्तरेषावर दहावीच्या सुट्टीत वाचलेली. दोन मिनिट झाले नसतील तर मैत्रीण आली. झालं, आल्यावर लगेच ‘मुलींचा कोणता पाहतात?’ विचारलं. ‘डावा’ म्हटल्यावर डावा हात दाखवला. आणि मला म्हणाली ‘सांग माझ काय होणार लव्ह की अरेंज मॅरेज?’. तिला सांगितले मला नाही कळत काही त्यातील. तरी ऐकेच ना. एकतर तिचे वागणे आजकाल मला भीतीदायक वाटत आहे. (more…)

राशी

माना अथवा नका मानू. पण हा ‘राशी’ विषय खूप मजेदार आहे. आता मी काही यातला पंडित नाही. पण जे अनुभवले तेच बोलतो. माझे अनेक मित्र आमचा यावर विश्वास नाही बोलतात. पण त्यांना त्यांची रास माहिती असते. मध्यंतरी असंच नेटवर सर्वात जास्त हिटिंग कुठल्या विषयावर होते ते पहात होतो. तर, सेक्स, खेळ आणि नंतर राशी. बापरे! आई इथे आली की, रोज येणाऱ्या सकाळ वर्तमान पत्रातील फक्त भविष्य वाचते. (more…)

आकर्षण

सकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच. (more…)

न संपणारा चित्रपट

आजकाल रोज एक नवीन समस्या. आणि रोज नवीन अडचण. काय करावं तेच सुचत नाही. माझ्या ‘थेअरी’ मास्तर मित्र रोज एक नवीन आयडिया देतात. एकाने मध्यंतरी, तू हा चित्रपट पहिला आहेस का? नाही म्हटल्यावर तो तरी पहिला असशील असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. मागील आठवड्यात एकाने समस्या सोडवण्यासाठी ‘दबंग’ पहा म्हणून सल्ला दिला. ठीक आहे म्हणून तो ‘दबंग’ पहिला. पाहून समस्येवर उत्तर मिळण्याऐवजी ‘डोके भंग’ झाले. काय बोलावं त्या महाकाय सलमान बद्दल. सोडा, मुळात काय चालल आहे हे समजायला खूप वेळ गेला. त्यात ती मारामारी. बापरे, म्हटलं चित्रपट मध्येच बंद करावं तर चिडून तो चुलबुल पांडे बाहेर येऊन मलाच ठोकायचा. म्हणून मग चालू ठेवला. संपल्यावर उसासा टाकला. (more…)

बोरकर

खरंच खूप आनंद होत आहे. काय सांगू, आज मी तिला इतक बोर केल की, तिने मला शेवटी मी बिझी आहे. अस म्हटलं. खरंच मी खूप बोर करणारा आहे. कोण कामात आहे आहे, कोण मोकळ आहे हे सुद्धा कळत नाही मला. तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप काम आहे. आणि मी सारखा पिंग करून तिला त्रास देतो. सर्वांनाच मी खूप बोर करतो. फोनवर बहिणाबाईला, घरी आई वडिलांना. आणि कंपनीत तिला. काय बोलावं, तेच कळत नाही आहे. (more…)

खेळ मांडला

विद्युत रोषणाईत आणि धडाकेबाज राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारंभाची सुरवात झाली. चेअरमन साहेब भाषणाला उभे राहिले. ढेरी दाखवत, भाषणाला सुरवात केली. माझ्या प्रिय, क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांनो, आणि आमचे (ब्रिटीश) युवराज आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री ‘मिष्टर’ दीक्षित, तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ‘आझाद’. या स्पर्धेच्या निमित्ताने आज तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळते आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचे या स्पर्धेचे आयोजन करायला संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल आभार मानतो. आता स्पर्धा सुरु होते आहे. खेळ तर आधीपासूनच सुरु झाला होता. माझ्या म्हणण्याचा अर्थ, खेळाची तयारी. तुम्ही पहातच होता किती मेहनतीने आम्ही हे सर्व उभे केले आहे. (more…)

आमची कार्टी

काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, पण खूपच बेकार वाटत आहे. काय कोणाला बोलायचे आता? (more…)

भोपळा

परीक्षेचा निकाल पाहण्याची गरज राहिलीच नाही. उलट भोपळा नाही मिळाला तर आश्चर्य असेल. आता अभ्यास न करता गेल्यावर हेच होणार होत. असो, चूक झाली. आणि मला ती मान्य सुद्धा आहे. अजून तीन विषय बाकी आहेत. याची कसर त्यात काढेल. नेहमी आजच उद्यावर ढकलले. परवा माझा मुंबईचा मित्र आलेला. तरी अभ्यास झाला असता. पण नंतर करून म्हणून राहिलं. त्याला काल दुपारच्या साडेतीनच्या ‘डेक्कन’ने बसवले. त्यानंतर साडेचारला मी घरी आलो. जरावेळ विश्रांती घेऊ म्हणून जरा झोपलो. तर साडेसातला जाग आली. (more…)