कॅटेगरी: नोंद

मिशी

मिशी ही गोष्ट खूप जुनी आहे. अगदी सर्व धर्माच्या प्रेषितांच्या जन्माआधी ‘मिशी’चा जन्म झाला. यावर सर्व धर्मांचे एकमत होईल. सोडा. मिशीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अगदी सुरवातीला येणारे ‘मिसरूड’. विशीत असणारी थोडी दाट लव. त्यानंतर मग मात्र जाड मिशा. म्हणजे लोकमान्य टिळकांसारख्या. पिळदार मिशा, तलवारी प्रमाणे, बारीक अगदी रेघे प्रमाणे, चार्ली चाप्लीन/ हिटलर यांची देखील मिशी. असे अनेक प्रकार आहेत. आजकाल मिशी न ठेवणे हाच प्रकार रूढ झालेला आहे. काय म्हणतात ‘युथ आयकॉन’चा एक प्रकार. पण आधी ज्याला मिशी राखता येत नसे तोच ठेवायचा नाही. (more…)

त्रास

खूप डोक दुखत आहे. काय करू खरंच, काहीच सुचत नाही आहे. ती आज एकदाही भेटली नाही ना बोलली नाही. दिवसभर कामात बिझी. सकाळी देखील तिचे मित्र आणि मैत्रीण माझ्या डेस्क जवळून गेले. पण ती नाही गेली. मला वाटलं होत, ती सुद्धा येईल. पण नाही आली. कॅन्टीनमध्ये सुद्धा ती नव्हती आज. जेवायची इच्छाच होत नव्हती. असो, मुडच नाही आहे काही बोलायचा. काय करू यार, जेणेकरून तिला मी आवडेल? मला खरंच आता नाही सहन होत यार. आता कंपनीतून लवकर याव असा काही विचार नव्हता. पण तिथे. यार, मला शंका वाटते, माझा तिला त्रास तर होत नाही ना. म्हणजे मी तिला पिंग करत असतो. मेल पाठवतो. त्यामुळे तर ती माझ्याशी आज अस! कदाचित असेलही. (more…)

वादविवादस्थान

काय मजेदार देश आहे आपला, इथे जन्मापासून मरेपर्यंत सगळीकडे वादच वाद. ‘शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?’ याचा वाद. त्याचे गुरु कोण यावर देखील वाद. एवढे तरी बर की ‘आई’ कोण यावरून वाद नाहीत. अरे, आजचा खरा खुरा ‘शोले’ राममंदिर.. त्यावर सुद्धा वाद. देवाला सुद्धा नाही सोडले. मुंबई कोणाची? यावर सुद्धा वाद. मुळात देश ‘निधर्मी’ की ‘हिंदूराष्ट्र’ यावर सुद्धा वाद आहेच म्हणा. अरे हिंदुस्थान की भारत की इंडिया यावर देखील वाद चालूच आहे म्हणा. राष्ट्रभाषा नाही. पण त्यावरून देखील वाद. सरदार सरोवरच्या बंधाऱ्याची उंची वाढवण्यावरून वाद, कश्मीरमध्ये तर सगळेच वाद. बिचारे जम्मू आणि लडाखवाले. नक्षली उंदरावर सैन्याचा फवारा मारायचा का त्यावर देखील वाद. महिला आरक्षण द्यायचे की नाही त्यावर देखील वाद. (more…)

हे मित्र ना..

हे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श! हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले. (more…)

मस्त

काय सांगू आणि काय नको अस झालं आहे आता. कालचा तो दिवस. दिवस कसला स्वप्नंच. परवाचा दिवस आणि ती रात्र. रात्री असली चित्रविचित्र स्वप्न पडली ना. असो, नीट झोपच आली नाही. काल सकाळी उठलो तरी सर्दी आणि डोकेदुखी कमीच होईना. व्यायाम करतांना खुपंच हाल झाले. शेवटी अर्धवट व्यायाम सोडला. सुट्टी घ्यावी अस मनात येत होते. पण गेलो तसाच. दाढी सुद्धा नाही केली. एकतर आधीच अशक्तपणा, त्यामुळे काळवंडलेला चेहरा आणि बिनदाढीचा. आणि ते बंडल कपडे. थोडक्यात ‘अवतार’ झालेला माझा. तसाच गेलो. डेस्कवर बसल्यावर ती ऑनलाईन आहे का ते पहिले. तर ती आलेली. खर तर काल मी तिला ‘गुड मोर्निग’चा मेल टाकायचे ठरवलेले. पण पिंग केले. सोडा, मी पण काय पान्हाळ लावत बसलो आहे. (more…)

