पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला माझ्या वयाच्या शेवटी देखील पाच आहे. आणि सध्याला असलेले माझ्या वजनात देखील शेवटचा अंक पाच आहे. (more…)
कॅटेगरी: नोंद
काय बोलू?
यार हा लग्न विषय ना पिच्छा सोडत नाही आहे. जो बघाल तो माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रतिक्रियेतून हाच प्रश्न विचारला होता. गेल्या महिन्यापासून हेच चालू आहे. माझ्या इमारतीतील सगळे कधीही भेटले की हाच प्रश्न. आणि माझ लग्न खर बोलायचं झालं तर मोडल. आता ह्याच दु:ख माझ्यापेक्षा माझ्या नातेवाईकांनाच जास्त झाल्याची शंका येत आहे. मध्यंतरी माझ्या कोकणातील काकूचा फोन आला. तिने मला ‘लग्नाचे कुठपर्यंत आले?’ असा प्रश्न केला. मी म्हटलं की ‘केंसल झालं’. पुन्हा ‘का?’ विचारल्यावर मी खर काय ते सांगितलं. (more…)
सर्दी
परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. त्यात आई देखील गावी गेलेली. मी इथे एकटाच. सगळ्यांची खूप आठवण येते. (more…)
वाढता वाढता वाढे..
एकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे महागाईचे. नाही नाही दरवाढीचे. कारण ही महागाई इतकी वाढण्याचे सारे श्रेय मनिसिंहला जाते. काय चुकीचे वाटते? (more…)
आंधळे आणि पांगळे
एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे पांगळे आमदार बनतो. बऱ्याच वर्षांनी दोघेही आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहचतात. (more…)
कुटुंब
हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की प्रत्येक गोष्ट विस्तृत बोलायची झाल्यास एखादे ‘ईबुक’ बनून जाईल. काही खूप छान घटना घडल्या तर काही खुपंच मनाला बोचणाऱ्या. (more…)
हो की नाही
काय सुचेनास झालं आहे. वडिलांचा सकाळी फोन आला होता. मला त्यांनी ‘पुण्यातील त्या स्थळाबद्दल तुझा काय निर्णय आहे’ अस विचारलं. वडिलांना संध्याकाळी फोन करून सांगतो म्हणून म्हटलं. सकाळपासून खूप विचार केला पण हो म्हणू की नाही म्हणू अस झालं आहे. कारण त्या स्थळाने पाहण्याच्या कार्यक्रमानंतर ‘हो’ म्हणून सांगितले. मग पंधरा दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. त्यानंतर पुन्हा काय झाले कुणास ठाऊक, महिना उलटल्यानंतर पुन्हा ‘हो’ झाले. परत आठ दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. आणि आता दोन महिन्यानंतर त्या स्थळाचा ‘बोलणी करायला कधी येता’ असा फोन आला. त्यांना वडिलांनी आता नक्की ‘हो’ आहे का अस विचारल्यावर ते म्हणाले आता आमचा निर्णय झाला आहे. मग वडिलांनी मी मुलाशी बोलून तुम्हाला कळवतो म्हणून त्यांना सांगितले. आता काय निर्णय घ्यावा? (more…)
बँकांची लफडी
सकाळी मित्राचा फोन आला. फोन उचलला तर तो बोलला ‘अरे, आजही बँकेचे काम झाले नाही’. असो, मी फ़क़्त हसलो. कारण आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची बँकांना सुट्टी आहे हे मला माहित होत. त्याच्या सांगण्यावरून मी त्याच्या जळगावच्या नातेवाईकाच्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा केले. त्याला त्याच्या नातेवाईकाच्या मदतीला दोन तासात पैसे पाठवायचे होते पण ते करायला तीन दिवस लागले. दोन दिवस त्याने दोन तीन बँकेच्या पाच एक शाखांचे उंबरठे झिजवले होते तरी त्याचे काम झाले नाही. आज सुट्टी बघून तो जाम चिडला होता. (more…)
भयकथा
भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात असतांना एका नवीन कामगाराला इतर कामगारांनी त्या चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची गोष्ट सांगितली. त्याने या सगळया खोट्या गोष्टी असतात, भूत वगैरे नसतात. असे त्या बाकीच्या कामगारांना म्हटले. त्यावर त्या कामगारांनी ‘मग हिम्मत असेल तर त्या झाडापाशी रात्रीच्या वेळी जाऊन दाखव’ अशी अट घातली. त्या नवीन कामगाराने देखील ताबडतोप ताबडतोप ती अट स्वीकारली. (more…)
मन भटकंती
काल कंपनीच्या बसमधून कंपनीत जात असतांना एक मुलगी माझ्याकडे बघत होती. असो, आधी मी तिच्याकडे बघायचो. काल चक्क ती माझ्याकडे बघत होती. तसे आम्ही रोज एकमेकांकडे बघतो. पण कधीच बोलत वगैरे नाही. तिच्याही घरी माझ्याप्रमाणे तीच्या लग्नाची बोलणी वगैरे चालू आहे. आता हे कळायला मला फारसे श्रम करावे लागले नाहीत. परवा मी, माझी मैत्रीण संध्याकाळी फिरायला गेलो होतो. काही तरी खावे म्हणून ‘बर्गर’ घेतला. मी खात असतांना सहज लक्ष गेल तर एक छानशी मुलगी माझ्याकडे एकटक नजरेने बघत होती. बहुतेक तिचेही मन माझ्याप्रमाणे भटकत असावे. थोड्या वेळाने आमच्या दोघांच्या बाजूला ती आणि तिचा तो येऊन कच्ची दाबेली खात होते. तर तो माझ्या मैत्रिणीकडे बघत होता. बहुतेक त्या दोघांचेही मन अजून जुळलेली नाहीत. (more…)