कॅटेगरी: नोंद

परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. (more…)

रद्दताई पाटील

कोणीही चिडायचे नाही आता! आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना! एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी? आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना! (more…)

लयलूट

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ड्राईव्ह. त्यामुळे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर घ्यावा लागला. मित्राला त्या एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत विचारली तर तो बोलला की अंदाजे दोन हजारापर्यंत जाईल. चिंचवड स्टेशनला डेटा केअर सेंटरमध्ये गेलो. तिथे जाऊन चौकशी केली तर त्यांनी सॅमसंग एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत चार हजार दोनशे सांगितली. (more…)

बेस्ट फाईव्ह

साहेबांचा फोन वाजला. साहेबांनी डोळे चोळत फोन उचलला. एक मोठी जांभई दिली आणि ‘हल्लो, काही कळत नाही का? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण कडमडल?’ तिकडून उत्तर आल ‘माफ करा साहेब, मी तुमचा पीए बोलतो आहे. आता आपली ‘बेस्ट फाईव्ह’ची मिटिंग आहे’. साहेब कडाडले ‘अरे गाढवा, मिटिंग ठेवायची ही वेळ आहे’. तिकडून ‘साहेब दुपारचे चार वाजले आहेत. तुम्हीच तर मागील दोन महिन्यांपूर्वी त्या बोर्डवाल्यांना मिटिंगसाठी वेळ दिली होती’. साहेबांनी कंटाळलेल्या आवाजात ‘अरे झोपू दे रे,  त्यांना सांग साहेब आज खूप बिझी आहेत’. तिकडून ‘बऱ, त्यांना ऑफिस मधून काढतो बाहेर.’ साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुन्हा साहेबांचा डोळा न लागतो तेच पुन्हा फोन वाजला. (more…)

मजेदार भाषांतर

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो. (more…)

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. (more…)

ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस

माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ब्लॉगबाळाच्या जन्मानंतर सगळंच बदललं. (more…)

भगवा

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा विजयी’. (more…)

ट्रॅफीक जॅम

ट्रॅफीक जॅम काही नवीन गोष्ट नाही. पण पावसाळ्यात आमच्या पुण्यात ‘ट्रॅफीक जॅम’चा सिझन असतो. काल असंच डांगे चौकापासून ते हिंजवडीपर्यंत ट्रॅफीक जॅम होता. आमच्या कंपनीची बस रांगत रांगत कंपनीपर्यंत जायला दीड तास लागला. डांगे चौकातून बस रांगायला सुरवात झाली. सुरवातीला एवढी ट्रॅफीक का  झाली आहे ते कळेना. हायवेच्या पुलाजवळ उभे असलेले पोलीस बघितल्यावर लक्षात आले की नेमके कारण काय. त्या ठिकाणी पोलीस नसले की वाहतूक सुरळीतपणे चालू असते. पण कोणी पोलीस उभा राहिला की वाहतुकीची कोंडी झालीच म्हणून समजा. (more…)

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. (more…)