म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले होते. ती नव्हती तर कंपनीत एक एक मिनिट काढणे खूप त्रासदायक वाटत होते. पुन्हा माझ्या फ्लोरवर जाण्यासाठी निघालो. मनात तिची इतकी आठवण दाटून आली होती ना! गंगा यमुना यायच्या बाकी होत्या. (more…)
कॅटेगरी: नोंद
शोधू मी..
कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे. (more…)
सौंदर्याची देवी
काय सांगू आजचा दिवस कसा गेला ते!!! आज अप्सरा काय दिसत होती. ती इतकी छान आहे ना! आज माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. एकतर ती इतकी गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. आणि आज तीचा तो गुलाबी रंगाचा ड्रेस. तिला पाहून आज दिवसभर मला तिच्याशी काहीच बोलता नाही आले. खरंच ती इतकी सुंदर दिसत होती ना! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज खूप, खूप डब्बा. नाही खरंच, काल कुठून बुद्धी सुचली आणि केस कापायला गेलो अस झालं. आता मी म्हणजे ‘टकलू हैवान’. त्यात कालही गाढवपणा घडला. काल ती दुपारी माझ्याकडे बघून हसत जात होती. आणि मी तिला पाहून न पाहिल्याप्रमाणे केले. तिचे ते गोड हास्य! काय सांगू किती छान दिसत होती. आणि मी मुलीसारखा लाजून खाली मान घातली. आणि तीच्या मैत्रिणीकडे पहिले. यार, ती माझ्याकडे पाहते त्यावेळी माझी परिस्थिती हृदयविकाराच्या झटका येऊन शेवटचे काही सेकंद मोजत असलेल्या माणसाप्रमाणे होते. त्या क्षणाला मला काहीच सुचत नाही. आणि मग मी असल्या ‘गाढवचुका’ करतो. नंतर रात्रभर अप्सराने काय विचार केला असेल या विचाराने डोके खाल्ले. (more…)
मी एक मूर्ख
खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली होती. आणि ती मते मला मान्य देखील होती. कारण ती चूक माझ्यामुळेच सुरु झाली होती. प्रत्येकाला हवी ती आणि तशी मते मांडण्याचा अधिकार आहे. आणि मला देखील ते मान्य आहे. मी देखील माझी मतेच मांडत असतो रोज. फरक फक्त इतकाच की मी, फक्त माझ्याच बद्दल बोलतो. मला काय वाटले, माझ्यासोबत काय घडले. बस्स! यापलीकडे मी जातच नाही. आणि गेलो तरी जेवढ्यापुरते तेवढेच. (more…)
अप्सरा आली
आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती माझ्याकडे पाहत होती. मग केली हिम्मत बोलायची. आज पण ती किती छान दिसते आहे. यार, मी तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा तीच माझ्या बद्दल विचारात असते. नेहमी मी कुठे राहतो हे विचारते. (more…)
मराठी बातम्या
डिंग डोंग डिंग… नमस्कार आजच्या दुपारच्या ‘न्यूजमॉल’मध्ये तुमचे स्वागत.. सुरवातीला पाहुयात ‘हेडलाईन्स’. ‘मल्टिप्लेक्स’मध्ये मराठी चित्रपटांचे दर कमी होणार. गरज पडल्यास साहित्य संमेलनाचे ‘ऑडिट’करू, राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे आश्वासन. लवासाच्या चौकशीची शक्यता, आमच्या ‘न्यूजचॅनेल’चा ‘इम्पॅक्ट’. आर.आर.पाटील बनले ‘आर.जे’. ‘मिस मेक्सिको’ जिमेना नवारते ठरली ‘मिस युनिव्हर्स’. श्रीलंका तिरंगी मालिकेच्या ‘फायनल’मध्ये. (more…)
प्रतिज्ञा प्रत्येकाची
राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
मला दयेचा अर्ज केलेला आणि मला दयेचा अर्ज न केलेला फाशीचा हकदार
यांच्या फाशी रद्द करण्याची आणि त्यांच्यावर दया दाखवण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे। (more…)
अप्सरा नसतांना
यार कधी येणार ती? आता उद्या सुट्टी. म्हणजे झालं. बर आहे. पण कधी येणार ती अस झालं आहे. कितीही बोललं तरी कमीच वाटत तिच्याबद्दल. काल थोडा राग आला होता त्या घासदारांवर. सोडा, पुन्हा तिचा चेहरा आठवला की, राग निघून जातो. काल तिची खूप आठवण येत होती. मग तिची सोशल नेटवर्किंग वरील प्रोफाईल पाहत बसलो. तसे हे देखील रोजचेच चालू आहे. आज ती येणार नाही हे माहिती होत मला. पण तरीही ती असल्याचा भास होतो आहे. येतांना मस्त पावसाच्या सरी येत होत्या. म्हणून मग बस स्टॉपवर लवकर आलो. मस्त वाटत भिजायला. पण खूप लवकर गेला पाऊस. मी साधा भिजलो देखील नाही. पण पावसाच्या सरी आणि ते वातावरण मस्त होते. ती सोबत असती तरी अजूनही छान झाले असते. (more…)
घासदारांस पत्र
अप्रिय घासदार यांस,
मतदारांचा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत दंडवत.
पत्रास कारण की, कालचा आपला अतुलनीय पराक्रम दूरदर्शनवर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. उगाचंच, आमच्या देशात एकी नाही अस म्हटले जाते. आता आम्ही नाही म्हणू शकलो तरी तुम्ही ‘हम सब एकच है’ हे म्हणू शकता. जगाच्या कुठल्याही देशात, घासदार आपला घास वाढवा म्हणून इतकी मोठी एकी किंवा साधी मागणीही केलेली नव्हती. पण तुम्ही तो रचून आपल्या देशाचे नव्हे तर सर्व घासादारांची नावे गिनीज बुकच्या नव्या बुकात नक्कीच जातील. अजून काय पाहिजे देशाला? तुम्ही घडवलेला इतिहास खरंच अतुलनीय आहे. (more…)
ते तीन क्षण..
कालचा दिवस कसा गेला काय सांगू! अप्सरा किती छान आहे. इतकी छान काल दिसत होती. आणि त्याहुने तिचे ते गोड हसणे. काल कंपनीत गेल्यावर तिला ‘हाय’ करण्यासाठी किती यार! पहिल्यांदाच जाणार त्यावेळी मित्र आला माझ्याकडे. नंतर कॅन्टीनमध्ये नाश्ता केल्यावर पुन्हा तीच्या डेस्कच्या बाजूने जाणार त्यावेळी तीच्या प्रोजेक्टमधील ती काकू तीच्या डेस्कवर. मग खूप वैताग आला. आणि तिने देखील लक्ष दिले नाही. मग काय त्या चातक पक्षाप्रमाणे तीच्या एका नजरेच्या चंद्रासाठी हा चातक आसुसलेला. काय सांगू दुसरे तिसरे काहीच सुचेना. खूप वेळ वाट पहिली. पण ती कामात. आणि माझे आजकाल तिला पहाणे हेच काम. मी तरी काय करू? माझे आजकाल हेच चालू आहे. डोक्यात दुसरा तिसरा विचार येतंच नाही. माझ ना! सोडा. (more…)