पसंत कर

मागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली. (more…)

यांना म्हणायचे खरे मित्र

जे आपल्याला कधीही आणि चुकूनही फोन करणार नाही. फार फार तर मिस कॉल. आणि केला तर काही ‘त्यांचे’ काम असेल तरच. आणि त्यांचे ते काम म्हणजे जणू काही ‘राष्ट्रीय संकट’ आहे, असा आविर्भाव आणतील. पण आपले काही काम असेल तर मग मात्र जणू काही अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागतील. आपण फोन केला तर त्यांना फोन कट करण्याचा ‘जन्मसिद्ध’ हक्क. आणि आपण कट केला तर त्यांची नाराजी. ज्यांना त्यांची इच्छा महत्वाची वाटेल, आपली नाही. थोडक्यात त्याचं काम ‘काम’, आणि आपल काम ‘टाईमपास’. (more…)

सुगंध

आता ‘बूट’ला मराठीत काय म्हणतात माहित नाही. मराठी भाषेत ‘पादत्राणे’ अस म्हणतात की काय? की ‘पादुका’? अस काही तरी म्हणत असतील. किती महत्वाचे असतात याची जाणीव आज होते आहे. जर ते चांगले असतील तरच.. नाहीतर आज मी तेच अनुभवतो आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ‘न’ पॉलिश केलेल्या. आणि न धुतलेले मोजे घालून माझी स्वारी आज सकाळी घरातून निघाली. (more…)

दुरावा

माफ करा, मी स्वतःला नाही ‘आवरू’ शकत. आजकाल रोजच नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कालपासून तिची जागा बदलली. आता ती तिच्या मैत्रिणीच्या आणि त्या तिच्या सिनिअरच्या क्यूबमध्ये बसते. मला ना, काहीच सुचत नाही आहे. आता मी तिच्या सोबत कसा बोलू. म्हणजे आधी ती माझ्या डेस्कच्या जवळच तिचा डेस्क होता. त्यामुळे येता जाता तिच्याशी बोलायची आणि तिला पाहण्याची संधी मिळत होती. पाणी आणायला जातांना सुद्धा जायची. पण आता ते सुद्धा नाही. (more…)

सामना

वेलकम, आजच्या इंडिया आणि कश्मीर (जम्मू नाही) यात क्रिकेटचा एक लंगोटी सामना होत आहे. माझ्यासोबत, कॉमेंट्री बंकरमध्ये आहे ‘चंद्र’ शास्त्री. सामन्याच्या आधी आपण खेळपट्टीची पाहणी करूयात. काय वाटत चंद्रा? चंद्रा ‘वेल, इफ यु सी इन पीच, देअर आर सो मेनी घाटी अन् स्टोन्स’. ‘थांक्स, चंद्रा’. आता आपण डायरेक्ट मैदानात पाहुयात कोण टॉस जिंकते आहे. टीम इंडियाचा कॅप्टन ‘ओमर दुल्हा’ (छापा) आणि काश्मीरचा कॅप्टन पाकलानी (काटा) यांच्यात टॉस होत आहे. पाकलानी ने चारणे हवेत फेकले आहेत. आणि ‘काटा’. सामन्याचे (पोपट)पंच जनाब नापाक यांना पाकलानी यांनी गोलंदाजी घेण्याचा निर्णय कानात सांगितला आहे. अरे हे काय, ओमर दुल्हा काही तरी बडबड करीत आहेत. त्यांचे मत जाणून घेऊयात. ओमर दुल्हा ‘हा अन्याय आहे. हे चारणे बच्चन छाप आहेत’. (more…)